Skip to main content

चंद्रपूर जिल्हा माहिती

चंद्रपूर जिल्हा
*     चंद्रपूर महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्वेकडील आदिवासी बहुल जिल्हा.  11 हजार 44 चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा जिल्हा.आकारमानाने महाराष्ट्रातील 14 वा जिल्हा आहे.

· चंद्रपूर जिल्हा 18.4 ते 25.5 या उत्तर अक्षांशावर तर 78.5 ते 80.6 या पूर्व    रेखांशाच्या भौगोलिक पट्यामध्ये विराजमान आहे.
 या जिल्हयाच्या उत्तरेकडे वर्धा,  नागपूर, भंडारा जिल्हयांच्या सिमा आहेत. तर  दक्षिणेकडे तेलंगाना राज्य आहे. पूर्वेकडे गडचिरोली जिल्हा असून पश्चिमेकडे यवतमाळ जिल्हा आहे.

· जिल्हयाच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार केला असता 12 टक्के क्षेत्र असलेला राजूरा  सर्वात मोठा तर 5 टक्के क्षेत्र असलेला मूल सर्वात लहान तालुका आहे.

·  चंद्रपूर हे जिल्हयाचे मुख्यालय असून चंद्रपूर जिल्हयात एकूण 15 तालुके आहेत.
 चंद्रपूर येथे एक महानगरपालिका, 9 नगरपरिषदा 6 नगरपंचायती व 827 ग्राम पंचायती आहेत.

 जिल्हयाची पार्श्वभूमी
*  चंद्रपूर हे शहर गोंडराजांच्या प्राचीन राजधानीचे शहर आहे. देशावर मोगल, इंग्रज यांची
सत्ता  असताना चंद्रपूरवर मात्र कायम ऐतद्देशीय राजसत्ता होती.

*  चंद्रपूर या नावाने प्रचलित असलेला हा जिल्हा प्राचिन काळी लोकापूर या नावाने ओळखला
जात असे. कालांतराने त्याचे नामकरण इंद्रपूर व त्यानंतर चंद्रपूर असे झाले.

·  ब्रिटीश काळात हा जिल्हा चांदा या नावाने ओळखला जात होता.

· चंद्रपूर व लगतच्या प्रदेशावर बऱ्याच काळापासून  बौध्द व हिंदु राजांची सत्ता होती. या भागावर राज्य करीत असलेल्या वैरागडच्या माना राजाने नवव्या शतकात गोंड राज्याची सत्ता हस्तगतकेली.

· सन 1240 ते 1751 पर्यंत म्हणजे मराठ्यांची सत्ता  प्रस्थापित होईपर्यंत गोंड राजाचीच सत्ता होती. सन 1874 पासून चांदा जिल्हा स्वतंत्र जिल्हा म्हणून ओळखला जावू लागला. 

· 550 वर्षापूर्वीचा भुईकोट किल्ला व 7किलोमिटर लांबीचा परकोट आजही चंद्रपूर शहराचे वैशिष्टय असून 4 भव्य दरवाजे व 38 बुरुज शहराच्या नाव  लौकिकात भर घालतात.

· गोंडराज्यांच्या काळातील राणी हिराई यांनी बांधलेले माता महाकाली मंदिर या शहराची ओळख असून या ठिकाणी  चैत्र पौर्णिमेस त्रिपूर चेतवला जातो. येथे महिनाभर यात्रा चालते.

· मराठवाड्यातील नांदेड परिसरातून मोठया संख्येने नागरिक या यात्रेला येतात. मराठवाडा व विदर्भ यांना जोडणारे आध्यात्मिक  पीठ  म्हणून महाकाली मंदिराचे महात्म्य  आहे.
· भारताच्या स्वातंत्र्य लढयात या जिल्हयातील चिमूर येथील 1942 च्या चले जाव चळवळीतील नागरिकांचा सहभाग क्रांतीकारी ठरला आहे.

·स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्य निर्माण होईपर्यंत या भागाने मध्य, दक्षिण आणि पश्चीम भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. हा भाग मध्यप्रांत, मुंबई प्रांत, मद्रास प्रांत यांचा भाग राहीला आहे.

