मालोजीराजे बाबाजीराजे भोसले -छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा.
बाबाजीराजे भोसले यांचे जेष्ठ चिरंजीव मालोजीराजे भोसले ह्यांचा जन्म साधारण 1552 झाल्याचे नोंद आढळते. ते मूळचे वेरूळ येथे राहणारे कुटुंब होते.
मालोजीराजांचे लग्न फ़लटण परगण्यातील देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते. मालोजीराजे व दिपाबाई यांना वाईट वाटत होते कारण अनेक दिवस पुत्र जन्म झाला नव्हता आणि दिपाबाईला अनुक्रमे १५९४ व १५९७ ला दोन मुले झाली. त्यांची अनुक्रमे नावे शहाजीराजे व शरीफजीराजे अशी ठेवण्यात आली. पुढे शहाजीना संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.
भोसल्यांच्या कुळातील सर्वप्रथम कर्तबगार पुरुष म्हणून मालोजीराजे ह्यांना ओळखले जाते. त्यांनी आपली कर्तबगारी अनेक लढायातून दाखवली आहे. बाबाजीराव भोसले यांचे चिरंजीव मालोजीराजे भोसले हे पराक्रमी, युद्धप्रसंगी दाखवायची बुद्धिमत्ता असलेले व उत्तम प्रशासक होते. भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते पिंडीला अभिषेक करण्यात आला, ह्यातूनच स्त्री सन्मान करण्याचे आदर्श मालोजीराजे ह्यांनी केल्याचे दिसून येते. मंदिराच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो. मालोजीनी साताऱ्यातील श्रीशिखरशिंगणापूरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधून तलाव तयार केला आणि यात्रेकरूंचा दुवा मिळवला. निजामशाहीने औरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’अशा दोन पेठा भोसले घराण्याच्या नावे वसवल्या. मालोजीचा पराक्रम वाढतच गेला. आपल्या कामगिरीने मालोजीनी बुऱ्हाणपूरच्या निजामाचा विश्वास संपादन केला. त्यामुळे सरहद्दीवरील इंदापूरच्या बाजूच्या शत्रूचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवली. या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवून मालोजी रणक्षेत्रावर मरण पावले. भोसले घराण्यातील वीराच्या पराक्रमाचे ’पहिले स्मारक’ मालोजीच्या छत्रीच्या रूपाने इंदापूरला बांधले गेले.
दरम्यानच्या काळात शहाजीराजांचे लग्न जमवणे साठी मालोजीराजेंचा मुलगा शहाजीराजे व लखुजी जाधवाची मुलगी राजमाता जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळत असत. पण घरातील विरोधामुळे लखुजींनी संबंध नाकारले. मालोजीराजेंला कमी लेखले गेले. मालोजीराजे पुन्हा वेरूळला आले. तिथे त्यांनी खोदकाम करताना द्रव्याने भरलेला हंडा सापडला. त्यातून मालोजीराजेंनी हजारो घोडे घेतले व आपली फौज तयार ते करून सरदार बनले. निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले, व लखुजी जाधवाने आपली मुलगी शहाजींना देऊन सोयरीक जमवली. आणि शहाजीराजे ह्यांचा विवाह आनंदात संपन्न झाला.
Comments
Post a Comment