*स्पेस शटल डिस्कव्हरीचे पहिले अंतराळगमन*
मानवाला अवकाशात झेपावण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ठ म्हणजे अंतरीक्ष यान होय. मागील ५० वर्षात अमेरिका व रशिया या दोन देशांनी वेगवेगळे अवकाशयाने तयार करून त्यांचा वापर सुर्यमालेतील ग्रहांचा व अवकाशाचा अभ्यास करण्यासाठी केला आहे. अपोलो यानांनी तर थेट चंद्रावर पोहचुन मानवी यशाचा झेंडा रोवला आहे. अशा या अंतरीक्ष यानांच्या मालिकेतील सर्वात आगळे-वेगळे यान म्हणजे अमेरिकेचे स्पेस शटल होय. अवकाश स्थानकांचा विकास व उपग्रह कक्षेत पाठवण्यासाठी स्पेस शटलचा वेळोवेळी वापर करण्यात आला आहे. स्पेस शटल हे विमान आणि रॉकेटचे एकत्रीतपणे तयार केलेले अंतरीक्षयान होते. त्याचा एका अवकाश मोहिमेनतंर परत वापर करणे शक्य होत असे. सुरवातीला चार स्पेस शटलची निर्मिती केली गेली होती म्हणजेच
१) कोलंबिया
२) डिस्कव्हरी
३) अॅटलँटिस
४) चॅलेंजर.
१९८१ साली कोलंबिया या स्पेस शटलने पहिल्यांदा उड्डांन घेतले. चेलेंजर या यानाला १९८६ साली अपघात झाला व त्याच्या जागेवर इंडीएव्हर या नवीन स्पेस शटलचा समावेश करुन घेण्यात आला. त्यानंतर २००३ मध्ये कोलंबिया या यानाला देखील अपघात झाला. स्पेस शटलविषयी थोडं:
१) गडद नारंगी रंगाची टाकी स्पेस शटलच्या मुख्य इंजिनला द्रवरुप हायड्रोजन व ऑक्सीजन इंधन पुरवण्यासाठी असे. दोन पांढर्या रंगाचे रॉकेट्स म्हणजेच सॉलिड रॉकेट बुस्टर्ससह इंधन टाकी जोडलेली असत. ही इंधनाची टाकी फक्त एकदाच वापरली जात असत.
२) सॉलिड रॉकेट बुस्टर्स : दोन पांढर्या रंगाचे रॉकेट्स हे इंधन टाकीच्या दोन्ही बाजुस जोडलेले असत. स्पेस शटलच्या उड्डानानंतर ४६ कि.मी वर गेल्यावर त्यातील इंधन संपल्यानंतर ही दोन्ही रॉकेट्स स्पेस शटलपासुन वेगळी केली जात असे. त्यानंतर त्यात असणार्या पॅराशुटच्या साहाय्याने रॉकेट्स पृथ्वीवर पडल्यानंतर परत वापर करण्यासाठी गोळा केली जात असे.
३) स्पेस शटलचे इंजिन : आत्तापर्यंत सर्वात आधुनिक पद्धतीचे तीन इंजिन स्पेस शटलच्या मागील बाजुस त्रिकोणीय आकारात बसवलेली असत. उड्डाणाच्या वेळी प्रथम उजव्या बाजुचे, नंतर डाव्या बाजूचे व शेवटी दोहामधील तिसरे इंजिन सुरू होत असे. विशिष्ठ कक्षेत पोहचल्यानंतर हे इंजिन बंद होत असे व त्यानंतर इंधन टाकी देखील स्पेस शटलपासुन वेगळी केली जात असे.
४) अंतरीक्षयान : पांढर्या रंगाचे विमानासारखे दिसणारे यान हे मुख्यतः अॅल्युमिनियम पासुन बनलेले होते आणि सुर्यापासुन व वातावरणातील वायुकणांशी घर्षन झाल्यानंतर तयार झालेल्या प्रचंड उष्णतेपासुन सरंक्षण होण्यासाठी त्याभोवती एक विशिष्ठ आवरण असे. यामध्ये अंतराळवीर, अवकाशस्थानकासाठी लागणार्या वस्तू तसेच उपग्रह ठेवलेले असे. इंधनटाकी वेगळी झाल्यानंतर त्या कक्षेतून अंतरीक्षयान मग अंतराळस्थानकाच्या कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळस्थानक व यान एकाच कक्षेत प्रवास करत असतानाच अंतराळवीर स्पेस शटलवरील यंत्रनेचा वापर करून यान अवकाशस्थानकाला जोडले जात असे, यालाच डॉकिंग असे म्हणत. त्यानंतर अंतराळवीर अवकास्थानकात पोहचत असे. एखादा उपग्रह कक्षेत पाठवण्याताना स्पेस शटल याच पद्धतीने ठरावीक कक्षेत पोहचत असे. त्यानंतर अंतराळवीर त्याचा विशिष्ठ पोशाख घालून सोबत नेलेला उपग्रह त्या कक्षेत सोडुन परत पृथ्वीवर येत असे. याचप्रकारे हबल दुर्बिन अवकाशात पाठविण्यात आली होती व वेळोवेळी त्या कक्षेत पोहचून दुर्बिनीला पकडुन दुरूस्ती करण्यात आली होती.
