🚩 *श्री बुधभूषणम्* 🚩
🖋 _*"स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवपुत्र, शिवशंभू, छत्रपती संभाजीराजे भोसले महाराजांच्या "* विचारातून आणि लेखनातून साकारलेल्या "बुधभूषण" पवित्र ग्रंथाचे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून या पवित्र ग्रंथाचे वाचन होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.माझ्या लाडक्या राजाने 350 वर्षापुर्वीच लिहिलेला पवित्र ग्रंथ "बुधभूषण" मधील श्लोक व त्याचा मराठीत अर्थ देण्याचा एक प्रयत्न आहे ह्यातून कोणाची मने दुखावणे अथवा समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशी सर्वाना विनंती.
*वार :- गुरूवार*
*दि. जाने. २३, २०२०*
*वेळ -२०:००*
★★★★★★★★★★★★
© *भाग :- ००४ @*
*अध्याय : १ ला (अ)*
*२.स्वकुल व स्वकाव्य वर्णन*
🖋 *संकलन*
श्री लक्ष्मण काटेकर,
सोलापूर.
📞 *7588020886*
📕 संस्कृत काव्य 📕
*२. स्वकुल व स्वकाव्य वर्णन*
🚩 *श्लोक क्रमांक :- ०१२*
आपूर्वांचल पश्चिमाम्बुधिमथाप्यासेतु शीताचलं | निर्जित्यावनिमंडलं च करदीककृत्या खिलांभूमिपान || श्रौतं धर्ममवाप्य सद्भिरुमभीत: राजाभिषेके परं | छत्राध्येनृपललक्षनैसुदिनं सिंहासन राजते ||०१२||
🚩 *मराठी अनुवाद:-*
पूर्वेकडील सर्व प्रादेशिक विभागापासून पश्चिम समुद्रापर्यंत तसेच दक्षिणेकडील सुख्यात रामेश्वर रामसेतू ते हिमाचल प्रदेशातपर्यंतच्या भूमंडळावरील राजांना जिंकून त्यांच्याकडून त्यांना रयतेस अभय देण्यास भाग केले. त्यांना संरक्षण देण्याच्या कृतीस भाग पाडले. लोकधर्माचा, शिवधर्माचा स्वीकार केला व सत्याकडे उदीयमान झालेला राज्याभिषेक केला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी राजांच्या मुळे सिंहासनावर दिवसेंदिवस शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे शोभायमान होऊ लागले. छत्रपती शिवाजीराजे सिंहासनस्थ झाल्याने रयतेच्या सुखास व आनंदास होऊन ते सतत वाढत जाऊन टिकले.
🚩 *श्लोक क्रमांक :- ०१३*
नाना देश समागतान द्विजवरान्येनाभिषेकोत्सवे |
संतरप्यातुलतोलितैर्बहुधनैर्वत्रईर्गजैर्वाजिभि:||
चन्द्रप्रेरित चंद्रिकेव विमला गेया बुधै:बंदिभि:|
कीर्ति: सर्वदिगतंरेषु जयिना, विस्तारिता भुभृता ||१३||
🚩 *मराठी अनुवाद:-*
नाना देशातून आलेल्या प्रमुख पाहुण्यांना प्रमुख आचार यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांना परदेशी आथितींना राज्याभिषेकाच्या उत्सव समारंभात अनेक वजन मापाने अमाप धनसंपत्ती वस्त्रप्रावरणे हत्ती-घोडे यांचे दान करून भिक्षेकरी ब्राह्मणांना संतुष्ट केले. पंडितवृंद व चारणगण यांच्याकडून चंद्रप्रेरित चांदण्या प्रमाणे विमलकीर्ति छत्रपती शिवाजी राजांची कीर्ति सगळ्या दिगंतरामध्ये सर्व दिशा उपदिशांना गायली गेली व त्यांच्या विजयाचा जयजयकार विस्तृत भूभागावर अतुल धरणीधर जयिष्णु विमालकीर्ति भूपती असा झाला.
🚩 *श्लोक क्रमांक :- ०१४*
सोयं यस्य गडो नरेन्द्र वहितैं: प्रासादहरम्यरठ्ठऐ:|
न्यरापपा चत्वरैश्च परित पूर्णे:सरोभिर्नवै:||
विदवद्वद्वैदिक वैद्यवर्यगणकै: राद्यऐश्च सन्मान्विभि:|
सैन्यइश्चयापी चतुर्विधै: अगणितै: र्भाति प्रतापन्वितैं: ||०१४||
🚩 *मराठी अनुवाद:-*
तोच हा या राजांचा दुर्ग राजधानी किल्ले रायगड नरेन्द्रानी वहीत असलेला, राजवाडा, उत्तुंग निवासी व रम्य बाजारपेठा, निसर्गानी वेढलेला, चौकांना सजलेला, व पाण्याने परिपूर्ण भरलेल्या सरोवरांनी आणि विद्वान, वैज्ञानिक, धन्वंतरी, श्रेष्ठ गणिती, इत्यादी आपल्या मंत्रीगणासह, सर्वसैन्य, असंख्य चतुरंग, घरबाळासह परमप्रतापी समन्वित सामर्थ्य सह शोभिवंत दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली राज्यव्यवस्था की एकमेव लोकशाही व्यवस्था होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज "लोकशाहीचे जागतिक जनक" ठरतात. 'रायरी' दुर्गाची छत्रपती शंभूराजांनी वर्णिलेली थोरवी त्यांच्या चित्रोपम शैलीच्या अल्पाक्षर पण बह्यार्थ प्रतिपादक शैलीचे उत्कृष्ट उदाहरण म्हणता येईल.१) नरेंद्रवाही, २) प्रसाद,हर्म्य, अट्टालिका, ३) रम्य आपणिका चत्वर, ४) नीरपूर्ण परीतः सरोवरे, ५) विद्वान, वैदिक, वैद्यश्रेष्ठ गणक इत्यादी नामवंत, ६) आपले कार्यकुशल मंत्री व नृप ७) चतुरंग असा अगणित प्रतापी दळभार, ही सत्तेविशेषणे रायगडची चिरभूषणे होती. युवराज शंभूराजे यांच्या चाणाक्ष वैनतेय दृष्टीने ती नीट व योग्य वेळी अचूक टिपली आहेत.
