Skip to main content

कविता आणि गाणी यात काय फरक

मित्रानी आज विचारलं..
असा काय फरक आहे रे गाणं आणि कवितेमधला

मी म्हणालो
मित्रा..

शब्दांचे अर्थ कळले..तर गाणं
आणि दोन शब्दांच्या मधल्या जागांचे अर्थ कळले..तर कविता

'कर्म' म्हणून यमक जुळवलंस.. तर गाणं
आणि 'मर्म' म्हणून यमक जुळवलंस.. तर कविता

'पान' भरण्यासाठी लिहिलंस.. तर गाणं
आणि 'मन' भरण्यासाठी लिहिलंस.. तर कविता

पुरस्कार मिळावा म्हणून लिहिलंस.. तर गाणं
आणि लिहिल्यावर पुरस्कार मिळाला असं वाटलं.. तर कविता

काहीतरी तरी 'सुचलं' म्हणून लिहिलंस.. तर गाणं
आणि काहीतरी 'साचलं' म्हणून लिहिलंस.. तर कविता

थोडक्यात 'जगण्यासाठी' लिहिलंस.. तर गाणं
आणि 'मरण्यासाठी' लिहिलंस.. तर कविता

आता..
तळहातावर घे सप्तरंग.. मग डोळे मिट आणि उधळून टाक दाही दिशांना.. मग डोळे उघड..

तळहाताच्या रेषांवर 'उरलेल्या'
रंगांची नक्षी..म्हणजे गाणं
आणि.. दिशांवर उधळलेल्या रंगांची 'बदलत जाणारी' नक्षी.. म्हणजे कविता

पण.. याही पलीकडे.. एखाद्या क्षितिजाच्या पार..
'सहज' म्हणून एखादं 'गाणं' लिहिता लिहिताच 'अचानक' डोळ्यात पाणी आलं.. तर समज..
झालं आहे एका अस्सल 'कवितेचं' गाणं

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.