स्पेस शटलचे अपघात :
१) २८ जानेवारी १९८६ रोजी चॅलेंजर या यानाला उड्डाणानंतर ७३ सेकंदांनी उजव्या बाजुच्या रॉकेटमध्ये यांत्रिक बिघाड झाला व त्याचा स्फोट झाला. त्यात ते संपूर्ण यान जळून खाक झाले व त्यात सात अंतराळवीरांचा देखील होता.
२) १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया हे स्पेस शटल अंतराळस्थानकावरून परत पृथ्वीवर येत असताना पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर त्याचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये देखील सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला व त्यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला हिचा समावेश होता. अशाप्रकारे त्या पाच स्पेस शटल्सने १३० पेक्षा जास्त मोहिमा सन १९८१ ते २०१२ या काळात पार पडल्या. त्यात काही उपग्रह आणि ३७ वेळा अंतराळस्थानकाच्या बांधकामासाठी उड्डान घेतले होते. आता सर्व स्पेस शटल्सची निवृत्ती झाली आहे.
[8/30, 8:02 AM] +91 94220 36700: https://youtu.be/DBxvoOKcuB8
*नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र*
दिनांक 21 ऑगष्ट पासून आपणास विज्ञानातील काही संकल्पना सोप्या सोप्या प्रयोगाद्वारे विद्यार्थ्याना कश्या स्पष्ट करायच्या याचे व्हिडीओ नियमित प्रसारित करणार आहोत.
सदर व्हिडीओ ची लिंक टाकण्याचा मूळ उद्देश राज्यातील कानाकोपऱ्याततील विद्यार्थ्यांना अगदी आपल्या डिजिटल वर्गात किंवा पालकांच्या मोबाईल वर सहज बघता यावे याकरिता आहे.
हे व्हिडीओ सहज कायमस्वरूपी उपलब्ध व्हावे म्हणून यु ट्यूब वर टाकलेले आहे.
नियमित व्हिडीओ बघायचा असल्यास subscribe वर क्लीक करू शकता.(ऐच्छिक)
*नाविन्यपूर्ण प्रयोगांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे?*
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक तालुक्यात 1 किंवा 2 प्रयोगशाळा आपल्या तालुका अंतर्गत जिल्हा परिषद किंवा नगर परिषद शाळांमध्ये उभारल्या आहेत.विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आपण आपल्या तालुक्यातील गटसाधन केंद्रांतर्गत विज्ञान विषयाच्या विषयसाधनव्यक्ती/विषयतज्ज्ञ यांचेशी संपर्क साधावा ही विनंती.
व्हिडीओ आवडला तर इतरांना पण जरूर शेयर करावा .
📹निर्मिती-सर्व शिक्षा अभियान महाराष्ट्र
-व्हिडीओ प्रेषक-
श्रीनाथ वानखडे
विषयतज्ज्ञ /विषयसाधन व्यक्ती
गटसाधन केंद्र पं.स.चांदुर रेल्वे जि.अमरावती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🦋आजची माहिती*🦋
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹💜🔹💜🔹💜🔹💜🔹♦🔹📙 *कर्करोग / कॅन्सर म्हणजे काय ?* 📙
***********************************
कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अंगावर शहारे आणतो. कॅन्सरचा आणि मृत्यूचा कोठेतरी संबंध आहे, हे मनात दडलेले असते हे याचे कारण. कर्करोगापेक्षा कॅन्सर हाच शब्द सहजगत्या वापरला जातो, नाही का ?
कॅन्सरविरोधी लढाई ही खरे म्हणजे हरणारी लढाई असते, असा प्रचलित समज आहे. रक्ताचे काही कॅन्सर, कातडीचे काही कॅन्सर, स्तनाचे व गर्भाशयमुखाचे काही कॅन्सर लवकर लक्षात आले तर ही लढाई जिंकता येते, हे अलीकडे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. पण अन्यथा या बाबतीत डॉक्टर शब्द वापरतात 'सर्व्हायवल रेट' हा म्हणजेच ते रोगाच्या राहिलेल्या वर्षांचा हिशोबच उलगडत असतात.
