Skip to main content

मानवाच्या जगातील प्रमुख जमाती


मानवाच्या जगातील प्रमुख जमाती

1     1. अफ्रिडी
पाकिस्तानमधील एक पठाण जमात.
एक भारतीय आदिवासी जमात. अरुणाचलमध्ये सुबनसिरी विभागात समुद्रसपाटीपासून १५२ मी. उंचीवर असलेल्या खोऱ्‍यात ह्या जमातीचे लोक राहतात.
भारतातील नागा जमातींपैकी एक प्रमुख जमात.
4. अका 
भारतातील अरूणाचल प्रदेशातील कामेंग विभागाच्या दक्षिणेस रहात असलेली पहाडी जमात.
मध्य आफ्रिकेतील सूदानी भाषा बोलणाऱ्‍यांपैकी प्रख्यात निग्रोवंशीय जमात.
भारतीय केरळ व कर्नाटक राज्यांत रहात असलेली एक जमात.
एक भारतीय आदिवासी जमात.
उत्तर व दक्षिण अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांना ‘अमेरिकन इंडियन’ म्हणतात.
केरळ, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांमधील अत्यंत गौण समजली जाणारी वन्य जमात.

भारतातील केरळ राज्यात राहत असलेली एक वन्य जमात.
भारतातील बिहार राज्यात राहत असलेली एक वन्य जमात.
दक्षिण अमेरिकेतील एक अमेरिकन इंडियन जमात.
मध्य ऑस्ट्रेलियातील अरांडा बोली बोलणारी एक जमात.
आसाममधील एक शान जमात. शान मूळचे ब्रह्मदेशातील रहिवासी.
नैर्ऋत्य बोर्निओमधील भटके मलाई आदिवासी लोक. त्यांचे आधिकृत नाव सी-डायक (समुद्रावरील फिरस्ते) असले, तरी ती एक अपसंज्ञा आहे.
दक्षिण भारतातील निलगिरी पर्वतात राहणारी एक आदिवासी जमात.
तमिळनाडू राज्यातील एक जात.
नागा प्रदेशातील मोकॉकचुंग जिल्ह्यातील आओ भाषा बोलणारी जमात.
एक अमेरिकन इंडियन जमात.
केरळमधील एक प्रसिद्ध अनुसूचित जमात. तिची वस्ती प्रामुख्याने पालघाट जिल्ह्यात आढळते.
एक भारतीय विमुक्त जमात.
बहुतांशी केरळमधील एर्नाकुलम व कोट्टयम् जिल्ह्यांत व तमिळनाडूमधील कोईमतूर जिल्ह्यांत राहणारी एक भारतीय आदिवासी जमात.
एक भारतीय आदिवासी जमात.
24. एडो 
हे बेनिन शहराचे लोकभाषिक नाव.दक्षिण नायजेरियातील निग्रो लोकांना संबोधण्यासाठी ते पुढे रूढ झाले.
बहुतेक ऑस्तीअ‍ॅक भटके असून शिकार व मासेमारी हे धंदे करतात. अद्यापि शेतीविषयी त्यांना फारसे आकर्षण नाही;
एक भारतीय आदिवासी जमात. केरळमधील पालघाट जिल्ह्यात व तमिळनाडूमधील चित्तूर व कोईमतूर ह्या जिल्ह्यांत ह्या जमातीचे लोक राहतात.
उत्तर अमेरिकेच्या आर्क्टिक भागात व आशियाच्या ईशान्येस एस्किमो जमातीचे लोक राहतात.
28. ऐनू 
जपानच्या होक्काईडो व कूरील आणि रशियाच्या सॅकालीन या बेटांवर रहाणारे आदिवासी.
अंदमान बेटावर राहणारी एक वन्य जमात.
बिहार, पश्चिम बंगाल, ओरिसा व मध्य प्रदेश या राज्यांत विखुरलेली एक जमात.
केरळ व तामिळनाडू राज्यांतील एक जमात.