🚩 *श्लोक क्रमांक :- ०१५*
तस्यात्मज: शंभुरिति प्रसिद्ध: समस्तसामंत शिरोवतंस:|
य: काव्यसाहित्य पुराणगीतकोदण्डविद्यार्णव पारगामी ||१५||
🚩 *मराठी अनुवाद:-*
त्या शिवप्रभूंचा समस्त मांडलिकमध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज शंभुराजा म्हणून प्रसिद्धीस आला. ते काव्य साहित्य संगीत धनुर्विद्या इत्यादीचा कलासागर पार केलेला होता किंबहुना पारंगत झालेले होते. महान छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मज शंभू प्रिय पुत्र संभाजीराजे नावारूपाने सूख्यात आहेत. ते समस्त सामंत नृपांच्या मस्तकावरील शिरपेच अलंकार आहेत. ते शोभे प्रमाणे शिवाय काव्य, साहित्य, नाना अठरा पुराणे, चौसष्ट कला व विद्यांचा समुद्र त्यांनी ओलांडून आलेले आहेत. ते या विद्यात वाकबगार आहेत. स्वतः विषयीची आत्मविश्वासाची शब्दसुमनमाला एकाच श्लोकात सांगून, अल्पाक्षर व बह्यार्थप्रतिपादक हीरकमाला आपल्यासमोर उभी करून ते आपल्या स्वीकृत बुधभूषण ग्रंथावलीकडे वळतात.
🚩 *श्लोक क्रमांक :- ०१६*
विविच्य शास्त्राणि पुरातनानां आदाय तेभ्य: खलु सोयमर्थम |
करोति सदग्रंथं मसुनृपाल:, सशंभुवर्मा बुधभूषणाख्यायम् ||१६||
🚩 *मराठी अनुवाद:-*
लक्षपूर्वक बारकाईने, पुरातन शास्त्रे वाचल्यावर व त्यांचे अवलोकन आणि विवेचन केल्यावर, त्या प्राचीन ग्रंथकारांनी सांगितलेल्या अर्थानुसार हे विवेचन केले आहे,छत्रपती राजे शंभूवर्मन हा सद्ग्रंथ निर्माण करीत आहेत. अत्यंत नम्रपणे स्वतः छत्रपती संभाजीराजे याबद्दल पुनश्च नम्रपणे म्हणतात.
🚩 *श्लोक क्रमांक :- ०१७*
विविच्य सन्त: कृति अस्मदिया, गृहवन्तु सच्चासदसच्च जंतु |
क्षीरावियुक्त परिहृत्य नारी क्षीरं भजंते खलु राजहंसा:||१७||
🚩 *मराठी अनुवाद:-*
अशा या शंभूनृपाने पुरातनशास्त्राचे विवेचन करून त्यातील सार्थअंश या ग्रंथात घेऊन व त्यावेळी सत्य असत्याचे मंथन करून नीरक्षीर न्यायाने राजहंसाप्रमाणे अमृताचे स्वागत करून पाण्याचा त्याग करावा. दुधाचे तेवढे सेवन व स्विकार करावे. सहृदयी रसिकांनी व पंडितांनी माझ्या या कृतीची तशी स्वीकृती करावी. त्या छत्रपती शिवाजीराजांचा भोवतीच्या सार्या राजेलोकांना शिरोभूषण वाटणारा काव्य, कला, भाषा, साहित्य, पुराण, संगीत, धनुर्विद्या, यांचे ज्ञान घेतलेला मी पुत्र शंभूराजे या नावाने प्रसिद्ध आहे. पुराणग्रंथांचे विवेचन करून त्यातील अर्थपूर्ण भाग निवडून मी शंभूवर्मा हा 'बुधभुषण' नावाचा सद्ग्रंथ रचीत करत आहे. हे शंभूराजांचे लोकांना उदाहरण आहे की जसे दुधातील पाणी वगळून राजहंस फक्त दूध सेवन करतात. असे विद्वान सज्जन 'सत्य तेवढेच आपलेसे करून असत्य वगळून टाकतात' हे सत्य वचन या दोन श्लोकांचे शब्द प्रतिबिंब मुद्दाम "बुधभूषण" च्या वाचकांना सादर करीत आहोत.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
_दररोजच्या काव्य वाचण्यासाठी लेख मिळण्यासाठी खालील लिंकवर जॉईन व्हा.व एकदा जॉईन झाल्यावर शेवटच्या श्लोकाचे ज्ञान होई पर्यंत कोणत्याही कारणास्तव समूह सोडू नये ही विनंती आहे._
https://bit.ly/38oqS4g
_वरील साहित्य मूळ लेखनासह इतरांना शेअर करावे, त्यात कोणत्याही स्वरूपात बदल करण्यात येऊ नये, समाजात आपणच आपल्या राजाची महती जाणून घेत वाचन व्हावे हीच आई तुळजाभवानी, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी प्रार्थना करत आहोत._
संदर्भ :- जिजाई प्रकाशन
🖋 *संकलन*
श्री लक्ष्मण काटेकर,
सोलापूर.
📞 *7588020886*
Comments
Post a Comment