Skip to main content

शिवनिती : - 07 बाबाजीराजे भोसले

शिवनिती भाग 007

बाबाजीराजे भोसले
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाच्या बद्दल माहिती पाहत असताना जो इतिहास जपला किंवा जाणलं, आणि विशेषत: समजून घेतला जातो. असे बाबाजीराजे भोसले ह्यांच्यापासून आपण पाहूया.
        छत्रपती शिवाजी महाराजांचे आडनाव 'भोसले' ह्याबाबत काही इतिहासकरांच्या मते भोसले हे नाव 'भूशल' पासुन पडलं असल्याचे अधिक संभवनीय वाटतं. त्यांच्या मते 'भूशल' चा एक अर्थ 'भूतलावरील शस्त्रधारी' म्हणजेच 'क्षत्रिय योध्दा' असा आहे. त्यामुळे भूशलचे वंशज हे भौषल, भौसल, भोसल, भ्सला, भोसले अशी भोसले या शब्दाची परंपरासिद्ध, इतिहास सुसंगत व्युत्पत्ती ठरते.

             छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज बाबाजीराजे भोसले ह्यांचा जन्म मध्ये वेरूळ येथे झाला होता. हे मूळचे दौलताबाद जवळ वेरूळ परिसरात भोसले राहत असत.देऊळगाव, हिंगणी, बेरडी, जिंती, वेरूळ, मुंगी, बनसेंद वगैरे दहा गावांची पाटीलकी बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती. त्यामुळे त्यांना भोसले पाटील असे उपपदाने संबोधले जात असत. तसेच स्वतःच्या नावापुढे राजे हे देखील उपपद वापरत असत.
    बाबाजीराजे ह्यांचे वडील गावात जलक्रिडा करावयास गेले असता बुडून मृत्यू पावले. त्यांचे पुत्र बाबाजीराजे हे लहान असल्याने निजामशाहाने (बाबाजीराजे ह्यांचे वडीलांची )  ईनामदौलत अनामत करवून सरकारात दाखल केली. बाबाजीराजेंच्या मातोश्री बाबाजीराजे ह्यांना घेऊन दौलताबादेपासून पाच कोसांवर असणार्‍या वेरूळ जवळच्या घृष्णेश्वरासन्निध जाऊन राहिली. तिच्याजवळ असणार्‍या पिढीजात आसवाबातून असणार्‍या थोड्याफार जमिनीत शेती करवून त्यांचा निर्वाह चालला होता. पुढे बाबाजीराजे मोठे झाल्यानंतर भीमा नदीच्या काठावर ‘मौजे देऊळगाव तर्फ पाटस परगणे पुरंदर’ येथे येऊन मौजे देऊळगाव, मौजे खानवटे आणि मौजे कसबे जिंती (?) या भीमातीरावरच्या तीन गावांच्या पाटीलक्या खरेदी केल्या. पुढे बाबाजीराजांची पत्नी साधारण 1552 ला प्रसुत होऊन पुत्र झाला. या पुत्राचे नाव ठेवण्यात बाबाजीराजांनी मालोजीराजे ! असे ठेवले. यानंतर बाबाजीराजांना आणखी एक पुत्र झाला, याचे नाव ठेवण्यात आले विठोजीराजे. पुढे मालोजीराजे आणि विठोजीराजे हे आपल्या तीर्थरूप आणि मातोश्रींसह देऊळगावास येऊन राहिले. येथून जवळच असणाऱ्या सातारा-फलटण या भागात शंभू-महादेवाचे पवित्र शिवालय होते येथेही जात असल्याचे नोंद आढळते. तसेच तुळजापूरची भवानीही जवळच होती. ही दोन्ही देवस्थाने म्हणजेच भोसले घराण्याची कुलदैवते ! ह्याठिकाणचा विकास देखील भोसले घराण्यातील महापुरुष करत असल्याच्या नोंदी आढळतात. शेडगावकरांचा बखरकार म्हणतो, मालोजीराजे घृष्णेश्वरास आल्यानंतर शंभू घृष्णेश्वर आणि श्री जगदंबा तुळजाभवानीने आशीर्वाद दिधले.
                       शिवनिती भाग ....7  क्रमशः...
____________________________________________________

शिवनिती App मध्ये असा सर्व इतिहास आपणास एकाच क्लिकवर वाचता येईल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे ते इन्स्टॉल करावे किंवा  "शिवनिती" App लिंक

*https://play.google.com/store/apps/details?id=shivniti.appbva*

                      संकलन
           शिवश्री लक्ष्मण काटेकर,
                     शिवनिती.
               7588020886
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.