Skip to main content

भारताचे प्रेरणादायी - विश्वास नांगरेपाटील (IPS)

भारताचे प्रेरणादायी
#Inspirational Of India

 🌈  दुसरे पुष्प  🌈

 *#मा. श्री विश्वास नांगरेपाटील,(IPS)
*पोलीस आयुक्त, नाशिक.
*महाराष्ट्र राज्य, भारत.

 ✒️  संकलन व लेखन  
*@ शिवश्री_लक्ष्मण_काटेकर
*#७५८८०२०८८६
*#Shivnitee@gmail.com
  
          स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या होतकरु विद्यार्थी मित्र/मैत्रिणींसाठी आम्ही आज अशीच प्रेरणादायी माहिती घेवून आलो आहोत. 
       विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म दि. ०१ जून, १९७३ रोजी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरूड गावी झाला. त्यांचे वडील नारायण नागरे पाटील हे गावाचे सरपंच होते. 
      एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांचा महाराष्ट्रातील तरुणाई पुढे आदर्श आहेत. विश्‍वास यांच्‍या आयुष्‍यात त्‍यांच्‍या पत्नी रुपालीताई यांचे सहकार्य, पाठबळही आहे. नवऱ्याची मैत्रीण, सहकारी म्हणून सक्षमपणे त्‍या आपली भूमिका पार पाडतात. आज आम्ही आपल्यासाठी विश्‍वास नांगरे-पाटील आणि रुपाली यांच्‍याविषयी रंजक माहिती घेऊन आलो आहोत. विश्‍वास नांगरे पाटील यांचे करिअर व वैवाहिक जीवनाची सुरूवातच औरंगाबादेतून झाली. आयपीएस झाल्यावर १९९९ मध्ये त्यांची प्रोबेशनवर पहिली बदली औरंगाबाद जिल्ह्यात झाली. फुलंब्री, कन्नड आणि सिल्लोड या विभागात त्यांनी काम केले. कन्नडचे कल्याण औताडे यांच्याशी विश्‍वास यांची मैत्री झाली. त्यांनीच पद्माकर मुळे यांची मुलगी रूपालीताई ह्यांच्या लग्नाचा प्रस्ताव आणला होता. कल्याण औताडे यांनी मुळे कुटुंबीयांशी बोलणी करून मुलगी पाहण्याचा कार्यक्रम निश्चित केला. विश्वास त्‍यांच्‍या मित्रांसोबत मुलगी बघायला गेले. मुलगी बघण्‍याच्‍या कार्यक्रमात रुपालीताई यांना काही वेळच विश्‍वास यांच्‍या समोर येता आले. त्‍यामुळे पहिल्‍या भेटीत या दोघांमध्‍ये फार बोलणे झाले नाही. पाहण्यासाठी चौघे आलेले असल्यामुळे नेमका मुलगा कोणता, असा प्रश्न रूपालीताई यांना पडला होता. यामुळे पुन्हा दुसर्‍या दिवशी भेटण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार रूपालीताई एका नातेवाइकासोबत कॅफे हाऊसमध्ये भेटण्यासाठी आल्या. या वेळी दोघांनी तब्बल तासभर चर्चा केली.
        नांगरे पाटील यांच्या वडिलांना मराठवाड्यातील मुलगी मान्य नव्हती. कोल्हापूर, सांगली किंवा सातार्‍याची मुलगी सून म्हणून आण, असा खाक्याच त्यांनी दिला होता, पण अखेर विश्वासराव यांच्या पसंतीला मान देत वडिलांनी लग्नाला होकार दिला. अशा त्यांच्या पत्नी सौ रुपालीताई नांगरेपाटील आहेत. आणि या उभयतांना जान्हवी आणि रणवीर असे दोन अपत्य आहेत.
         विश्वास नांगरेपाटील आपले शालेय शिक्षण तालुक्यातील विद्यालयात पूर्ण केले आणि ते कोल्हापूरच्या  शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात बी.ए. ची परीक्षा सुवर्ण पदक पटकावून उत्तीर्ण झाले.  उस्मानिया विद्यापीठातून एम.बी.ए. ची पदवी घेऊन त्यांनी पुढे प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली. आपल्या शालेय जीवनात विश्वास नांगरे पाटील हे खूप हुशार होते. दहावी मध्ये असताना त्यांचा तालुक्यात पहिला क्रमांक आला होता.महाविद्यालयात असताना बारावीला चांगले गुण मिळाले असताना देखील विश्वास नांगरे पाटील यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी अभियांत्रिकी ला न जाता कला शाखेला प्रवेश घेतला होता.महाविद्यालयात असताना त्यांना महाविद्यालयाचा उत्कृष्ट विद्यार्थी हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
            ‘पहेलवानाचा तू मुलगा, गुंडच होणार.’ हे शब्द अवघ्या सहाव्या इयत्तेत असणा-या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईंनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निर्माण करायची’ या जिद्दीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा आज अवघ्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. खाकी वर्दीवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी आज हा ‘विश्वास’ जीवाचे रान करत आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विश्वास नांगरे-पाटील यांनी १९९७ ला कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयातून ‘बी.ए’ पूर्ण केले. नंतर मुंबईत येऊन आयपीएस केले. लातूर आणि नांदेडला पोलिस अधीक्षक म्हणून काम करीत असतानाच विश्वास नांगरे-पाटील यांनी एम.ए. पूर्ण केले. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी एकाचवेळी उपजिल्हाधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि आयपीएस अशी तीन पदे मिळवणारे विश्वास नांगरे-पाटील हे एकमेव अधिकारी ठरले.लातूर आणि नांदेडबरोबरच विश्वास नांगरे-पाटील यांनी ठाणे ग्रामीण भागात पोलिस अधीक्षक म्हणून काम करताना आपला वेगळा ठसा निर्माण केला.
