ध्वनी दर्शक शब्द
1. कावळा - कावकाव
2. कुत्रा - भुंकणे, केकाटणे, गुरगुर
3. कोकिळ- कुहूकुहू, गाणे
4. कोल्हा - कोल्हेकुई
5. कोंबडा - आरवणे, कुकूचकू करणे
6. कोंबडी - पकपक, पक पक पकाक पक
7. गाढव - खिंकाळी, ओरडणे, रेंकणे
8. गाय-म्हैस - हंबरणे
9. घोडा - खिंकाळी, फुरफुर
10. चिमणी - चिवचिव
11. डास - गुणगुणणे
12. डुक्कर - घुरघुर, गुरगुर
13. तरस - हसणे
14. दयाळ - गाणे
15. पारवा - घुमणे, गुटरगूं
16. पाल - चुकचुक
17. बदक : पकपक
18. बुलबुल - गाणे
19. बेडूक - डराव डराव
20. बैल-रेडा - डुरकणे
21. भुंगा - गूं गूं करणे, गुंजारव, गुंजन
22. मांजर - म्यावम्याव
23. माणूस - आकांत करणे, आक्रोश करणे, टाहो फोडणे, मुसमुसणे, रडणे, रुदन, विलाप, स्फुंदणे,
24. माशी - घोंघावणे
25. मूल - आक्रंदन, आक्रोश, आरोळी देणे, ओरडणे, किंचाळी मारणे, टाहो फोडणे, बोंब मारणे, मुसमुस, हंबरडा फोडणे,
26. मैना - गाणे
27. मोर - टाहो किंवा केका
28. रातकिडा - किरकिर
29. वाघ - डरकाळी
30. शेळी-मेंढी - बें बें
31. साप, नाग - फुस्स करणे, फिसकारणे
32. सिंह - गर्जना
33. हत्ती - चित्कार
वाहनांचे आवाज
1. आगगाडी - झुकझुक, धाड धाड
2.आगगाडीचे इंजिन - कूऽऽक
3. घाट चढणारा ट्रक - रें रें
4. मोटार = पों पों करणे, पम् पम् करणे, पीप पीप करणे
5. गालात मुस्काडीत मारण्याचा आवाज - फाडकन
6. पाठी धपाटा घालण्याचा आवाज - धप्प्कन
7. धबधबा - धो धो
8. पाऊस - रिमझिम, झिमझिम, रिपरिप, धो धो
9. वारा - घोंघावणे, फोफावणे, सूं सूं
10. शिपायाची शिट्टी - फुर्र
दार : कुरकुर
11. पाऊस :टपटप टपटप
प्राणी/पक्षी शब्द
1. वाघाची - डरकाळी
2. कोल्हयांची - कोल्हेकुई
3. गाईचे - हंबरणे
4. गाढवाचे - ओरडणे
5. घुबडाचा - घूत्कार
6. घोडयाचे - किंचाळणे
7. चिमणीची - चिवचिव
8. कबुतराचे/पारव्याचे - घुमणे
9. कावळ्याची - कावकाव
10. सापाचे - फुसफुसने
11. हत्तीचे - चित्कारणे
12. हंसाचा - कलख
13. भुंग्यांचा, मधमाश्यांचा - गुंजारव
14. माकडांचा - भुभु:कार
15. म्हशींचे - रेकणे
16. मोराचा - केरकाव
17. मोरांची - कैकावली
18. सिंहाची - गर्जना
19. पंखांचा - फडफडाट
20. पानांची - सळसळ
21. डासांची - भुणभुण
22. रक्ताची - भळभळ
ध्वनिदर्शक शब्द
1. पाण्याचा खळखळाट
2. वाघाची डरकाळी
3. घंटांचा घणघणाट
4. हंसाचा कलरव
5. कोल्याची कोल्हेकुई
6. माकडाचा भुभुःकार
7. गाढवाचे ओरडणे
8. मोरांची केकावली
9. चिमणीची चिव चिव
10 मुंग्यांचा गुंजारव
11. मधमाशांचा गुंजारव
12. सापाचे फूस फुसणे
13. पानांची सळसळ
14. पंखांचा फडफडाट
15. तारकांचा
चमचमाट
16. पैंजणांची छुमछुम
17. घोड्याचे खिंकाळणे
18. पाण्याचा खळखळाट
19. तलवारींचा खणखणाट
20. पक्ष्यांचा मंजुळ आवाज किलबिल
21. पक्ष्यांचा किलबिलाट
23. बेडकाचे डरावणे / डरकणे / डराव डराव
24. विजांचा कडकडाट
25. म्हशीचे रेकणे
26. घुबडाचा घुत्कार
27. कबुतराचे / पारव्याचे
घूमने
28. कोकिळेचे कुहू कुहू
29. अश्रूंची घळघळ
30. बांगड्यांचा किणकिणाट
31. रक्ताची भळभळ
32. पावसाची रिमझिम / रिपरिप
33. कावळ्याची काव काव
34. मांजरीचे
म्यॅव म्यॅव
35. हत्तींचे चीत्कारणे
36. कोंबडयाचे आरवणे
37. पक्षांचे
कलकलाट
38. कुत्र्याचे भुंकणे
39. गाईचे हंबरणे
40. मोराचा
केकारव
41. ढगांचा गडगडाट
42. नाण्यांचा छनछनाट
43. सिंहाची गर्जना
44. डासांची भुणभुण
Comments
Post a Comment