छत्रपती शिवाजी महाराज” हे नुसतं नाव जरी वाचलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. ते फक्त जाणते राजे नव्हते तर, मराठी माणसासाठी ते दैवत आहेत. महाराजांनी ४०० वर्षांपूर्वी जुलमी मुसलमान राजवटीत पिचलेल्या जनतेची सुटका केली व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य स्थापन केले. हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी योग्य व्यवस्थापन केलं. त्यांचं नेतृत्व, संघटन कौशल्य, युद्धनीती हे फार उंचीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे उभे आयुष्य हा मोठा विषय आहे. त्यांचे नेतृत्वगुण, दळणवळणाचे व्यवस्थापन, लढाया, तह, स्वराज्य विस्तार करतानाचे नियोजन, रसद पुरवण्याचे तंत्रज्ञान, स्वराज्य स्थापन करताना नियुक्त केलेले मंत्रिमंडळ, सैन्य दलाची उभारणी ह्या अनेक पैलूंतून त्यांचे व्यवस्थापन कौशल्य बघायला मिळते आणि ते आधुनिक व्यवस्थापनाचे गुरु आहेत ह्याची खात्री पटते. त्यांच्या संपूर्ण आयुष्यातून अगदी बारीक सारीक घटनांतून दे...
Laxman Katekar @ 7588020886