Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

कनिष्क

कनिष्क भारताच्या प्राचीन इतिहासाचा एक महत्वपूर्ण भाग आहे कुशाण राजवंश. अत्यंत पराक्रमी, बलवान, सामर्थ्यवान, धर्मपालक अशा राजांची एक मोठी श्रेणी या राजवंशात होती. कनिष्क ह्या राजवंशाचा सर्वात प्रसिद्ध शासक होता. कनिष्कच्या काळात कुशाण साम्राज्याचा सीमा पश्चिमी चीनपर्यंत जाऊन टेकल्या होत्या. कुजूल कडफिससने कुशाण राजवंशाची स्थापना केली. इसवी सन १५ ते ६५ पर्यंत तो राज्य करत होता. कुशाण ही मध्य आशियातील ‘युची’ नावाच्या जमातीची एक शाखा होती. मौर्य काळानंतर भारतात आलेल्या यवन, शक आणि पहलव यांच्या प्रमाणे कुशाण एक परदेशी जात होती. हा वंश पुढे कडफिससच्या काळात राजवंश बनला आणि त्यात कनिष्क कुशाणचा जन्म झाला. कनिष्क हा भारतातील सर्वात शक्तिशाली शासक म्हणून नावारूपाला आला. कनिष्कच्या काळात कुशाण साम्राज्याच्या सीमा विस्तारत गेल्या. इसवी सन ७८ मध्ये कनिष्क सत्तेत आला असे मानले जाते. कनिष्कच्या कालगणनेसाठी शक संवतची सुरुवात करण्यात आली. परंतु इतिहासकारांमध्ये यावर विवाद आहेत. शक आणि पाहलाव लोकांचा पराभव करून कुशाण लोकांनी हिंदुस्थानात भले मोठे साम्राज्य निर्माण केले. मध्य आशियापासून उत्त...