महाराणी, स्वराज्यलक्ष्मी सईबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. महाराणी सईबाई यांचा जन्म फलटणच्या निंबाळकर घराण्यात दि. २९ ऑक्टोबर १६३६ रोजी फलटण, महाराष्ट्र येथे झाला होता. त्यांचे वडील मुधोजीराजे निंबाळकर हे होते तर त्यांच्या मातोश्री रेऊबाई निंबाळकर ह्या होत्या. महाराणी सईबाईं या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील माधोजीराव नाईक निंबाळकर यांच्या कन्या आहेत. तर निंबाळकर हे तंजावरच्या पवार कुळातील राजघराणे आहे. महाराणी सईबाई यांना तलवार बाजीची खूप आवड होती. त्या फलटणच्या राजघराण्यातील असल्याने त्यांनी घरातूनच लहानपणीच तलवारबाजी, घोडेस्वारी लढाया ह्या गोष्टींत पारंगत झाल्या होत्या, शिकल्या होत्या. महाराणी सईबाई ह्या बालपणी दिसायला सुंदर, उभा चेहरा, आकर्षक रंग, करारीबाणा, सौंदर्याची देणगी त्यांना मिळालेली होती. राजघराण्यातील असल्याने निंबाळकर घराणे आणि भोसले घराण्यात सतत संबंध येत ...
Laxman Katekar @ 7588020886