Skip to main content

शिवनिती भाग ०१ :- प्रस्तावना

शिवनीती
दि. 25 मार्च, 2020 (बुधवार)
चैत्र शुद्ध प्रथमा, शालिवाहन शके १९४२
संवत - २०७७
    अनेक दिवसांपासून आपणास ज्या गोष्टींची प्रतिक्षा होती तो क्षण उद्या पासून म्हणजेच "शिवनीती" आज पासून वाचकांना सादर करत आहोत, त्याचे सविस्तर स्वीकार व्हावा.  

  शिवनीती
         छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे कार्य त्यांनी करत गेले. उपलब्ध मनुष्यबळ आणि निसर्गाच्या साथीने महाराजांनी अनेक यशस्वी अशा लढाया करत, जगाला आदर्श दाखवून दिला, की जगात असे देखील कार्य करू शकता. आतापर्यंत अनेक लेखकांनी महाराजांनी केलेले कार्य कर्तृत्व व राजनीतीवर वेगवेगळे शब्द प्रयोग करत, मूळ कार्य हेतुपासून शब्दाचा विपर्यास होत गेल्याचे दिसते. महाराजांनी उपलब्ध निसर्गाचा वापर करत लढाया व रणनीती करत गेले, ह्याला अनेकांनी महाराजांच्यावर लेखन करताना 'गनिमी कावा' असा शब्द प्रयोग केला आहे, पण आम्ही ह्या शब्द प्रयोगाचे खंडण करत ह्या लेखकांना आवर्जून सांगू इच्छितो की 'गनिमीकावा' नाहीतर "शिवनीती" शब्द वापरावेत. ह्यामागे अनेक कारणांमुळे सांगत आहोत, ह्याचाच पहिला भाग म्हणून आम्ही लेखनाचा पहिल्या भागात "शिवनीती" मांडत सुरुवात करत आहोत.
         *गनिमी कावा म्हणजे काय?* 
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापर केलेल्या युद्धतंत्राचे स्वरूप विशद करण्यापूर्वी 'गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ आपणास समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. 
      'गनीम' हा शब्द मूळ फारसी भाषेतला असून 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. तर 'कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दाला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रूवरचा कपटयुक्त हल्ला' अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ तयार झाला.
        मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या संदर्भात होत असल्याने गनीम म्हणजे मराठ्यांचा शत्रू असा अर्थ निघतो. मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे. तो आत्मसमर्थनार्थ. मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले! ह्यामुळे 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरुदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी काल परिस्थितीनुरूप स्वतःचे असे युद्धतंत्र विकसित केले होते, याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.
            'धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात. हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणाऱ्या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.
     'महाराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत.त्यापैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : 
१. फसवणूक, लूटमार, धुर्तपणा,
२. लुच्चेगिरी, 
३. गुप्तकट, 
४. हुलकावणी आणि 
५. कपट. 
         'कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा ‍वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 
         'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.
           कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाशी संबंधित आहे. पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणाऱ्या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते. तसे झाले तरच त्या त्या दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो. मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणाऱ्या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता नि‍रनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसाला वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशाभूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले.
           प्रेमात व युद्धात सर्वच क्षम्य असते या उक्तीने गनिमी काव्याची पाठराखण करता येते. आपल्या स्वराज्यावर आलेला शत्रू यास कसेही करून परतविणे हेच छत्रपती शिवाजी महाराज उद्दिष्ट होते.

*गनिमी काव्याचे घटक :*
१. नियोजन व अंमलबजावणी
२. समन्वय आणि नियंत्रण
या प्रमुख गोष्टी आहेत.त्यात सैन्य व्यवस्थापन तसेच वेळेचे व्यवस्थापनही अंतर्भूत आहे.
३. विश्वास व तत्परता
४. शब्द हेच प्रमाण

*गनिमी काव्याचे हेतू :*
१. शत्रूला घाबरविणे किंवा दहशत बसविणे.
२. त्याचे मानसिक खच्चीकरण
३. आर्थिकदृष्ट्या शत्रूला अपंग करणे
४. कोंडीत पकडणे.
५. अशी परिस्थिती तयार करणे ज्याने तो शरण येण्यास बाध्य होईल.
६. शत्रूला लढाई मैदान सोडून पळून जावयास लावणे.
७. शत्रुसैन्याची फळी विस्कळीत करणे.
८. त्याला फसविणे.
९. चुकीची माहिती मुद्दाम पुरविणे.
१०. त्याची दिशाभूल करणे
११. शत्रूला बेसावध करणे.
१२. आपण दुर्बल आहोत किंवा आपल्यात लढाईची हिम्मत नाही असे भासविणे.
१३. शरण येण्याची बतावणी करून एकदम आघात करणे.
१४. शत्रूला पाठलाग करावयास भाग पाडणे.
१५. लढाईचे क्षेत्र आपल्यास अनुकूल असे निवडून शत्रूला कसेही करून तेथे नेणे.
१६. शत्रूचे नुकसान करून दरारा निर्माण करणे.
१७. म्होरक्यास ठार करणे, ज्याने शत्रुसैन्यात गोंधळ माजतो.
      ह्या वरील सर्व गोष्टी वाचल्यानंतर आपणास देखील पटले असावे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीला 'गनिमी कावा' असा शब्द प्रयोग शत्रूने केला होता, आणि तो आम्ही 400 वर्षापासून स्वीकारत आहोत, मानत आहोत, अभिमानाने सांगत आहोत. परंतु आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीला 'गनिमीकावा' असा शब्द कधीही वापरणार नाही.
       ह्यामागे अनेक कारण आहेत, त्यांनी साधारण कोणताही कावा, फसवणूक केलेली नाही. त्यांनी जे काही केले ते फक्त जनतेच्या संरक्षण साठी निसर्गाच्या उपलब्ध साधनांचा वापर करत उपलब्ध मनुष्यबळ आणि आपले नियोजन ह्यातून सामान्य जनता सुखी रहावी, शत्रूच्या हल्ल्यातून बचाव व्हावा ह्यासाठी प्रयत्नशील राहत आपलं कार्य करून दाखवलं. त्यांनी कार्य करताना एकच पद्धत दुबार कधीच वापरली नाही. त्यांनी पन्हाळगड वेढ्यातून सुटण्यासाठी वीर शिवा न्हावी ह्यांना प्रतिशिवाजी बनवून सिद्धी जोहार च्या भेटीस पाठवले, आणि महाराज विशाळगड कडे प्रयाण केले, वाटेत घोडखिंडीत वीर बाजीप्रभू ह्यांनी महाराज विशाळगडावर पोहोचे पर्यन्त खिंड लढवली, ही पद्धत परत कधीच वापरली नाही. 
        तसेच महाराजांनी पुण्यास अनेक महिने नव्हे नव्हे वर्ष म्हणावं लागेल, विळखा घालून बसलेल्या औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान ह्यास लग्नाचे नियोजन करून कडेकोट बंदोबस्त असणाऱ्या शनिवार वाड्यात घुसून शाहिस्तेखानाचा शेवटचं होणारे होता. पण ते फक्त चार बोटे कापली गेली आणि त्यावर निभावल गेलं, असा प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे कुठेही केल्याची नोंद आढळत नाही.
 भाग :-०१
         

    🚩  *"शिवनीती"* 🚩चा लेख पूर्ण लेखनाचा भाग इतरांना वाचण्यासाठी शेवटच्या नावासह शेअर करावा, मूळ लेखात कोणीही बदल केल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. ह्याची मूळ प्रत सोशियल मीडिया पूर्व जतन केली आहे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
▬▬▬

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.