केरळ राज्यातील त्रिवेंद्रम व क्विलॉन जिल्ह्यांतील एक जमात.
मध्य प्रदेशाचा मुख्यत्वे रायपूर जिल्हा व त्याच्या आसपासचा प्रदेश यांत आढळणारी एक जमात.
पश्चिम ऑस्ट्रेलियातील एक जमात.
कंवार ऊर्फ कौर या नावाने ओळखली जाणारी ही वन्य जमात मध्य प्रदेश राज्यातील छत्तीसगढ जिल्ह्यात व त्याच्या आसपासच्या प्रदेशात मुख्यत:
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत राहणारी एक वन्य जमात.
तामिळनाडू व केरळ राज्यांतील एक वन्य जमात. `काद' म्हणजे जंगल. कादर म्हणजे वनात राहणारे लोक.
अफगाणिस्तानातील एक वन्य जमात.
हिमाचल प्रदेशातील एक अनुसूचित जमात. तिला किन्नर उर्फ कनवरी अगर कनौरा असेही म्हणतात.
दक्षिण ब्रह्मदेशातील काही जमातींना कारेन या ब्रह्मी नावाने संबोधण्यात येते.
आसाममधील एक आदिवासी जमात.
केरळ राज्यातील एक अनुसूचित जमात. तमिळनाडूतही त्यांची थोडीफार वस्ती आहे.

केरळ, तमिळनाडू व कर्नाटक राज्यांतील एक जमात.
न्यू गिनीच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या हिमपर्वतातल्या बालिएम नदीच्या खोऱ्यातली एक जमात.
मध्य व पूर्व यूरोपातील प्राचीन लोक.
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील एक भटकी विमुक्त जात.
तमिळनाडू व आंध्र प्रदेश या राज्यांत आढळणारी एक जमात.
ही अनुसूचित जमात असून प्रामुख्याने महाराष्ट्रातील नासिक, धुळे व ठाणे या जिल्ह्यांतून आढळते.
मुख्यत: कर्नाटकातील एक अनुसूचित जमात. तमिळनाडू आणि केरळमध्ये यांची थोडी वस्ती आढळते.
आंध्र प्रदेशातील डोंगरांत राहणारी एक जमात. तमिळनाडू व केरळ या राज्यांतूनही यांची वस्ती आढळते.
आसाममधील पूर्वोत्तर भागात आढळणारी एक आदिवासी जमात. नागा जमातीच्या अनेक गटांपैकी एका गटाला कोन्यॅक म्हणतात.
ही भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक वन्य जमात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओरिसा राज्यांतही तिची वस्ती आढळते.

ही मुंडा ऊर्फ कोलवंशी वन्य जमात महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यांत आढळते. सातपुडा पर्वत हे या जमातीचे वसतिस्थान आहे.
ही महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात असून तिची वस्ती विदर्भात मुख्यत: यवतमाळ जिल्ह्यात आढळते.
तमिळनाडू, कर्नाटक व केरळ राज्यांतील ही एक वन्य जमात.
भारताच्या बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आढळणारी एक अनुसूचित जमात.
ही भारताच्या पश्चिम बंगालमधील एक अनुसूचित जमात आहे. काओरा, खैरा, कारा व कोरा या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सर्व जमाती एकच होत, असे रिश्ले यांचे म्हणणे आहे.
ईशान्य सायबीरियातील एक मंगोलवंशी जमात.
59. कोल 
मध्य प्रदेश व ओरिसा यांतील आदिवासी जमात.
महाराष्ट्रात यांना दांडेवाले, कबुतरी, खेळकरी, डोंबारी, कोल्हाटी, बांसबेरिया वगैरे नावांनी ओळखतात. कर्नाटकात यांना डोंबारी म्हणतात.
कोळी ही जमात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश इ. राज्यांत आढळते. विशिष्ट भागातच ती अनुसूचित जमात म्हणून मानली जाते.
खडिया किंवा खाडिया ही मुख्यत: ओरिसात आढळणारी एक वन्य जमात. याशिवाय बिहार आणि मध्य प्रदेश यांतही ती आढळते.
63. खस 
उ. प्रदेशातील डेहराडून जिल्ह्यात आढळणारी एक वैशिष्ट्यपूर्ण जमात.

