Skip to main content

बुधभूषणम् श्लोक १८ ते २२

🚩 *श्री बुधभूषणम्* 🚩
    🖋 _*"स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवपुत्र, शिवशंभू, छत्रपती संभाजीराजे भोसले महाराजांच्या "* विचारातून आणि लेखनातून साकारलेल्या "बुधभूषण" पवित्र ग्रंथाचे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून या पवित्र ग्रंथाचे वाचन होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.माझ्या लाडक्या राजाने 350 वर्षापुर्वीच लिहिलेला पवित्र ग्रंथ "बुधभूषण" मधील श्लोक व त्याचा मराठीत अर्थ देण्याचा एक प्रयत्न आहे ह्यातून कोणाची मने दुखावणे अथवा समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशी सर्वाना विनंती.
     
    *वार :- शुक्रवार*
*दि. जाने. २४, २०२०*
*वेळ -२०:००*
★★★★★★★★★★★★

     © *भाग :- ००५ @*
      *अध्याय  : १ ला (अ)*    
.
🚩  *श्लोक क्रमांक :- ०१८*
स्फटिकरचितपीठे श्यामला लाड्री:गी भवानी |
अरुण चरण कांति, भासयंती स्वरूपम्||
नखमणिगुणयुक्ता,अंगुली: र्भासयंती |
विजित सितगरुद्धि नूपुरै गुल्फ युग्मम् ||०१८||

🚩 *मराठी अनुवाद:-* बिल्लोरी च्या सफेद चमकत्या पत्थराचे आसन असलेल्या शामलशरीराच्या श्रीभवानीदेवीच्या, सोनेरी चरण शोभेचे, भासणारे स्वरूप हे रत्नांच्या मण्यांनी युक्त असल्यासारखे नखे असलेल्या बोटावर भासमान होत आहे. पायाच्या नडगीवर असणारी पैंजणांची जोडी ही पंख असलेल्या सुंदर पक्षांना जिंकणारी दिसत आहे.

🚩  *श्लोक क्रमांक :- ०१९*
पद्मरागारूण श्री कशीर: पुष्पेण शोभितांम् |
हृतशीताशुतेजस्क मुक्ता चंद्रोसुशोभिताम् ||०१९||
🚩 *मराठी अनुवाद:-*
मौल्यवान माणिकरत्न प्रमाणे लाल कमळाच्या पुष्पाप्रमाणे ती शोभायमान आहे. शीतल किरणे पसरवणाऱ्या चंद्राप्रमाणे तेजाचा साठा तिने हरण केलेला आहे. ती चंद्राच्या उपमेने शोभा देत आहे.
🚩  *श्लोक क्रमांक :- ०२०*
अतीव सुकुमारांगी प्रोल्लसत चूर्ण कुंडलांम् |
भ्रुवल्लिंगगिसौंदर्य जितकामशरासनाम् ||०२०||
🚩 *मराठी अनुवाद:-*
त्या अत्यंत सुकुमार गात्रे असलेल्या देवीची सुवर्ण कुंडले अधिक शोभायमान झाले आहेत. तिने भुवयांच्या कटाक्ष सौंदर्याने कामदेवांच्या  बाणांनाही जिंकले आहे.
🚩  *श्लोक क्रमांक :- ०२१*
मदिरामदसंपूर्ण, मदिराक्षी मदालसाम |
निर्मलादर्शसंदर्श, कपोलकफल प्रभाम् ||०२१||
🚩 *मराठी अनुवाद:-*
प्रभावशाली नेत्राच्या मदालसे प्रमाणे वारूणीने प्रभावित दृष्टीक्षेप करणारी व स्वच्छ आरशासारखी कपोल विभाग फलकाची, दाखविणारी कांती, तेज तिच्या मुखमंडलावर दिसत आहे.

🚩  *श्लोक क्रमांक :- ०२२*
विलसतभालतिलका मुक्तागुणसमन्विताम्
विभासत रत्नसंयुक्ता, कर्ण भूषण शोभिताम्  ||०२२||
🚩 *मराठी अनुवाद:-*
तिच्या भाल प्रदेशावरील टिळा मोत्यांच्या समन्वयाने विलास पावला आहे. अशा सुंदरमय परिस्थिती निर्माण झाली आहे. रत्नांनी संयुक्त झाल्यामुळे सुशोभित झाल्यामुळे तिची कर्णभूषणे ही सुशोभित झाले आहेत.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    _दररोजच्या काव्य वाचण्यासाठी लेख मिळण्यासाठी खालील लिंकवर जॉईन व्हा.व एकदा जॉईन झाल्यावर शेवटच्या श्लोकाचे ज्ञान होई पर्यंत कोणत्याही कारणास्तव समूह सोडू नये ही विनंती आहे._

https://bit.ly/38oqS4g

_वरील साहित्य मूळ लेखनासह इतरांना शेअर करावे, त्यात कोणत्याही स्वरूपात बदल करण्यात येऊ नये, समाजात आपणच आपल्या राजाची महती जाणून घेत वाचन व्हावे हीच आई तुळजाभवानी, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी प्रार्थना करत आहोत._

संदर्भ :- जिजाई प्रकाशन

     🖋  *संकलन*
     श्री लक्ष्मण काटेकर,
             सोलापूर.
📞  *7588020886*

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.