--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*vविज्ञान प्रश्नमंजुषा🔭🔬
भाग :- २
दिनांक 30 डिंसे २०१५
रोजीचे उत्तर
📚प्रश्न:- पोपट का बोलू शकतात ?
उत्तर :- पोपटाची जीभ मनाच्य जीभे सारखीच असल्याने पोपट मानवी (माणसांच्या) आवाजाचे अनुकरण करू शकतात. काकाकुवा आणि डोमकावळ्यातही हि क्षमता असते.
या पक्ष्यांनी काढलेले ध्वनी खऱ्याखुऱ्या बोलण्यासारखे नसून ते केवळ आवाजाचे अनुकरण असल्याने माहितीयुक्त संदेश ते पाठवू शकत नाहीत.. साधारणतः त्यांचा शब्दसंग्रह मर्यादीतच असतो. उच्च पातळीची विद्वत्ता असल्याशिवाय माणसासारखे बोलता येणे शक्य नाही. म्हणून पोपटांच्या बडबडीला पोपटपंची ( अर्थहीन बोलणे / वटवट ) म्हणतात .

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
⚖विज्ञान प्रश्नमंजुषा🔭🔬भाग :-१
दिनांक 29/12/2015
आपणास रोज एक प्रश्न दिला जाईल त्याचे वैज्ञानिक विचारातून आपण शास्त्रशुद्ध उत्तर द्यावे .उत्तराची पुनरावृत्ती टाळावी
आपले उत्तर सर्व ग्रुपवर प्रसिद्ध केले जाईल
📚प्रश्न:- वनस्पती मांसाहारी असतात का ?
उत्तर वनस्पती मांसाहारी असतात जरी त्या किटकांपेक्षा मोठ्या प्राण्यांना खात नसल्या तरी कीटक सुद्धा प्राणिसृष्टीचेच घटक आहेत.म्हणजे काही वनस्पती तरी मांसाहारी आहेत.
मांसाहारी वनस्पती त्यांचे भक्ष्य निरनिराळ्या पद्धतीने पकडतात,
घटपर्णी पाने एखाद्या घटा सारखी किंवा नळी सारखी असतात, त्यात पाणी असते घाटाच्या आतील बाजूस केसाळ आवरण असते , कीटक त्यात अडकला कि तो अधिकाधिक गुरफटत जातो , आणि घसरत जाऊन घटातील पाण्यात बुडतो.
दवबिंदू वनस्पतीची पाने गोल असतात. त्यावर केसाळ प्रवर्ध असतात.या केसांच्या टोकाशी चिकट पदार्थचा थेंब असतो. कीटक या चिकट पदार्थमुळे पानाला चिकटतो व त्यामुळे तो निसटू शकत नाही. त्याचवेळी दवबिंदू पाने आतल्या बाजूला वळतात आणि ती कीटक पकडून खातात
"व्हीनसचा फ्लाय ट्रॅप" हि प्रसिद्ध मांसाहारी वनस्पती आहे. यथायोग्य नाव असलेली हि बहुदा सर्वात प्रसिद्ध वनस्पती आहे. या वनस्पतीला बिजागरासारखी पाने असून त्यांच्या पृष्ठभागावर केस असतात. या पानावर विशेषतः संवेदनशील केसांवर कीटक बसतो तेंव्हा पाने मिटतात आणि कीटक आत पकडला जातो.
अशा प्रकारे काही वनस्पती मांसाहारी असतात.
कृपया आपले उत्तर पूर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता, प्रश्न आणि त्याचे उत्तर अशा नमुन्यात द्यावे
आपले उत्तर सर्व ग्रुपवर प्रसिद्ध करण्यात येईल.
🙏🏼संकल्पना आणि संकलन 🙏🏼
🔭 लक्ष्मण काटेकर🔬