आपल्या शरीरातील असंख्य प्रकारच्या पेशी त्यांना दिलेली कामे निमूटपणे करत असतात. पण अचानक त्यांतील काही बंड करतात. त्यांचा आकार वेडावाकडा वाढू लागतो. त्यांना नेमून दिलेली कामे होईनाहीशी होतात. त्यांची शरीराला अडचण होऊ लागते. अन्य अवयवांचे काम करायला त्यांचा अडथळा येऊ लागतो. या अडथळ्यांचाच एक परिणाम म्हणजे वेदना. जसजसे विविध प्रमुख अवयवांचे अडथळे वाढतात, तसतसे शरीर साथ देईनासे होते. यातुनच मृत्यू ओढवतो.
आपल्या शरीरात रक्तरस म्हणजे लिम्फ नावाचा रस सर्वत्र रक्तरसवाहिन्यांतून वाहत असतो. कॅन्सरच्या पेशींचा या वाहिन्यांतून फैलाव सगळ्या शरीरभर होऊ शकतो. जेथे फैलाव होईल, तेथे त्यांची पुन्हा वाढ होऊ लागते. ज्यावेळी यकृत, फुप्फुस, प्लीहा, मेंदू या जागा या पेशींनी व्यापल्या जातात, तेव्हा संपूर्ण शरीराचेच कार्य बंद पडू लागते.
शरीरातील पेशी अशा का बंड करून उठतात, याचा अजून आपल्याला पत्ता नाही. पण त्यांना बंड करायला प्रवृत्त करणाऱ्या वस्तूंना आपण कार्सिनोजन्स व कॅन्सरकडे प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी म्हणून संबोधतो. उदारणार्थ, डांबर व त्यापासून बनणाऱ्या पदार्थाने कातडीचे कॅन्सर होतात, क्ष-किरणांमुळे कातडीचे व रक्तातील पेशींचे कॅन्सर होतात, तंबाखूमुळे तोंडातील कॅन्सर होतात, तर धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सारख्याच वातावरणात त्याच वस्तूच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कॅन्सर होतोच, असे नव्हे; तर त्या वातावरणात न येणाऱ्यांपेक्षा या गटातील लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते.
आज घटकेला जगातील अनेक प्रमुख संशोधन संस्थांतून कॅन्सरविरोधी औषधांबद्दल संशोधन केले जात आहे. त्यासाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसाही ओतला जात आहे. पण नेमका प्रतिबंध व नेमका इलाज सापडणे खूपच दूर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या व वापरात असलेल्या इलाजांमध्ये मुख्यत: बंड करणाऱ्या पेशींवर औषधाचा मारा करून त्यांचा नाश करण्याची उपाययोजना आखली जाते. पण अनेकदा या इलाजामध्ये निरोगी पेशीही नष्ट होतात. त्यामुळे रुग्णाची तब्येत अधिकच त्रास देऊ लागते.
कॅन्सरविरोधी इलाज म्हणून एका औषधाकडे आशेने पाहिले जाते. ते म्हणजे इंटरफेराॅन. रक्तातील गॅमाग्लोब्युलिनपासून हे औषध तयार करून वापरले जाते. पण त्याची किंमत व निर्मिती हा त्याच्या वापरातील प्रमुख अडथळा आहे.
काही वर्षांपूर्वी फक्त कॅन्सरच्या पेशी टाकू काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करणे एवढाच इलाज होता. त्यानंतरचा इलाज म्हणजे क्ष किरणांचा एकत्रित मारा ठराविक डोसमध्ये करणे. यानंतर कोबाल्ट किरणांचा मारा करण्याची पद्धत सुरू झाली. पण नंतर प्रगत औषधे जशी उपलब्ध झाली आहेत, तसे शरीरभर पसरत गेलेल्या कॅन्सरपेशींवर नियंत्रण घालणे शक्य होऊ लागले. विशेषत: रक्ताचा कॅन्सर, रक्तामार्फत पसरणारे कॅन्सर यांवर ही औषधे वापरणे आता सुरू झाले आहे.
