Skip to main content
*पु. ल.यांच्या शब्दांत...!!*

शून्यातून विश्व,
कां विश्वातून शून्य..!!

टू रुम किचनचा
एखादा फ्लॅट...

दोन चार एकरचं
फार्म हाऊस,..

एखादी चार चाकी गाडी
आणि भौतिक वस्तूंचं
प्रदर्शन मांडता आलं, की
आपण म्हणतो...

अमक्या- तमक्यानं
शून्यातून विश्व
निर्माण केलं...!!

म्हणजे होतंय कांय, की
सुख मिळेल, या आशेनं
माणूस श्रीमंत होण्यासाठी
धडपडतोय, पण सुखी
कांही दिसत नाही...!!

आपणचं म्हणतो, की
आमच्या लहानपणी खूप
मजा यायची...

खूप करमायचं,
घर भरलेलं असायचं...

दिवस कधी मावळायचा
ते कळायचंच नाही ....!!

मग आता
कांय झालं ???

मजा कुठं गेली ??

एकटं एकटं
कां वाटतं...??

छातीत धडधड
कां होते...??

कशामुळं
करमत नाही ...??

कारण......

"विश्व निर्माण करण्याची"
व्याख्या कुठंतरी चुकली.. !!

विश्व निर्माण करणं
म्हणजे....

नाती गोती
जपणं...

छंद जोपासणं...

पाहुणे होऊन
जाणं...

पाहुण्यांचं स्वागत
करणं...

खूप गप्पा
मारणं...

घराच्या उंबऱ्यात
चपलांचा ढिग
दिसणं....

खळखळून
हसणं...

आणि...

काळजातलं
दुःख सांगून
मोकळेपणानं
रडणं...!!!

या गोष्टी आपण प्राप्त
करू शकलो, तर ....

"शून्यातून विश्व
निर्माण केलं"
असं म्हणावं....

तुम्हीच सांगा...

आपल्या आयुष्यांत या
सर्व गोष्टींची वाढ झाली,
की घट झाली .....???

तुमचं खरं दुःख तुम्ही
मोकळेपणानं किती
जणांना सांगू शकता ???

असे किती मित्र, शेजारी,
नातेवाईक आपण निर्माण
करू शकलो...????

खूप कमी,
किंबहूना नाहीच.. !!!

मग आपण
"विश्व निर्माण"
केलं कां..???

तर नाही....

मित्रहो,

रजिस्ट्रीच्या कागदाच्या
फायली म्हणजे विश्व...???

भौतिक साधनांची रेलचेल
म्हणजे विश्व ...???

नाही....!!

लॉकरमध्ये ठेवलेले
हिरे मोत्यांचे दागिने
म्हणजे विश्व.....???

मुखवटे घातलेल्या
चेहऱ्यांची गर्दी
म्हणजे विश्व....???

नाही...!!

हे समजून
घ्यावं लागेल ....!!!

मोठं बनण्याच्या 
दडपणामुळं...

आणि मग कामाच्या
व्यापामुळं.....

नाती दूर जाणार
असतील,.....

इतरांना तुच्छ लेखण्यामुळं
आणि अहंकारामुळं माणसं
जवळ येणार नसतील...

दुःख सांगायला,
मन हलकं करायला
जागांच उरणार नसेल,
तर.....

आम्ही शून्यातून
विश्व निर्माण केलं, 

की...

विश्वातून शून्य...?????

🌼🌼🌼🌼🌼🌼
( पु ल.च्या एका‌ संग्रहातून )

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.