· जिल्हयातील चिमूर येथील 16 ऑगस्टचा स्वातंत्र्य लढा अजरामर असून आजही देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे.

· धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त नागपूर नंतर चंद्रपूर येथे मोठा कार्यक्रम होतो. नागपूर नंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरला 16 ऑक्टोंबर 1956 रोजी दिक्षा दिली होती.

· भद्रावती तालुक्यामध्ये विजासन येथे प्राचीन बुध्दगृहाचे अस्तित्व असून सातवाहन काळाशी याचे सामान्य सांगितले जाते.

·या ठिकाणी ब्राम्ही शिलालेख आढळले आहेत.

· चंद्रपूर जिल्हयातील नागभीड, कानपा- टेनपा या रस्त्यावर सातवाहन काळातील गुंफा आहेत.  एकाच दगडातील कोरलेल्या पाच गुहांना पांडवगुहा म्हटले जाते.

· चंद्रपूरपासून 75 किमी.अंतरावर माणिकगड किल्ला असून नागवंशीय कुळातील राजा गहिलू यांनी हा किल्ला बांधला आहे.

· चंद्रपूर जिल्हयातील हा एकमेव गिरीदुर्ग असून याच्या पायथ्याशी प्राचीन विष्णू मंदीर आहे.

 जिल्हयाची वैशिष्टये
ं चिमूर आॅगष्ट क्रांती 1942
एक अविस्मरणीय क्षण.
    संपूर्ण देश पारतंत्र्यात असताना  चिमूरला स्वातंत्र्य मिळाले आता भारताला स्वातंत्र्य मिळायला वेळ लागणार नाही असे भाषण
डाँ सुभाषचंद्र बोस यांनी
बर्लिन रेडिओ स्टेशनवरून
केले. कारण चिमुकरांनी
इंग्रजाच्या प्रत्येक कुटनितीचा
अभ्यास करून  आपली रणनिती आखली होती.
        इंग्रजांचे कोणतेही
वाहन चिमूरमध्ये येवू नयेत
यासाठी रात्रभर रस्त्यावर
मोठमोठी लाकडे टाकण्यात
आले.
   इंग्रजांच्या छावण्या जिवंत
अधिकार्यासह जाळण्यात
आल्या . त्याचं कारणही तसच होतं कारण माझ्या
आई  ,बहिणीवर ,विद्यार्थ्यावर
अन्याय अत्याचार झाला.
प्राणाची आहुती दिली.
      क्रांतीचा  पहिला शहिद
ठरला बालाजी रायपूरकर.
नागपंचमीचा दिवस होता म्हणून नागफणा बांधण्यात आला.
  सर्व चिमूरकर अन्याया
विरूध्द पेटून उठले आणि
सकारात्मक  क्रांती माझ्या
मातृभूमीत घडली.
· चंद्रपूर जिल्हयाची खरी ओळख येथील ताडोबा अभयारण्य आहे.   नव्या व्याघ्र गणनेनुसार 80 वाघांची संख्या या  प्रकल्पात आहे.

*  चंद्रपूर जिल्हयाला बारमाही वाहणा-या मोठया नदया, नाले आणि 40 टक्के वनाच्छादित प्रदेश आहे. विपूल खनिज संपदा जिल्हयाचे वैशिष्टय आहे.

· हा जिल्हा खनिज, सिमेंट, पेपर, बांबू, कोळसा, लोह आदींच्या उत्पादनाचा, खाणींचा आणि त्यावर आधारीत उद्योगांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

* प्रख्यात समाजसेवक दिवंगत  बाबा आमटे यांचे आनंदवन व सोमनाथ येथील  छावणी  प्रकल्प देशभर प्रसिध्द असून या ठिकाणी भेटी देण्यासाठी  मोठया प्रमाणात देशभरातून मान्यवर व अभ्यासक येत असतात.

·चंद्रपूर येथे महाऔष्णिक विद्युत केंद्र  तसेच कोळशाच्या भूमीगत व खुल्या  खाणी आहेत. कच्चे लोखंड, सिमेंट, कागद आणि बांबूवर आधारित उद्योगांसाठी हा 

 जिल्हा प्रसिध्द आहे.