               पुणे जिल्हा ग्रामीण पोलीसदलात अधीक्षक असताना पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात केलेल्या कारवाईमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले. पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावातील शेतात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर दि ४ मार्च २००७ ला छापा टाकून २८७ तरुण-तरुणींना(२१ तरुणीं) अटक केली होती.प्रयोगशाळेत झालेल्या रासायनिक पृथक्करण अहवालानुसार त्यातील २४९ जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले होते.
           २६/११ च्या मुबंई हल्ल्याच्यावेळी ताजमहाल हॉटेलमध्ये पोहचणाऱ्या पहिल्या अधिकाऱ्यांपैकी ते एक होते. ताज हॉटेल मध्ये दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी आत शिरणारे ते पहिले पोलीस अधिकारी होते. सोबत फक्त दोन कॉन्स्टेबल आणि एक अंगरक्षक तसेच अंगावर सुरक्षाकवच(बुलेटप्रुफ जाकीट) नसतांनाही ते गोळीबार सुरू असलेल्या ताजमध्ये शिरले. प्रतिकारासाठी त्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. दहशतवाद्यांचा पाठलाग करत ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले. त्यांच्या या कारवाईने दहशतवाद्यांना ताजमहाल हॉटेल नवीन इमारतीत जाण्यापासून रोखले. त्यानंतर नांगरे-पाटील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले व सीसीटीव्हीच्या मदतीने दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती वरिष्ठांना देत राहीले. सकाळी सात वाजता एनएसजीचे कमांडो कारवाईत प्रत्यक्षात सहभागी होईपर्यंत विश्वास नांगरे-पाटील यांची लढाई सुरूच होती. विश्वास नांगरे-पाटील हे नाव घेतले की, नजरेसमोर उभे राहते ते ‘२६/११’च्या ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याचे चित्र. ‘ताज’मध्ये दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आणि जीवाची पर्वा न करता नांगरे-पाटील आपल्या सहका-यांसह सर्वप्रथम ‘ताज’कडे सरसावले. ‘लिओपोल्ड’वर हल्ला करून दोन दहशतवादी ज्या मार्गाने ‘ताज’मध्ये घुसले होते, त्यांच्यापाठोपाठ घुसण्याची हिंमत नांगरे-पाटील यांच्या पथकाने दाखवली.
   दहशवाद्यांच्या अत्याधुनिक शस्त्रांनाही न जुमानता नांगरे-पाटील पुढे सरसावत राहिले. ‘ताज’च्या तांत्रिक विभागात धाडसाने पोहोचून त्यांनी तेथील सीसीटीव्हीवरील फुटेजवरून आपल्या वरिष्ठ अधिका-यांना दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती पुरवली. पोलिस आणि इतर जवानांच्या मोठया पराक्रमाने दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात आले.
या थरारक ‘लढाई’त विश्वास नांगरे-पाटील हे नाव चांगलेच गाजले. ‘२६/११च्या हल्ल्याप्रसंगी मला माझ्या पत्नी आणि मुलांपेक्षाही दहशतवाद्यांचा मुकाबला करणे महत्त्वाचे वाटले. मी कारण निवडले आणि पुढे सरसावलो,’ असे विश्वास नांगरे-पाटील सांगतात. पोलिस अधिकारी म्हणून चोख कामगिरी बजावणा-या खाकी वर्दीतील या आदर्शवत पोलिस अधिका-यात एक ‘माणूस’ही दडला आहे.
       सामाजिक जाणिवेतून जगणारे आणि तशा पद्धतीने प्रत्येक नागरिकांनी जगावं, यासाठी आग्रही असणारे विश्वास नांगरे-पाटील पर्यावरणप्रेमीही तेवढेच आहेत. विविध वृक्षारोपण उपक्रमांतून त्यांनी आपल्या पर्यावरणावरील प्रेमाची भूक भागवण्याचा प्रयत्न कायम करत असतात. सर्वसामान्य तरुणांबरोबरच पोलिस दलातील कर्मचा-यांमध्येही विश्वास नांगरे-पाटील ‘लाडके’ पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जातात.
          वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचं तरुणांना मोठं आकर्षण आहे . याबाबतचे किस्से अनेकदा समोर आले आहेत . आता एका कॅन्सरग्रस्ताने व्यक्त केलेल्या इच्छेमुळे पुन्हा याचा प्रत्यय आल्याचं पाहायला मिळालं . सागरे बोरसे या तरुणानं आयपीएस होण्याचं स्वप्न पाहिलं . पण कॅन्सरच्या आजारानं त्याचा घात केला . सध्या सागरवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत . उपचारादरम्यान शस्त्रक्रिया करण्याआधी सागरने एक इच्छा व्यक्त केली , जी तिथल्या डॉक्टर्सने क्षणाचाही विलंब न लावता पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं . सागरची इच्छा होती ज्या व्यक्तीकडे पाहून त्याने आयपीएस होण्याचं स्वप्न पाहिल्या त्या विश्वास नांगरे पाटील यांना भेटण्याची . रुग्णालयातील डॉक्टर्सने ताबडतोब हालचाली करत सागरची इच्छा नांगरे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवली . त्यानंतर नांगरे पाटील यांनीही आपल्या कामातून वेळ काढत सागरला भेटायचं ठरवलं .
        पारध्यांशी सामना करताना शहीद झालेल्या अंकुश धावडे या पोलिस कर्मचा-याच्या नावाने सुरू केलेली जिम्नॅशियम, सततच्या दगदगीत कुटुंबापासून दूर असणा-या ‘पोलिस’ नावाच्या माणसालाही थोडंसं कुटुंबासाठी जगता यावं, म्हणून नांगरे-पाटील यांनी पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू केलेली ‘सहल योजना’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.
          तरुणांमध्ये विश्वास नांगरे-पाटील नावाचे एक आकर्षण निर्माण झाले आहे. ‘मला सत्यासाठी संघर्ष करायचाय, त्यासाठी माझी नरकात जायचीही तयारी आहे, पण हे करताना ‘कारण’ स्वर्गीय असले पाहिजे,’ असे म्हणणारे विश्वास नांगरे-पाटील एक आगळी-वेगळी ‘स्फूर्ती’च म्हणावी लागेल. प्रत्येक तरुणाला आज ‘विश्वास नांगरे-पाटील’ व्हावंसं वाटतं!

