*कोणत्या कारणासाठी , कोणत्या जातींचे पक्षी, कोणत्या वनस्पतीचा उपयोग करतात ते माहिती करून घ्या, व आपल्या ज्ञानात भर घाला.* हळू हळू सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे.कोरोना महामारीने तर जगाचे कंबरडेच मोडले आहे. लॉक डाऊन चा तर कालावधी पुढे पुढे वाढतच चालला आहे, आपण घरी आहात प्रत्येकाने किमान २ तरी झाडे लावा, संवर्धन करा व ह्या बदलेल्या पर्यावरणाला पूर्वी सारखे दिवस आणा. चला तर खालील झाडांची माहिती करून घ्या. १. अंजनी:- फळ खाणारे पक्षी - १) हळदी बुलबुल, २) शिपाई बुलबुल किंवा नारद बुलबुल, ३) कुरटुक, ४) कुटुगा. घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी -१) सुरेल सातभाई, २) काळा बुलबुल, ३) रानकस्तूर, ४)रानभाई, ५) काळटोप कस्तूर. २. आंबा :- फळ खाणारे पक्षी - १) कीर पोपट, २) कोकीळ, ३) टोई किंवा तुईया, ४) कुटुक, ५) कुटुर्गा, ६) टकाचोर, ७) शिपाई बुलबुल, ८) लालबुड्या बुलबुल, ९) तांबट. घरट्यासाठी फांदया वापरणारे पक्षी - १) हळद्या, २) शिक्रा, ३) सुभग, ४) तुरुमति ससाणा, ५) कोतवाल, ६) सातभाई, नाचण, ८) पतंगा किंवा स्वर्गीय नर्तक, ९) काळटोप कस्तू...