अरुणाचल प्रदेशात पूर्वेकडे आढळणारी एक अनुसूचित जमात.
ही भारताच्या ओरिसा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांतून आढळणारी एक जमात आहे .
मेघालय राज्यातील एक अनुसूचित जमात. हिला ‘खास’ असेही म्हणतात.
ही भारतातील एक आदिवासी जमात आहे. गदाबा मुख्यत्वे आंध्र प्रदेश, ओरिसा व मध्य प्रदेश या राज्यांत राहतात.
मुख्यतः हिमाचल प्रदेशातील एक अनुसूचित जमात. त्यांची वस्ती विशेषतः डोंगराळ प्रदेशात आढळते.
राजस्थानमधील एक आदिवासी जमात. गरासियांची गुजरात राज्यातही थोडी वस्ती आढळते;
हिमालयाचा पायथा व पूर्वीचा आसाम यांतील एक अनुसूचित जमात.
गॅल. उत्तर आफ्रिकेतील– मुख्यत्वे इथिओपियाच्या आसपासच्या परिसरात आढळणारी जमात.
आसाममधील एक आदिवासी जमात. प. बंगाल, नागालँड व त्रिपुरा या प्रदेशांतही या जमातीची काही प्रमाणात वस्ती आढळते.
ही भारतातील एक महत्त्वाची जमात व जात असून ती पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या भागांत आढळते.
भारतातील संख्येने सर्वांत मोठी असलेली आदिवासी जमात.
रिवदन गौडलू, कादू गौडलू अगर गौडलू ही जमात कर्नाटक राज्यात व केरळ राज्यातील मुख्यतः कोझिकोडे या जिल्ह्यात आढळते.
दक्षिण अमेरिकेतील ग्वारानी बोली बोलणाऱ्या इंडियन जमातीच्या कुलास ग्वारानी हे जातिपद देतात.
एक अमेरिकन इंडियन जमात. यांना ओजिब्वा असेही संबोधतात.
आंध्र आणि ओरिसा या राज्यांतील एक वन्य जमात.
त्रिपुरा राज्यातील एक जमात.
अंदमान द्वीपसमूहातील एक जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे दक्षिण व मध्य अंदमानाच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे.
विविध प्रदेशांत विखुरलेले भटके लोक. जिप्सींना प्रदीर्घ इतिहास असून त्यांचा वावर जगातील बहुतेक लहानमोठ्या देशांत, विशेषतः यूरोपखंडात अधिक आढळतो.
स्पॅनिश भाषेत हिबारो. ते स्वतःला शुआरा म्हणतात. द. अमेरिकेत एक्वादोरच्या आग्नेयीस अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावर व उ. पेरूत यांची वस्ती प्रामुख्याने आढळते.

