Skip to main content

Posts

Showing posts from July, 2021

वाक्प्रचार व त्याचा वाक्यात उपयोग

 वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग . (1)अटक करणे :- खूप मेहनत करून पोलिसांनी चोरांना अटक केली.  (2)अपशब्द वापरणे :- खेळताना भास्करचा चेंडू लागताच, शंकरने भास्करविषयी रागाने अपशब्द वापरले. (3)अचंबा वाटणे :- आकाशात इन्द्रधनुष्य पाहताच, याचा लहान मुलांना अचंबा वाटला. (4)अभिमान वाटणे :- नितीनचा शाळेत पहिला नंबर येताच याचा त्याच्या बाबांना अभिमान वाटला. (5)अटकाव करणे :- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला. (6)अठराविश्व दारिद्र्य : घरात कुणीच कमावणारे नसल्यामुळे रवीच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. (7)अनुकरण करणे :- लहानसा गौरव नेहमी त्याच्या मोठ्या भावाचे अनुकरण करतो. (8)अभिप्राय देणे :- मी लिहिलेले पत्र सुंदर आहे, असा आमच्या सरांनी अभिप्राय दिला. (9)अभिवादन करणे :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी आम्ही त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. (10)अवगत होणे - माहित होणे, कळणे, आकलन होणे. वाक्य – पाच दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर चित्र कसे काढावे याची कला रामला अवगत झाली. (11)अवगत करणे - माहित करून घेणे. वाक्य – सुषमाने ने इंग्रजी भाषा चांगलीच अवगत केली आहे. (12)अव...