*यात्रा माझ्या गावची* शिवश्री लक्ष्मण काटेकर. *7588020886* कृपया लेख मोठा आहे, पण संपूर्ण वाचावा व आहे असा इतराना शेअर करावा. किती छान शब्द वाटतात, की ‘यात्रा माझ्या गावची’ असे ऐकताना. ह्या शब्दात आपुलकी, गोडवा, मैत्री, अभिमान, कौतुक आणि आपल्या गावाची शान वाटते. प्रत्येक गावाची अशी एक वार्षिक यात्रा भरते. ज्या दिवशी गावाच्या रीतिरिवाज परंपरा जपल्या जातात. भले कितीही मोठे, श्रीमंत किंवा गावातील महान बनले तरी यात्रा ही यात्रा महोत्सव सारखी साजरी करण्यात वेगळेपण न आणता परंपरा जपली जाते ह्याचेच उदाहरण म्हणजे “यात्रा माझ्या गावची.” होय, असेच आहे शान-अभिमान वाटावं अस माझं गावं. करमाळा तालुक्यातील आणि सोलापूर-नगर रोडवरील ‘देवळाली’ माझं गावं. गाव तस मोठं साधारण 8 वस्त्या आणि 2 खेडी एकत्र मिळून राहणार. गावाच ‘देवळाली’ नाव ऐकूनच वाटत की गावात देव जास्त आहेत की काय? तर नक्कीच होय असं उत्तर द्यावे लागेल. गावाची स्थापना सांगता येणार नाही, तसेच पुरातन इतिहास कमी लाभलेलं पण चालू इतिहास घडवण्यात अग्रेस...
Laxman Katekar @ 7588020886