ओरिसातील एक प्रमुख वन्य जमात. केओंझार, घेनकानाल, कोरापुट व कटक या जिल्ह्यांत जुआंगांची वस्ती आहे.
कर्नाटक राज्यातील एक जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने कर्नाटकातील म्हैसूर, बंगलोर आणि कूर्ग जिल्ह्यांत आढळते.
दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकातील नाताळ आणि ट्रान्सव्हाल प्रांतांतील बांटू भाषा बोलणारे आदिवासी यांची वस्ती दक्षिण आफ्रिकेत विखुरलेली असून त्यांच्या मूळ प्रदेशात झूलूलँड म्हणतात.
बांगला देश आणि आसाम यांच्या दरम्यान असलेल्या त्रिपुरा राज्यातील डोंगराळ प्रदेशात राहणारी एक जमात.
महाराष्ट्रातील एक प्रमुख जमात. पंजाब व जम्मू-काश्मीर राज्यांत असलेले काही जातींनाही ठाकूर असे नाव आहे.
उत्तर अमेरिकेतील इंडियन जमातींच्या एका गटाचे नाव. सू या नावानेही या गटातील जमाती ओळखल्या जातात.
ब्रम्हदेशातील एक जमात. हे स्वतःला मॉन म्हणतात, तर यूरोपीय त्यांचा पेग्युअन असा उल्लेख करतात.
भारताच्या अरुणाचल प्रदेशातील एक वन्य जमात. डफालांचे मूळ नाव निशांग उर्फ निसी आहे;
ही अरुणाचल प्रदेशामधील भारत–ब्रह्मदेश सरहद्दीवरील एक वन्य जमात आहे. तांगसाच्या अनेक उपजमाती आहेत.
ही फिलिपीन्सच्या लूझॉन प्रांतातील वायव्य भागात राहणारी एक जमात आहे.
तुंगुझ. एक भटका आदिवासी समूह. याची वस्ती मुख्यत्वे पूर्व सायबीरियाच्या जंगलात (तैगा प्रदेश) आढळते.
दक्षिण अमेरिकेतील अमेरिकन इंडियन जमातींच्या समूहाचे नाव. तुपी वा तुपी–ग्वारानी किंवी टुपी या नावांनीही हा समूह ओळखला जातो.
एक आदिवासी जमात. हे लोक छोटा नागपूर, बिहार, आसाम व सिमला पर्वतरांगांत राहतात.
एक आदिवासी जमात. द. भारतातील तमिळनाडू राज्यातील निलगिरी पर्वताच्या उंच पठारावर यांची वस्ती आहे.
बांटू भाषा बोलणारा द. आफ्रिकेतील एक वैशिष्ट्यपूर्ण जमातसमूह वा गट. याची वस्ती पोर्तुगीज आग्‍नेय आफ्रिकेत मोझँबीकच्या द. किनाऱ्यावर व त्याच्या आसपासच्या प्रदेशांत आढळते.
अनेक जातिजमातींचे एक बिरुद. दोरा याचा अर्थ स्वामी असा असून हे बिरुद अनेक जातिजमातींना लावतात.
एक आदिवासी जमात. यांची वस्ती गुजरात, महाराष्ट्र, दाद्रा व नागरहवेली यांत आढळते.
100. नागा 
ईशान्य भारतातील एक प्रमुख जमात; तथापि ती एक-जिनसी जमात नाही. तिच्यात अनेक लहानमोठ्या शाखा वा उपजमाती आहेत.


महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण भटकी जमात. यांना नंदीबैलवाले ऊर्फ तिरमल असे म्हणतात.
102. धनका 
गुजरात व महाराष्ट्र राज्यांतील एक अनुसूचित जमात.
103. नाट 
डोंबाऱ्यांप्रमाणे खेळ करणारी एक भटकी जमात.यांचा संचार मुख्यत्वे महाराष्ट्र व गुजरात या प्रदेशांत असतो.
ऑस्ट्रियाचा एक सैद्धांतिक मानवशास्त्रज्ञ.
गुजरात व महाराष्ट्र राज्यांतील एक अनुसूचित जमात.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील संख्येने सर्वांत मोठी असणारी अमेरिकन इंडियन जमात.
दीर्घ प्राचीन परंपरा असलेली नेपाळमधील एक इतिहास प्रसिद्ध व प्रभावी जात. यांची वस्ती प्रामुख्याने काठमांडूच्या दरीत आढळते.
नायजेरियातील एक बहुजिनसी जमात. त्यांच्या पारंपरिक शासनास न्यूप या नावानेच संबोधितात.
सूदानच्या कोर्दोफॅन प्रांतातील न्यूबा टेकड्यांच्या परिसरात राहणारे निग्रॉइड वंशाचे आदिम लोक.
हिमाचल प्रदेशातील एक आदिवासी जमात. यांचा उल्लेख कधीकथी पांगी असाही करतात.

