🚩 *श्री बुधभूषणम्* 🚩
🖋 _*"स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवपुत्र, शिवशंभू, छत्रपती संभाजीराजे भोसले महाराजांच्या "* विचारातून आणि लेखनातून साकारलेल्या राज्यनितीवर आधारित "बुधभूषण" पवित्र ग्रंथाचे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून या पवित्र ग्रंथाचे वाचन होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.माझ्या लाडक्या राजाने 350 वर्षापुर्वीच लिहिलेला पवित्र ग्रंथ "बुधभूषण" मधील श्लोक व त्याचा मराठीत अर्थ देण्याचा एक प्रयत्न आहे ह्यातून कोणाची मने दुखावणे अथवा समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशी सर्वाना विनंती.
◆◆◆◆◆★◆◆◆◆◆
🚩 शिवनीती :-
*_जगात आपल्या विरोधात कितीही जाऊदेत तरी आपला सत्याचा मार्ग कधीही सोडू नका, कारण यशस्वी व्हायला वेळ लागतो._*
====================
*वार :- शनिवार*
*दि. जाने. २६, २०२०*
★★★★★★★★★★★★
🖋 *संकलन व मांडणी*
श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
📞 संपर्कसाठी :- *https://wa.me/917588020886*
© *भाग :- ००७ @*
*अध्याय : १ ला (अ)*
*०४. प्राचीन नमस्कृति :*
|| श्री गणनायक ||
*श्लोक क्रमांक :-०२९*
चलत्कर्णा निलोद्धत सिंदू रारूणितांबर: |
जय (त्य) काले विसृजन संध्यामिव गजानन : ||२९||
*मराठी अनुवाद :-*
रागावून हलविलेल्या प्रभावी कर्णाच्या वाऱ्यापासून निर्माण झालेले सिंदुराप्रमाणे लाल झालेले आकाश अकाल पणे झटकून देऊन संध्या देवतेप्रमाणे असलेला अंधारावर जय मिळतो.
|| श्री भवानी ||
*श्लोक क्रमांक :-०३०*
हरकंठ ग्रहांनंद मीलिताक्षी नमाम्युमाम |
कालकूट विषस्पर्शजातमूर्च्छागता (मा) मिव ||३०||
*मराठी अनुवाद :-*
प्रत्यक्ष हरांच्याच शंकराच्या कंठालिंगनाच्या आनंदात असणाऱ्या पार्वतीस मी वंदन करतो. शिवकंठातील काल कूट विषयाच्या स्पर्शप्रभावाने किंचित प्रभावित झालेल्या व त्यामुळे मूर्च्छा आल्याप्रमाणे उमादेविस मी नमस्कार करतो.
|| श्री शिव ||
*श्लोक क्रमांक :-०३१*
चंद्राननार्धदेहाय, चंद्राशु सितकीर्तये |
चंद्रार्कानलनेत्राय, चंद्रार्धशिरसे नम: ||३१||
*मराठी अनुवाद :-*
ज्याच्या अर्ध्या शरीरावर पार्वतीदेवी आहे, जो चंद्राच्या सफेद चांदीच्या प्रमाणे व किरणांप्रमाणे धवल देह आहे व ज्याच्या नेत्रांचे तेज, चंद्र सूर्याप्रमाणे आहे, अग्नी तेज चंद्र सूर्याच्या किरणांना डोळ्यात सामावून घेण्याची शक्ती याच्यात आहे, अशा त्या शिवास माझा नमस्कार असो.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
_दररोजच्या काव्य वाचण्यासाठी लेख मिळण्यासाठी खालील नंबरवर नाव पत्ता मॅसेज करा, आणि संपर्कात रहा.
🖋 *संकलन व मांडणी*
श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
📞 संपर्कसाठी :- *https://wa.me/917588020886*
_वरील साहित्य मूळ लेखनासह इतरांना शेअर करावे, त्यात कोणत्याही स्वरूपात बदल करण्यात येऊ नये, समाजात आपणच आपल्या राजाची महती जाणून घेत वाचन व्हावे हीच आई तुळजाभवानी, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी प्रार्थना करत आहोत._
संदर्भ :- जिजाई प्रकाशन
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🖋 *संकलन व मांडणी*
श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
📞 संपर्कसाठी :- *https://wa.me/917588020886*
Comments
Post a Comment