Skip to main content

एक शिक्षक म्हणून शाळा

गेल्या काही महिन्यांपासून निसर्गाने पाठवलेल्या एका  शिक्षकाकडून आपण धडे घेत आहोत. अजून थोड्या दिवसात सिलॅबस संपेल आणि मग परीक्षा होईल !... आपण काय शिकलो याची, सुधारलो की नाही याची, सावरलो की नाही याची... 
पास झालो तर ठीक... नाहीतर परत अजून एक नवीन शिक्षक जास्त अवघड सिलॅबस शिकवायला नक्की येईल.. म्हणून आताच नीट समजून घेऊ आणि सगळे जण पास होऊ.
गेल्या काही दिवसात मी काय शिकलो त्याच्या या शॉर्ट नोट्स...

 *धडा पहिला- आपण सगळे खूप लहान आहोत:* 
निसर्गाच्या त्या अवघ्या २०० नॅनो मीटर सूक्ष्मजीवाच्या कार्यक्षमतेपेक्षा आपण खूपच लहान आहोत. आपण आज पर्यंत  विकसित केलेलं तंत्रज्ञान, वैज्ञानिक प्रगती खूप छोटी आहे. निसर्गाला आव्हान देण्या एवढे आपण नक्कीच मोठे नाही. आपले खुजेपण आणि निसर्गाचे मोठेपण स्वीकारायला हवे.

 *धडा दुसरा- सगळे सारखेच:* 
मानव निर्मित भेदभाव निसर्ग मानत नाही, त्याला सगळे सारखेच, मग आपण भेदभाव कारणारे कोण ? आज हजारो मृत्यु होत आहेत, निसर्गाने कोणताही भेदभाव नाही दाखवला.  वर्ण,जात-पात, धर्म,देश , गरीब- श्रीमंत सगळं झूट ...  चुकला तो संपला, No concession.... !

 *धडा तिसरा-  थांबणं गरजेचं:* 
आयुष्यात गती महत्वाची पण कुठेतरी स्वतःहून थांबणं त्याहून अधिक महत्वाचं. दुसऱ्याने थांबवलं की जास्त त्रास होतो. म्हणून स्वतः कधीतरी थांबूया. जे मागे राहिलेत त्यांना सोबत घेऊयात. थोडी विश्रांती घेऊयात कारण सक्तीची विश्रांती खूप महागात पडते.

 *धडा तिसरा- No Second Chance:* 
घरातल्या  कुणाला जर कोरोनाची लागण झाली तर सरळ त्याला उचलून घेऊन जातात; जगला तर परत येतो ,नाहीतर फक्त फोन करून सांगतात मेला म्हणून...
ना बॉडी बघायला मिळते ना कुठे जाळला हे कळते.
सोबत आहोत तोपर्यंत प्रियजनांना वेळ देणं गरजेचं आहे, मनातलं सांगणं महत्वाचं आहे, सोबत राहणं गरजेचं आहे. प्रेम करा, माफी मागा, हट्ट पुरवा..
कारण कदाचित Second Chance मिळणार नाही.

 *धडा चौथा- पैसा सर्वस्व नाही:* 
कितीही पैसे असतील तरी तुम्ही काही गोष्टी विकत नाही घेऊ शकत. आरोग्य, समाधान, दृष्टिकोन आणि विचार अशा गोष्टी विकत नाही मिळत. त्या कमवाव्या लागतात. आज सगळ्यांना सरकारी दवाखान्यातच दाखल करतायत नो स्पेशल ट्रीटमेंट...
जरी पैसे खुप असतील तुमच्याकडे पण रिसोर्सेस हे समाजाचे असतात हे नेहमी लक्षात ठेवा.

 *धडा पाचवा- वर्तमानात जागा:* 
आजचा दिवस उद्याच्या चिंतेत वाया घालवणे हे चुकीचेच आहे. भविष्याचे नियोजन असणे गरजेचे, पण त्याचा दबाव वर्तमानावर नको. वर्तमान आनंदात घालवणे खूप महत्वाचे.. क्या पता " कल हो ना हो...!"

 *धडा सहावा- सगळ्यांचा आदर:* 
परिस्थिती अनुरूप सगळ्यांनाच एक अतिविशिष्ट महत्व असतं. जगात सगळे लोक तितकेच महत्वाचे असतात. फक्त परिस्थिती अनुरूप त्यांचे महत्व बदलते. आज ज्यांच्या घरी लहान  लेकरं आहेत त्यांच्या साठी दूधवाला सगळ्यात महत्वाचा  आहे. ज्यांचे नातेवाईक आजारी आहेत त्यांच्या साठी डॉक्टर महत्वाचे. पोलीस, स्वच्छता कर्मचारी आपणा सर्वांसाठी महत्वाचे...
सगळ्यांचा आदर करायला स्वतः शिकलं पाहिजे.. कारण निसर्गाची शिकवणी फी खूपच जास्त आहे.

 *धडा सातवा- तुम्हीच तुमचे रक्षक:* 
आपल्या परिस्थिती साठी नेहमी आपणच जबाबदार असतो. सरकार आणि  प्रशासन फक्त मार्गदर्शन करू शकतात किंवा कायदे नियम बनवू शकतात पण त्यांचं पालन करणे हे प्रत्येक इसमाच्या हातात आहे. जबाबदार नागरिक असणे आणि ते कृतीतून दाखवणे फार महत्वाचे आहे. नाहीतर त्याचे परिणाम स्वतःला आणि समाजाला भोगावे लागतात.

 *धडा आठवा- पुढच्यास ठेच मागचा  शहाणा* :
डोळे उघडून परिस्थितीचे आकलन करणे महत्त्वाचे आणि त्यातून शहाणे होणे त्याहून अधिक महत्त्वाचे. दुसऱ्याने केलेल्या चुका परत आपण केल्या तर त्याचे परिणाम आणखी जास्त भयानक असतात.

 *धडा नववा- खऱ्या गरजा खूप कमी:* 
गेले काही दिवस घरी बसल्यावर आपल्याला एक नक्की समजले असेल की  खऱ्या गरजा  खूपच कमी आहेत. अश्या अनेक गोष्टी आहेत ज्याच्या शिवाय आपण जगू शकतो. अनावश्यक गरजा  ओळखायला हव्यात आणि त्याची सवय टाळायला हवी. life style addiction पासून दूर राहायला शिकलं पाहिजे.

 *धडा दहावा- चांगल्या गोष्टींची उजळणी* 
काही गोष्टी मानव समाजात उपजतच आहेत आणि त्यामुळेच आपण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत. गेल्या काही दिवसांत आपण आपल्यातील या चांगल्या गोष्टींची उजळणी केली आणि इथून पुढेही करत राहू.

१. एकात्मता- जनता कर्फ्यू,
२. धैर्य- एकही अप्रिय घटना नाही
३. कल्पकता - घरी रोज नवीन रेसिपीज, वेळ घालवायचे विविध प्रकार
४. Gratitude आणि  appreciation - पोलीस, वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे विविध माध्यमातून आभार
५. विश्वास - प्रशासन आणि माध्यमांवर विश्वास.
६. काळजी आणि जाणीव - साठेबाजी नाही वस्तूंच्या किमती स्थिर , गुन्हेगारी नाही.
७. Real priorities- स्वतः आणि स्वतःचे कुटुंब हीच सगळ्यांची टॉप priority.
                . .

धन्यवाद             . .
🙏🏼🙏🏼

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.