·महाराष्ट्रातील ग्रामीण व आदिवासी भागातील पहिले शासकीय वैद्यकिय महाविद्यालय  सुरू  झालेला जिल्हा.

·महाराष्ट्रातील दुसरी सैनिकी शाळा व बंगलोरसारखे जागतिक दर्जाचे बॉटनिकल गार्डन विसापूरजवळ उभारले जात आहे.

· चिचपल्ली येथे टाटा ट्रस्टच्या मदतीतून  महाराष्ट्रातील पहिले बांबू  प्रशिक्षण व संशोधन केंद्राची इमारत उभारली जात आहे.

·जिल्हयात चंद्रपूर येथे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह  व मूल येथे मा.सा.कन्नमवार सभागृह ही दोन अद्ययावत प्रेक्षागृह आहेत.

· चंद्रपूर शहरात पदमश्री बाबा आमटेअभ्यासिकेची निर्मिती करण्यात आली असून ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी मदत केली जात आहे.

· जिल्हयातील चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वेस्थानकांना हरित रेल्वेस्थानक म्हणून नवे रुप  देण्यात येत आहे.

·‘हॅलो चांदा’ 18002664401 ही पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा महाराष्ट्रातील पहिली 
 मोबाईल प्रतिसाद  सेवा यंत्रणा चंद्रपूरमध्ये सुरु.

*वर्धा, गडचिरोली नंतर चंद्रपूर या जिल्हयात 2015 पासून संपूर्ण दारुबंदी असून व्यसनमुक्तीकडे जिल्हयाने दमदार वाटचाल केली आहे.

· जिल्हयातील 1500 शाळांचे डिजीटायझेशन झाले आहे. पहिली मुलींची डिजीटल 
शाळा बल्लारपूरमध्ये उभारली जात आहे.
· झाडीपट्टी नाटयपरंपरेसोबतच व्यावसयिक नाटय चहवळीचेही चंद्रपूर केंद्र आहे.

 जिल्हयामध्ये दोन लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. चंद्रपूर आणि 

 गडचिरोली. चंद्रपूर  मतदार संघात वरोरा,  चंद्रपूर, बल्लारपूर, राजूरा, वणी व आर्णी  या
 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

·गडचिरोली मतदार संघात चंद्रपूर जिल्हयातील चिमूर व ब्रम्हपूरी  विधानसभा मतदार संघाचा  तर  गडचिरोली जिल्हयातील गडचिरोली, आरमोरी,  अहेरी व   भंडारा जिल्हयातील  आमगांव विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

· चंद्रपूर जिल्हयात सहा विधानसभा मतदार संघ आहेत.  त्यामध्ये चंद्रपूर, बल्लारपूर,   
राजूरा,  वरोरा, चिमूर व ब्रम्हपूरी  मतदार संघाचा सहभाग आहे.

· बल्लारपूर येथील वनविभागात 275 वर्ष वयाचे 15 मिटर लांबीचे सागाचे लाकूड संरक्षित ठेवण्यात आले आहे.

 तालुके व गावे

15 तालुके  - चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभिड, मूल, ब्रम्हपूरी, सिंदेवाही, सावली,
गोंडपिपरी, पोंभूर्णा, बल्लारपूर, राजूरा, कोरपना व जिवती.
  गावे- 1673

महसूल उपविभागांची नावे

महसूल विभाग- 8 -  चंद्रपूर, बल्लारपूर, राजूरा, गोंडपिपरी, मूल, चिमूर, ब्रम्हपूरी,  वरोरा

 महानगरपालिकेचे नाव – चंद्रपूर

नगरपालिकांची नावे
बल्लारपूर, राजूरा, गडचांदूर, मूल, ब्रम्हपूरी, नागभिड, चिमूर, वरोरा, भद्रावती

नगर पंचायत- सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती 
पंचायत समित्यांची नावे
15- चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागभिड, ब्रम्हपूरी,  सिंदेवाही, मूल, सावली, गोंडपिपरी, पोंभूर्णा, बल्लारपूर, राजूरा, कोरपना व जिवती

 ग्राम पंचायतींची संख्या – 827
जिल्हयातील प्रमुख नद्या 
वर्धा नदी - यवतमाळ व चंद्रपूर जिल्हयाची सिमा ठरवणारी वर्धा ही चंद्रपूर जिल्हयातील प्रमुख नदी असून 147 किलो मिटरचा प्रवास ही नदी जिल्हयातून करते.  जिल्हयातील 15 पैकी 7 तालुक्यातून ही नदी वाहत जात असून मोठया प्रमाणात सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची सोय यामुळे झाली आहे. सद्या या नदीवर 8 उपसा सिंचन प्रकल्प कार्यरत असून शेकडो हेक्टर जमीनचे सिंचन या नदीमुळे होत आहे.