भारताच्या केरळ राज्यातील एक आदिवासी जमात. पणियनांची वस्ती मुख्यतः पालघाट, कोझिकोडे व कननोर या जिल्ह्यांत आढळते.
एका व्यक्तीस झालेले संवेदन दुसऱ्या व्यक्तीस होणे; एकाच्या मनातील विचार शब्दांच्या वा मुखचर्येच्या माध्यमावाचून दुसऱ्याला कळणे;
केरळ राज्यातील एक आदिवासी जमात. पल्लियानांची थोडी वस्ती कर्नाटक व तामिळनाडू राज्यांतही आढळते.
मध्य प्रदेश राज्यातील एक आदिवासी जमात. गोंड जमातीची ‘परजा’ ही एक शाखा असून यांची वस्ती मुख्यत्वे बस्तर जिल्हाता आढळते.
रेड्डींमध्ये पंचायतीची पद्धत असून ग्रामप्रमुखाला ‘पेद्दा कापू’ म्हणतात.
वांशिक दृष्ट्या त्यांचे वर्गीकरण करणे कठीण आहे. पापुअन भाषासमूहातील बोलीभाषा ते बोलत असले, तरी तिच्या आणखी काही बोलीभाषा आहेत.
महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात. यांची वस्ती विशेषतः खानदेशात आढळते. गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यांतही यांची थोडीशी वस्ती आहे.
आधुनिक मानवशास्त्राच्या दृष्टीने निग्रो वांशीक वैशिष्ट्ये असलेला पिग्मी निग्रो हा एक वैशिष्ट्यपूर्ण मानवसमूह आहे.
मणिपूर राज्यातील एक आदिवासी जमात. ‘कुकी’ या आदिवासी जमातीचे जुने कुकी व नवे कुकी असे दोन पोटभेद आहेत.

केरळ व तमिळनाडू राज्यांतील एक अनुसूचित जमात.
121. पैते 
मणिपूर राज्यातील एक आदिवासी जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे पूर्व मणिपूर जिल्ह्यातील पर्वतश्रेणींतून आढळते.
मध्य पॅसिफिक महासागरातील हा द्वीपसमुह ओशिअनियाचा एक भाग होय.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांतील नैर्ऋत्य भागात राहणारी एक जुनी अमेरिकन इंडियन जमात.
125. फांग 
आफ्रिकेतील एक बांतू भाषिक जमात.
पश्चिम आफ्रिकेतील एक महत्त्वाची जमात. पिअल, पुल्लो, फुल, फुल्बे, फौलाह, फिलानी, फेलानी, फेलाटे इ. नावांनीही हे लोक ओळखले जातात.
127. फॉन 
प. आफ्रिकेतील बेनीन (दाहोमी) प्रजासत्ताकातील एक जमात. त्यांना दाहोमियन असेही म्हणतात.
संपूर्ण भारतात विखुरलेली, परंतु काही राज्यांत अनुसूचित जमात व काही राज्यांत अनुसूचीबाहेर असलेली भटकी जमात.
कर्नाटक राज्यातील एक जमात. यांची वस्ती मुख्यत्वे कूर्ग जिल्ह्यात आढळते.
पूर्व आफ्रिकेतील युगांडा देशात राहणारी एक आदिवासी जमात.


उत्तर आफ्रिकेतील लिबियन जमातींतील बर्बर भाषा बोलणाऱ्या विविध आदिवासी गटांना बर्बर ही संज्ञा देतात.
आफ्रिका खंडातील अनेक वेगवेगळ्या आदिवासी जमातींचा निर्देश स्थूलमानाने बांतू लोक म्हणून करण्यात येतो.
आफ्रिका खंडातील झाईरे प्रजासत्ताकातील एक पिग्मी जमात.
आफ्रिकेतील झाईरे प्रजासत्ताकातील १६ छोट्या जमातींचा समूह. तो कूबा म्हणूनच ओळखला जातो.
इराणमधील एक भटक्या जमातींचा संघ.
महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात. बर्डा, बरडा, बार्डा आदी नावांनीही तिचा उल्लेख करतात.
भारतातील गुजरात राज्यातील एक आदिवासी जमात. त्यांना काही भागांत बावचा तर काही भागांत बामचा म्हणतात.
भारतातील एक आदिवासी जमात. यांची वस्ती मुख्यत्वे मध्य प्रदेशातील रायपूर व बिलासपूर जिल्ह्यांत व ओरिसा राज्यातील संबळपूर व सुंदरगड जिल्ह्यांत आढळते.
भारतातील एक आदिवासी जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे बिहार, मध्य प्रदेश व ओरिसा या राज्यांतून आणि छोटा नागपूर पठारातील टेकड्यांतून आढळते.



