*स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन* मानवाला अवकाशात झेपावण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ठ म्हणजे अंतरीक्ष यान होय. मागील ५० वर्षात अमेरिका व रशिया या दोन देशांनी वेगवेगळे अवकाशयाने तयार करून त्यांचा वापर सुर्यमालेतील ग्रहांचा व अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी केला आहे. अपोलो यानांनी तर थेट चंद्रावर पोहचुन मानवी यशाचा झेंडा रोवला आहे. अशा या अंतरीक्ष यानांच्या मालिकेतील सर्वात आगळे-वेगळे यान म्हणजे अमेरिकेचे स्पेस शटल होय. अवकाश स्थानकांचा विकास व उपग्रह कक्षेत पाठवण्यासाठी स्पेस शटलचा वेळोवेळी वापर करण्यात आला आहे. स्पेस शटल हे विमान आणि रॉकेटचे एकत्रीतपणे तयार केलेले अंतरीक्षयान होते. त्याचा एका अवकाश मोहिमेनतंर परत वापर करणे शक्य होत असे. सुरवातीला चार स्पेस शटलची निर्मिती केली गेली होती म्हणजेच १) कोलंबिया २) डिस्कव्हरी ३) अॅटलँटिस ४) चॅलेंजर. १९८१ साली कोलंबिया या स्पेस शटलने पहिल्यांदा उड्डांन घेतले. चेलेंजर या यानाला १९८६ साली अपघात झाला व त्याच्या जागेवर इंडीएव्हर या नवीन स्पेस शटलचा समावेश करुन घेण्यात आला. त्यानंतर २००३ मध्ये कोलंबिया या यानाला देखील अपघात झाला....
Laxman Katekar @ 7588020886