कॅन्सरच्या संदर्भात नवनवीन औषधांचा वापर करताना त्याच्या दुष्परिणामांची माहिती रुग्णांना दिली जाते. त्यांची परवानगी घेतली जाते व मगच इलाज केले जातात. यामध्ये अनेकदा औषधांचा वापर प्रथम करण्याची वेळ येते व रुग्णांना प्रथमच वापरले जाणारे औषध त्याचे दुष्परिणाम किंवा मृत्यू यातील एकाची निवड करावयाची असते.
'सृष्टी विज्ञानगाथा'
मूलद्रव्यांची यादी
१ हायड्रोजन H
२ हेलियम He
३ लिथियम Li
४ बेरिलियम Be
५ बोरॉन B
६ कार्बन C
७ नायट्रोजन N
८ ऑक्सिजन O
९ फ्लोरिन F
१० निऑन Ne
११ सोडियम Na
१२ मॅग्नेशियम Mg
१३ ॲल्युमिनियम Al
१४ सिलिकॉन Si
१५ फॉस्फरस P
१६ सल्फर S
१७ क्लोरिन Cl
१८ आरगॉन Ar
१९ पोटॅशियम K
२० कॅल्शियम Ca
२१ स्कॅन्डियम Sc
२२ टायटेनियम Ti
२३ व्हेनेडियम V
२४ क्रोमियम Cr
२५ मँगेनीज Mn
२६ लोखंड Fe
२७ कोबाल्ट Co
२८ निकेल Ni
२९ तांबे Cu
३० जस्त Zn
३१ गॅलियम Ga
३२ जर्मेनियम Ge
३३ आर्सेनिक As
३४ सेलेनियम Se
३५ ब्रोमिन Br
३६ क्रिप्टॉन Kr
३७ रुबिडियम Rb
३८ स्ट्रॉन्शियम Sr
३९ इट्रियम Y
४० झिर्कोनियम Zr
४१ नायोबियम Nb
४२ मॉलिब्डेनम Mo
४३ टेक्नेटियम Tc
४४ रूथेनियम Ru
४५ र्होडियम Rh
४६ पॅलॅडियम Pd
४७ चांदी Ag
४८ कॅडमियम Cd
४९ इंडियम In
५० कथील Sn
५१ अँटिमनी Sb
५२ टेलरियम Te
५३ आयोडिन I
५४ झेनॉन Xe
५५ सीझियम Cs
५६ बेरियम Ba
५७ लँथेनम La
५८ सिझियम Ce
५९ प्रासिओडायमियम Pr
६० नियोडायमियम Nd
६१ प्रोमेथियम Pm
६२ समारियम Sm
६३ युरोपियम Eu
६४ गॅडोलिनियम Gd
६५ टर्बियम Tb
६६ डिस्प्रोझियम Dy
६७ होल्मियम Ho
६८ अर्बियम Er
६९ थूलियम Tm
७० इट्टरबियम Yb
७१ लुटेटियम Lu
७२ हाफ्नियम Hf
७३ टॅन्टॅलम Ta
७४ टंग्स्टन W
७५ र्हेनियम Re
७६ ऑस्मियम Os
७७ इरिडियम Ir
७८ प्लॅटिनम Pt
७९ सोने Au
८० पारा Hg
८१ थॅलियम Tl
८२ शिसे Pb
८३ बिस्मथ Bi
८४ पोलोनियम Po
८५ एस्टाटाइन At
८६ रेडॉन Rn
८७ फ्रान्सियम Fr
८८ रेडियम Ra
८९ ऍक्टिनियम Ac
९० थोरियम Th
९१ प्रोटॅक्टिनियम Pa
९२ युरेनियम U
९३ नेप्चूनियम Np
९४ प्लुटोनियम Pu
९५ अमेरिसियम Am
९६ क्यूरियम Cm
९७ बर्किलियम Bk
९८ कॅलिफोर्नियम Cf
९९ आइन्स्टाइनियम Es
१०० फर्मियम Fm
१०१ मेन्डेलेवियम Md
१०२ नोबेलियम No
१०३ लॉरेन्सियम Lr
१०४ रुदरफोर्डियम Rf
१०५ डब्नियम Db
१०६ सीबोर्जियम Sg
१०७ बोहरियम Bh
१०८ हासियम Hs
१०९ माइट्नरियम Mt
११० डार्मस्टॅटियम Ds
१११ रेन्ट्जेनियम Rg
११२ कोपर्निकम Cn
११३ अनुनट्रियम Uut
११४ अनुनक्वेडियम Uuq
११५ अनुनपेन्टियम Uup
११६ अनुनहेक्झियम Uuh
११७ अनुनसेप्टियम Uus
११८ अनुनॉक्टियम Uuo
🌎🌍🌏🌎🌍🌏🌎