आफ्रिका खंडातील एक आदिवासी जमात. हे लोक टोळ्याटोळ्यांनी झॅंबीझी नदी पासून स्त्री कलाकुसरीच्या कामात गढलेली बुशमन स्त्री आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत भटकत असतात;
मध्यपूर्वेतील विशेषतः उत्तर आफ्रिका खंडातील एक भटकी जमात.
144. बैगा 
भारतातील मध्य प्रदेशातील विशेषतः मंडला, विलासपूर, बालाघाट दुर्ग या जिल्ह्यात आढळणारी एक आदिवासी जमात.
भारतातील एक डोंगरी आदिवासी जमात. ओरिसातील कोरापुट जिल्ह्यात डोंगराळ भागात यांची मुख्यत्वे वस्ती आढळते.
आफ्रिकेतील काँगो खोऱ्यात विषुववृत्तातील वनप्रदेशात आढळणारा ‘बांतू’ जमातीमधील एक समूह.
उदरनिर्वाहाकरिता निवडलेल्या अगर वाट्यास आलेल्या व्यवसायानिमित्त अगर उदरनिर्वाहाच्या साधनांच्या शोधार्थ भटकत राहणाऱ्या लोकांना भटके म्हणतात.
महाराष्ट्रातील ही एक विमुक्त जात. या जातीचा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या विमुक्त जातींच्या यादीत क्रमांक तीनवर सामावेश केलेला आहे.
ही भारतातील लोकसंख्येने मोठी असलेली एक अनुसूचित जमात आहे. त्यांची वस्ती मुख्यत्वे कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र व त्रिपुरा या राज्यांत आढळते.
भारतातील एक आदिवासी जमात. तिची वस्ती मुख्यत्वे ओरिसा, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत आढळते.
भारतातील एक आदिवासी जमात. मध्य प्रदेश व ओरिसा या राज्यांमध्ये भुईयांची वस्ती विशेषत्वाने आढळते.
भारतातील एक आदिम निमभटकी जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे पश्चिम बंगाल व त्रिपुरा या राज्यांत आढळते.
भारतातील एक आदिवासी जमात. त्यांची वस्ती पश्चिम बंगाल, बिहार व ओरिसा राज्यांत आढळते.
यथार्थ स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान अथवा संवेदन न होता अयथार्थ, मिध्या, विपर्ययात्मक ज्ञान होणे म्हणजे भ्रम होय.
155. मग 
भारतातील एक आदिम जमात. ही जमात त्रिपुरा व पश्चिम बंगाल राज्यांत आढळते.
भारतातील एक वन्य आदिवासी जमात. त्यांची वस्ती केरळ राज्यातील मुख्यत:
(मलई अरयन). द. भारतातील एक वैशिष्ट्यपूर्ण आदिवासी जमात. यांची वस्ती मुख्यतः केरळ राज्यातील कोट्ट्यम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांत आढळते.
भारतातील एक वन्य आदिवासी जमात. यांची वस्ती तमिळनाडू व केरळ राज्यांत आढळते केरळ राज्यात मुख्यतः क्विलॉन, त्रिवेंद्रम व कोट्टयम या जिल्ह्यांत तसेच पांबा नदीकाठी यांची वस्ती विशेषत्वाने आढळते.
भारतातील एक आदिवासी जमात. कर्नाटक आणि केरळ राज्यांतील विशेषतः दक्षिण कानडा व कननोर या अनुक्रमे जिल्ह्यांत तसेच तलिपारंब गावाच्या आसपास ही मुख्यतः आढळते. यांना स्थलपरत्वे वेगवेगळी नावे आहेत.

