Skip to main content

Posts

Showing posts from February, 2024

वाचनीय पुस्तकांची यादी

  पुस्तकांची यादी  १)पाझर-अण्णाभाऊ साठे २)मृत्युंजय ३)छावा ४)झुंज ५)मावळ ६)शिवरायांचे खरे शत्रू कोण ७)रावण संहिता-हिंदी ८)मी पाहिलेले यशवंतराव ९)कृष्णकाठ-यशवंतराव चव्हाण १०)सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय ११)अधर्म युद्ध -गिरीश कुबेर १२)गरुड झेप- रणजित देसाई १३)मनोवेध -वैजयंती डांगे १४)मधली भिंत-जनार्धन शिर्के १५)साहित्याचा गाव-आनंद यादव १६)झूल-भालचंद्र नेमाडे १७मध्यरात्र-वी.स.खांडेकर १८)दोस्त-व.पु.काळे १९)देखणी-भालचंद्र नेमाडे(कविता संग्रह) २०)स्वर्गाच्या वाटेवर-सुधा मूर्ती २१)परीघ-सुधा मूर्ती २२)प्रकाश वाटा-प्रकाश आमटे २३)भुताचा जन्म-द.मा.मिरासदार २४)खिल्ली-पु.ल.देशपांडे २५)गझल-सुरेश भट २६)उन्हाच्या काटाविरुद्ध-नागराज मंजुळे (कविता संग्रह) २७)बालगंधर्व २८)कांचनमृग २९)ययाती- वी.स.खांडेकर ३०)यज्ञकुंड-वी.स.खांडेकर ३१)भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ३२)डॉ. बाबासाहेब आंबेडकर-धनंजय किर ३३)युगंधर-शिवाजी सावंत ३४)जाती उदम ३५)पानिपत ३६)व्यक्ती आणि वल्ली ३७)माझ्या मानमर्जीतील कविता ३८)हिंदू जगण्याची अडगळ-भालचंद्र नेमाडे ३९)वाईज अँड अदर वाइज-सुधा मूर्ती ४०)बटाट्याची चाळ-पु.ल.देशपांडे ४१)माझा ...

वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग

 वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग  (1)अटक करणे :- खूप मेहनत करून पोलिसांनी चोरांना अटक केली.  (2)अपशब्द वापरणे :- खेळताना भास्करचा चेंडू लागताच, शंकरने भास्करविषयी रागाने अपशब्द वापरले. (3)अचंबा वाटणे :- आकाशात इन्द्रधनुष्य पाहताच, याचा लहान मुलांना अचंबा वाटला. (4)अभिमान वाटणे :- नितीनचा शाळेत पहिला नंबर येताच याचा त्याच्या बाबांना अभिमान वाटला. (5)अटकाव करणे :- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला. (6)अठराविश्व दारिद्र्य : घरात कुणीच कमावणारे नसल्यामुळे रवीच्या घरी अठराविश्व दारिद्र्य होते. (7)अनुकरण करणे :- लहानसा गौरव नेहमी त्याच्या मोठ्या भावाचे अनुकरण करतो. (8)अभिप्राय देणे :- मी लिहिलेले पत्र सुंदर आहे, असा आमच्या सरांनी अभिप्राय दिला. (9)अभिवादन करणे :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी आम्ही त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. (10)अवगत होणे - माहित होणे, कळणे, आकलन होणे. वाक्य – पाच दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर चित्र कसे काढावे याची कला रामला अवगत झाली. (11)अवगत करणे - माहित करून घेणे. वाक्य – सुषमाने ने इंग्रजी भाषा चांगलीच अवगत केली आहे. (1...