Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

भारताचे प्रेरणादायी - डॉ. अशोक खेमका (IAS)

भारताचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व #Inspirational Person Of India  🌈 आठवे पुष्प  #मा. डॉ.श्री अशोक खेमका (IAS) हरियाणा राज्य शासन, भारत.      आदर्श कार्य करणाऱ्या मा अशोक खेमका यांची 28 वर्षात 53 वेळा बदली करण्यात आली.   ✒️  संकलन व लेखन  ✒️ @ श्री. लक्ष्मण काटेकर #७५८८०२०८८६     #Shivnitee.blogspot.in           स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या होतकरु विद्यार्थी मित्र/मैत्रिणींसाठी आम्ही आज अशीच भारतातील प्रेरणादायी व्यक्तीची माहिती घेवून आलो आहोत.  डॉ.अशोक खेमका (IAS) यांची 28 वर्षांत 53 वेळा बदली झाली आहे.   डॉ. अशोक खेमका (अशोक खेमका) वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, एक भारतीय संगणक शास्त्रज्ञ आणि एक अर्थशास्त्रज्ञ आहेत ज्यांना प्रामाणिकपणा आणि सचोटीची उच्च पातळी आहे.  गुडगावमधील सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या अवैध जमीन कराराचे  उत्परिवर्तन  डॉ. अशोक खेमका साहेबांनीच रद्द केले आहेत.  डॉ. अशोक खेमका यांचा जन्म 30 एप्रिल 1965 (वय 54) रोजी ...

शिवनिती - राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब शहाजीराजे भोसले.

शिवनिती महापुरुष व्यक्ती परिचय. भाग ९ राजमाता जिजामाता, ( जिजाऊ , माँ साहेब )    राजमाता जिजाऊ, आम्हाला आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्मले पाहिजेत, पण त्यासाठी अगोदर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ जन्मला यायला पाहिजेत. ‘हे आई छत्रपती शिवाजी महाराजप्रमाणे पुत्र माझ्यापोटी जन्माला यावा’ असे प्रत्येक महिलेची अशी विचार सरणी ठेवूनच खालील संपूर्ण लेख वाचावा.            राजमाता जिजाऊ ह्या हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या.            राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्म सिंदखेड, जिल्हा बुलढाणा येथील भुईकोट राजवाड्यामध्ये दि १२ जानेवारी १५९८ रोजी झाला. आकर्षक भव्य प्रवेशद्वार असणारा हा राजवाडा सिंदखेडराजा नगरीमध्ये, मुंबई-नागपूर हायवेला लागुनच आहे. याच वस्तूसमोर नगर पालिका निर्मित एक बगिचा देखील आहे. येथे राजे लखुजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वस्तू भारतातील संपूर्ण हिंदुराज्यांच्या समाधीपेक्षा मोठी वास्तू आहे. ज्या ठिकाण...

मृत्युंजय (कादंबरी) कर्ण भाग - एक

मृत्युंजय कादंबरी. मूळ लेखक - शिवाजी सावंत. संकलन - शिवपुत्र लक्ष्मण काटेकर.          📞   ७५८८०२०८८६. कर्ण भाग एक         आज मला थोडं बोलायचं आहे ! मी बोलणार म्हणन काही लोक दचकतील ! म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली ? पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं ! जेव्हा जेव्हा हाडामांसाची जिवंत माणसं मतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं ! छे, मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही; कारण मला चांगलं माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही. माझ्यापुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून ! आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता ! अनेक प्रकारच्या , अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत. असा एक भाता !!             आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावयाचा आहे ! स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण - अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवाय...

काही बागांना उपवने ( Botanical Gardens ) का म्हणतात ?

प्रश्न १ : काही बागांना उपवने ( Botanical Gardens ) का म्हणतात ?  उत्तर : खाजगी किंवा सार्वजनिक उद्याने सभोवतालचा परिसर आनंददायक व्हावा यासाठी निर्माण केली जातात . पण उपवने विविध वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी निर्माण केली जातात . या उपवनात परकीय वनस्पती वाढविता येतील अशी हरितगृहे असतात तसेच तेथे प्रयोगशाळा आणि वाचनालयही असते . उपवने सामान्यपणे समाजासाठी खुली असतात . त्यामुळे आपल्या देशात , प्रांतात पहायला न मिळणाऱ्या वनस्पती पाहण्याची संधी मिळते . इंग्लंडमधील Kew Garden हे असे एक प्रसिद्ध उपवन आहे , जेथे अनेक देशांतील वनस्पती आणि वृक्षांच्या खूप जाती पहायला सापडतात . असेच एक मोठे उपवन उटकमंड येथे आहे .