दक्षिण भारतातील संख्येने मोठी असलेली एक आदिवासी जमात.
भारतातील एक आदिम जमात. ती प्रामुख्याने तमिळनाडू आणि केरळ राज्यांत आढळते.
केरळ राज्यातील एक आदिम जमात.
164. मसाई 
दक्षिण आफ्रिकेतील एक भटकी पशुपालक जमात.
दक्षिण भारतातील एक अत्यंत मागासलेली व आर्थिक दृष्ट्या कमकुवत भटकी आदिम जमात.
पश्चिम आफ्रिका खंडातील द. सिएरा लिओनमधील एक आदिम जमात.
168. मेच 
भारतातील एक अनुसूचित जमात. त्यांची वसती मुख्यत्वे पश्चिम बंगाल व आसाम या राज्यांत आढळते.
दक्षिण भारतातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे कर्नाटक राज्यात आढळते.
मेलानिशियाच्या विशिष्ठ भूभागात आढळणारे एका वांशिक समूहातील लोक.
सोव्हिएट रशियामधील सायबीरिया प्रांतातील याकुतिया विभागातील एक भटक्या आदिम रहिवाशांचा समूह.

सायबीरियातील टंड्रा या विषम हवामानातील प्रदेशात राहणारी एक आदिम जमात.
दक्षिण भारतातील एक वन्य भटकी जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील नेल्लोर, कडप्पा आणि कुर्नूल जिल्ह्यांत आढळते.
दक्षिण भारतातील एक आदिम भटकी जमात.
दक्षिण भारतातील एक अत्यंत वन्य व मागासलेली जमात. ती केरळ राज्यात वायनाड विभागात प्रामुख्याने होती.
आफ्रिका खंडातील नायजेरियातील एक प्रमुख जमात. त्यांचा उल्लेख योरूबलंद, यार्रिबा अशा नावांनीही करतात.
पूर्व भारतातील एक प्रसिद्ध अनुसूचित जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने आसाम व पश्चिम बंगाल राज्यांत आढळते.
महाराष्ट्रातील मागासलेली एक विमुक्त जमात. त्यांची वस्ती मुख्यतः पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत आढळते.
179. लंबा 
भारतातील एक वन्य जमात. ती लिंबू, लंबू, लंब आदी नावांनी प्रसिद्ध असून प. बंगाल व हिमाचल प्रदेश या राज्यांत प्रामुख्याने आढळते.

180. लमाण 
भारतातील एक भटकी आदिम जमात. तिची वस्ती महाराष्र्ट, कर्नाटक, तमिळनाडू,राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यांत प्रामुख्याने आढळते.


उत्तर भारतातील एक अनुसूचित जमात-समूह. लाहूल, लाहुली, लाहौल इ. नावांनी तो परिचित आहे.
ईशान्य भारतातील एक अनुसूचित वन्य जमात. त्यांची वस्ती प्रामुख्याने मिझोरामच्या लुंगलेई जिल्ह्यात व लुशाई पर्वतश्रेणीत आढळते.
पूर्व भारतातील आदिम जमातींचा एक समूह. मिझोंच्या एका उपजमातीला ही संज्ञा रूढ झाली असली, तरी सांस्कृतिक दृष्ट्या लुशाईंत अनेक भेद स्पष्ट दिसतात.
184. लूबा 
मध्य आफ्रिकेतील बांतू भाषा बोलणारा एक आदिम गट. त्यांना बालुबा म्हणतात.
185. लॅप 
उत्तर यूरोपातील नॉर्वे, स्वीडन, फिनलंड आणि रशिया (एस्.एफ्.एस्.आर्.) यांत वास्तव्य करणारे भटके आदिम लोक.
अमेरिकन मज्जा मनोविज्ञानतज्ञ (न्यूरोसायकॉलॉजिस्ट).
भारताच्या ईशान्येकडील भूतान व नेपाळ या देशांच्या पश्चिम व पूर्व भागांत तसेच सिक्कीम व प. बंगाल राज्यांतील एक भटकी आदिम जमात.
पश्चिम बंगालमधील एक अनुसूचित जमात. तिची वस्ती प्रामुख्याने मिदनापूर व हुगळी या जिल्ह्यांत आढळते.
भारतातील एक अनुसूचित जमात. ती प्रामुख्याने गुजरात राज्यात कच्छ, अहमदाबाद, व खेडा या जिल्ह्यांत आढळते.