 वैनगंगा नदी- जिल्हयातून वाहणा-या बारमाही  नदीत वैनगंगा नदीचा समावेश होतो. ब्रम्हपूरी, सिंदेवाही, मूल, सावली व गोंडपिपरी  या तालुक्याच्या सिमेवरुन ही नदी वाहत जाते. गडचिरोली व चंद्रपूर जिल्हयाची नैसर्गिक विभागणी  वैनगंगा नदीमुळे झाली आहे. या नदीवर भंडारा जिल्हयातील गोसीखूर्द येथे इंदिरा सागर जलाशयाची उभारणी झाली आहे. या राष्ट्रीय प्रकल्पाचा उजवा कालवा ब्रम्हपूरी ते मुल या तालुक्यातील शेती जलसिंचीत करणार आहे.

 इरई नदी –चंद्रपूर शहर इरई नदीच्या काठावर वसले आहे.  इरई चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे.शहरा लगत या नदीवर मोठे धरण असून त्या धरणातील पाण्याने चंद्रपूर शहराला  पेयजल पुरवठा केला जातो.  या नदीमुळे चंद्रपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.  तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युतप्रकल्पाला याच धरणातून पाणी पुरवठा होतो.

 वनक्षेत्र
जिल्हयात वनक्षेत्र 42 टक्के असून एकूण 3 लक्ष 94 हजार  हेक्टर वनक्षेत्रामध्ये साग, धावडा, ऐन, तेंदू, करु, मोह, बांबू  व इतर वृक्षराजीने नटलेला हा वन परिसर असून प्रत्येक तालुक्यात जंगल आहे. यातील 80.6 टक्के वनक्षेत्र राखीव आहे. तर 18.1 टक्के वनक्षेत्र संरक्षित आहे.

 वन्यजीव

*          जिल्ह्यात ताडोबा अभयारण्यात  वाघाचे वास्तव्य असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. या प्रकल्पात वन्य जीव प्रगणनेनुसार  80 वाघांचे वास्तव्य आहे.

* या शिवाय बिबट, अस्वल, चितळ,चौसिंगा, सांबर, रानगवा, जंगली डुक्कर, बेडकी, डेकर, निलगाय, तडस, रानकुत्रे, मुंगूस, रानमांजर, चांदी अस्वल, रानकोंबडे, मसन्याऊद, ताडमांजर, वानर, मगर, रानससे, लाडंगा, कोल्हा  या व इतरही प्राण्यांचे वास्तव्य आहे.

*          या अभारण्याचे वैशिष्टय येथील पक्षी वैभव देखील आहे. यामध्ये   मोर, पोपट, चंदनेश्वर, सर्पगरुड, मत्सगरुड, घुबड, पिंगळे, रातवा, चक्रवाक, सररुची, थापटया, पटटकांदब, शेकाटया, चमचाबाज, रंगीत करकोचा किंवाचित्रबलाक, सुंदर बटवा, गडवाल, भुवई, लालसरी, काळे कुदळे आणि पांढरे कुदळे, रोहीतपक्षी, मोहळघार, दलदल ससाणा, कापसी, निलमणी, स्वर्गनाचण, पांढ-या भुवईची नाचण, पाणकावळा असे  विविध प्रकारचे स्थानिक व स्थलांतरीत पक्षांचा समावेश आहे.
अभयारण्ये

 *  ताडोबा-अंधारी  हा व्याघ्र प्रकल्प असून या प्रकल्पाचे क्षेत्र 625.40 चौ.किमी. इतके आहे.
हे ठिकाण जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 45‍ किलोमिटर अंतरावर

संकलन , लेखन : वर्षा वरभे
      ✍         चिमूर चंद्रपूर

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.