त्यांची कारकीर्द बाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊ
      १) अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक(अज्ञात दिनांक - २८ नोव्हेंबर २००५)
      २) पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक(दि २९ नोव्हेंबर इ.स. २००५ - ३ जून इ.स. २००८)
      ३) मुंबई पोलीस दल उपायुक्त (दि ४ जून इ.स. २००८ पासून )
       ४) ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
       ५) अप्पर पोलीस आयुक्त, मुंबई दक्षिण विभाग
        ६) नाशिक पोलिस आयुक्त (२ मार्च २०१९ पासून)
     यासोबतच अतिरिक्त कारभार देखील त्यांनी सांभाळून देशहिताची सेवा करत आहेत. त्यांना राष्ट्रीय पातळीवरील आपल्या कार्याबद्दल पुरस्कार राष्ट्रपती शौर्य पदक - २०१३ साली सन्मानित करण्यात आले होते. तसेच इतर सन्मान देखील वेगवेगळ्या स्वरूपात आजपर्यंत अनेक वेळा त्यांना मिळालेले आहेत.
       अशा सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व परीक्षार्थींना आदर्श मार्गदर्शन करण्यात त्यांना खूप आनंद मिळतो, अशा प्रकारच्या कार्य करणारे विश्वास नांगरेपाटील साहेब ह्यांना मानाचा मुजरा करत त्यांच्या भविष्यात हातून असेच उत्कृष्ट कार्य घडत राहो, ह्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!.....
       त्यांनी कोरोनाच्या प्रादुर्भाव होत असताना स्वतः नाशिक जिल्ह्यासह विभागातील सर्व कार्यक्षेत्रात उत्कृष्ट नियोजन करत आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मा विश्वास नांगरेपाटील यांना पुढील कार्यासाठी खूप खुप शुभेच्छा!!!....
     आम्हाला अभिमान आहे, कारण अशा महान आदर्श अधिकारी ह्यांचा मी गेली १० वर्षांपासून एक मित्र आहे. 
       स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या सर्व मित्र/मैत्रिनींनो छोट्याशा अपयशाने खचून जाऊ नका, परिस्थितीचा बाऊ करु नका. तुम्ही अधिकारी होण्याचे जे ध्येय निश्‍चित केले आहे, त्या मार्गावर प्रामाणिकपणे वाटचाल करा, यश तुमची वाट पाहत आहे…..भविष्यातील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!


Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.