भारतातील एक अनुसूचित जमात. वारल्यांची वस्ती मुख्यत्वे महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांत तसेच दाद्रा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशात असून महाराष्ट्र राज्याच्या ठाणे व नासिक जिल्ह्यांत त्यांची वस्ती अधिक प्रमाणात आढळते.
मध्य ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील वाळवंटी भागाच्या परिसरात राहणारी एक आदिवासी जमात. वारपिरी, वेलबिरी असाही तिचा उल्लेख करतात.
भारतातील एक अनुसूचित जमात. वाल्मीकींची वस्ती प्रामुख्याने आंध्र प्रदेश, ओरिसा व कर्नाटक या राज्यांतून आहे.
गुडरात राज्यातील एक आदिवासी जमात. विटोलिआंची वस्ती मुख्यत्त्वे सुरत जिल्ह्यातील बार्डोली, बांसडा व धरमपूर ह्या तालुक्यात आढळते.
मेक्सिकोमधील एक इंडियन जमात. तिची वस्ती प्रामुख्याने पानूको नदीच्या खोऱ्यात आढळते.
भारतातील एक आदिवासी जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे केरळ राज्यातील एर्नाकुलम् जिल्ह्याच्या उत्तर भागात (इद्यरा खोरे-पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानाचा उत्तर भाग) आणि त्रिचूर जिल्ह्यांत आढळते.
श्रीलंकेतील एक आदिम जमात. तिची वस्ती प्रामुख्याने श्रीलंकेच्या मध्यपूर्व बिंटिनी जंगलात व कॅंडी भागात विखुरलेली होती.
197. वैदू 
महाराष्ट्र राज्यातील एक भटकी जमात. ते गावोगावी फिरत औषधे विकतात, म्हणून त्यांना वैदू म्हणतात.
भारतातील एक आदिवासी जमात. तिची वस्ती मुख्यत्वे अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशात, विशेषतः निकोबार बेटावर आढळते.
नेपाळमधील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे एव्हरेस्ट व लोत्से या हिमालयाच्या अतिउंच पर्वतरांगांत असून इतरत्रही विशेषत: भारतातील दार्जिलिंग जिल्ह्यात (प. बंगाल) ती आढळते.
पूर्व भारतातील एक प्रमुख आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे झारखंड, बिहार, ओरिसा आणि प. बंगाल राज्यांत असून आसाम, मिझोराम वत्रिपुरा येथेही ती काही प्रमाणात आढळते.
भारतातील एक आदिम जमात. या जमातीची वस्ती अरूणाचल प्रदेशात मुख्यत्वे कामेंग जिल्ह्यात आढळते.
दक्षिण भारतातील एक आदिम जमात. शोलगा अगर सोलगा यांची वस्ती तमिळनाडू राज्यात मुख्यत्वे कोईमतूर व कर्नाटकात नृत्याच्या तयारीतील शोलगा पुरूष म्हैसूर जिल्ह्यात आढळते.
203. संसी 
वायव्य भारतातील एक जिप्सीसदृश भटकी जमात.
उत्तर भारतातील एक आदिम जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे राजस्थान व मध्य प्रदेश राज्यांत आढळते.
सामोआ या स्वतंत्र बेट-समूहातील तसेच पूर्व सामोआतील एक प्रमुख आदिम जमात.
====================================
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. लक्ष्मण काटेकर,  
मोबाईल नंबर :- 7588020886


Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.