भारताचे प्रेरणादायी - आर्मस्ट्राँग पामे (IAS)

भारताचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व #Inspirational Person Of India  🌈  सातवे पुष्प 🌈 #मा. श्री. आर्मस्ट्राँग पामे (IAS) मणिपूर राज्य शासन, भारत.  ✒️  संकलन व लेखन  ✒️ # श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर ( महाराष्ट्र ). # 7588020886     # Shivnitee.blogspot.in           स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या होतकरु विद्यार्थी मित्र/मैत्रिणींसाठी आम्ही आज अशीच भारतातील प्रेरणादायी व्यक्तीची माहिती घेवून आलो आहोत.  आर्मस्ट्राँग पामे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी सर्वात लोकप्रिय असे आयएएस आहेत. त्यांना “चमत्कारी मनुष्य” म्हणून ओळखले जाते कारण जे शासनाला करता आले नाही किंबहुना करण्याचा प्रयत्न केला नाही असा १०० किमी चा रस्ता खास आपल्या कल्पनेने बनवून भारतातील लोकांना आदर्श घडवून दाखवला. ते मणिपूरमधील झेलिअंग्रॉंग समुदायाच्या झेमे भाषिक गटाचा आहेत. आर्मस्ट्राँग पामे यांचा जन्म २३ सप्टेंबर १९८४ रोजी झाला होता आणि त्यांचे राशिचक्र साइन हा कुंभ आहे. आर्मस्...

भारताचे प्रेरणादायी - स्मिता सभरवाल

भारताचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व #Inspirational Person Of India  🌈  सहावे पुष्प #मा. स्मिता सभरवाल (IAS) तेंलगणा राज्य शासन, भारत.  ✒️  संकलन व लेखन  ✒️ # श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर  # ७५८८०२०८८६     # Shivnitee.blogspot.in           स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या होतकरु विद्यार्थी मित्र/मैत्रिणींसाठी आम्ही आज अशीच भारतातील प्रेरणादायी व्यक्तीची माहिती घेवून आलो आहोत.  स्मिता सभरवाल ( IAS ) तेलंगणा राज्य सरकार.          स्मिता सभरवाल यांचा जन्म १ जून १९७७ तेलंगाना केडर मधील २००१ च्या तुकडीची भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहे.  लोकांना सामील करून नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांना लोकांचे अधिकारी म्हणून ओळखले जाते. मुख्यमंत्री कार्यालयात नेमल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या महिला स्मिता सभरवाल ह्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या तेलंगणा सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिव म्हणून काम कर...

ग्रामीण शब्द

ग्राम्यबोली आपआपल्या मुलांना हा मेसेज आवश्य (कंपलसरी) वाचायला द्या व समजावून ही द्या ग्रामिण भाषेचे आणी ग्रामिण बोली भाषेचे अघाद ज्ञान आहें *कावळे - गाव जेवणात पातळ भाजी वाढण्यासाठी ज्या भांड्याचा वापर करायचे ते भांडे म्हणजे *कावळे* .  *कालवण / कोरड्यास - पातळ भाजी *आदण - घट्ट भाजीचा रस्सा त्याला 'आदण' म्हणत. *कढाण - मटणाचा पातळ रस्सा त्याला 'कढाण' म्हणतात.  *घाटा - हरभर्‍याच्या झाडाला ज्यामध्ये हरभरा तयार होतो त्याला 'घाटा' म्हणतात. *हावळा - हरभरा तयार झाला की शेतातच काट्याकुट्या गोळा करुन त्यात हरभरा भाजून खायचा त्याला 'हावळा' म्हणतात. *कंदुरी - पूर्वी लग्नानंतर किंवा एखादा नवस असेल तर देवाला बकरं कापलं जायचं व ते खाण्यासाठी गावातील लोकांना जेवायला बोलवायचे. बकर्‍याचा कोणताही भाग अथवा त्याची तयार केलेली भाजी घरी आणायची नाही त्याला 'कंदुरी' म्हणत.  *हुरडा -ज्वारी तयार होण्यापूर्वी थोडीशी हिरवट कणसं भाजून ती चोळून त्यातून जे दाणे निघतात ते खायला गोड असतात. त्यास 'हुरडा' म्हणतात.  *आगटी -हुरडा भाज...