Skip to main content

बुधभूषणम् - श्लोक ००७ ते ०११

🚩 *श्री बुधभूषणम्* 🚩
    🖋 _*"स्वराज्याचे दुसरे छत्रपती, शिवपुत्र, शिवशंभू, छत्रपती संभाजीराजे भोसले महाराजांच्या "* विचारातून आणि लेखनातून साकारलेल्या "बुधभूषण" पवित्र ग्रंथाचे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवून त्यांच्याकडून या पवित्र ग्रंथाचे वाचन होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न.माझ्या लाडक्या राजाने 350 वर्षापुर्वीच लिहिलेला पवित्र ग्रंथ "बुधभूषण" मधील श्लोक व त्याचा मराठीत अर्थ देण्याचा एक प्रयत्न आहे ह्यातून कोणाची मने दुखावणे अथवा समाजात तेढ निर्माण होऊ नये, अशी सर्वाना विनंती.

    *वार :- बुधवार*
*दि. जाने. 22, 2020*
*वेळ -20:00*

      *अध्याय  : १ ला (अ)*    
          *२.स्वकुल व स्वकाव्य वर्णन* 
      🖋  *संकलन*
     श्री लक्ष्मण काटेकर,
             सोलापूर.
📞  *7588020886*

📕 संस्कृत काव्य  📕

🚩  *श्लोक क्रमांक :- ००७*
भृशब्दान्वयसिंधु सुधाकर :प्रथितकीर्तिरुदारपराक्रम: | अभवतर्थकलासु विशारदो जगति शाहनृप: क्षितिवासव:|| ७||

🚩 *मराठी अनुवाद:-*

विविध सामर्थ्यांचा प्रचंड समन्वय झालेला पृथ्वीतलावर साक्षात वसुरूप किंवा शिवच असणारा शाह म्हणजे शहाजी नावाचा कीर्ती संपन्न उदार व श्रेष्ठ आणि पराक्रमांची शर्थ करणारा तसेच अर्थकारण व व विविध कलांमध्ये पारंगत असणारा, अशा विविध गुणांचा संगम झालेला हा नृपथोर गुणसागरावरील चंद्राप्रमाणे सोबत होता. असे सिंधु सुधाकरासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिमान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये हे प्रवीण असे राजे शहाजी होऊन गेले.

🚩  *श्लोक क्रमांक :- ००८*
येनाकर्णविकृष्टकार्मूकचलत्काणडावलीकर्तीत | प्रत्यर्थिक्षितिपालमौलिनिवहैभ्यर्चि विश्वंभरा || यस्यानेक वसुंधरा परिवृढ प्रोत्तुंग चुडामणे: | पुरत्व समुपागत: शिव इति ख्यात: पुराणो विभु: ||००८||
🚩 *मराठी अनुवाद:-*
    ज्यांनी वर करणाऱ्या महीपालांची अनेक राजांची गर्वोन्मत मस्तके विश्वंभरा साड पण केली अशा वसुंधरेस गवसणी घालणाऱ्यामध्ये उत्तुंग व श्रेष्ठ असणाऱ्या पुत्र 'शिवा' म्हणून पुराणांतरीचा प्रभु शिवस्वरूप साक्षात शिवच जन्मास आला. त्या शहाजीराजांना महाशूर मुलखाचे धनी असलेले लोकांना पर्वतासारखे उत्तुंग म्होरके वाटणारे पुराणातील पुरुषश्रेष्ठ शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले.

🚩  *श्लोक क्रमांक :- ००९*
कलिकाल भुजंगमावलीढं निखीलंधर्ममवेक्ष्य विक्लवं य:| जगत परिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिर्जयत्यजेय: ||००९||
🚩 *मराठी अनुवाद:-*
त्या कलिकालाच्या भुजंगास पचविलेल्या अखिल धर्माची हिनावस्था बघून विव्हळ झालेल्या स्वामी म्हणून जगताचे ताप हरण करण्यासाठीच अवतरलेल्या शिवरूप धारण केलेल्या शिवछत्रपतींचा जयजयकार असो. येथील सगळेच धर्मक्षेत्र भयभीत झालेले पाहून व कालिकालरुपी विषारी भुजंगाने ग्रासलेल्या पाहून जगाचे अधिपती आंशिक रूपाने अजेय जय स्वरुपात शिवधर्म पुन:स्थापित करण्यासाठी 'शिवछत्रपति' म्हणून जगाचे भय निवारण्यासाठी अवतरले.

🚩  *श्लोक क्रमांक :- ०१०*
येन क्षोणितले कलावविकले बुद्धावतारं गतं | गोपालेखिलवर्णधर्मनिचये मलैस्वच्छई:समासादिते || भूयस्तत्परिपालनाय सकलज्जित्वां सूरद्वेषिण: | स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णा: क्रमात ||०१०||

🚩 *मराठी अनुवाद:-*
त्याने पृथ्वीतलावर कली पूर्ण झाल्यावर ज्यो की त्यो बुद्धावतार मध्ये तथागत गौतम बुद्धाने कलीरूपाने चाललेला अमानवतावादी वैदिकशाहिचा विषमतावादी भ्रष्ट कारभार नेस्तनाबूत केला त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केले. नंतर त्यांनी अखिल वर्णन धर्मांचा समूह बनवून म्लेंच्छ धर्माला आश्रय दिलेल्यानांही त्या छत्रपती शिवाजीराजांनी जिंकून देवादिकांच्या द्वेष सूरवर्णीय करणाऱ्या सगळ्यांना जिंकून त्यांच्या परिपालनासाठी आपापल्या वर्णांमध्ये स्व गुणांनुसार विप्रादिंना ( विप्रक्षत्रिय- वैश्य-शूद्र ) बऱ्याच काळपर्यंत स्वतःच्या स्व-धर्मानुसार विविध कर्मांची कामे करविली. अशी गण व्यवस्था निर्माण केली.

🚩  *श्लोक क्रमांक :- ०११*
आकर्णाटकदेशतो गिरीवरे सह्येप्यसह्ये परै:| दुर्गांणि क्षितिपालनाय नृपते: यो बागलाणावधि || आकृष्णातटमासमुद्रमभित: कृत्वा कृती दुर्गमे | दुर्गे रायरिसंज्ञके विजयते भूमीभृतामग्रणी: ||०११||

🚩 *मराठी अनुवाद:-*
पर्वत राशीमध्ये श्रेष्ठ व असह्य अशा सह्याद्री व त्याच्या जवळील शत्रूंचा ही काही पर्वतापासून ते कर्नाटका देश पर्यंत जी दुर्गराशी आहे ती व बागलाणच्या सीमेपर्यंत ते संपूर्ण कृष्णानदीच्या मुखापर्यंत येथे समुद्रास मिळेपर्यंत अनेक दुर्ग निर्भय करणारा हा धरणीधारक, पृथ्वीचे पालन करणारा स्वामी शिवनृपति होता. त्याने वरील दुर्गावर आपले कर्तृत्व दाखवले. नंतर अत्यंत दुर्गम अशा ठिकाणी 'रायरी' शब्द असलेल्या किल्ल्यास सर्व पृथ्वीवरील दुर्गामध्ये अग्रेसर करून स्वतः सही 'धरणीधराग्रणी' घडवून 'राजाधिराज' आणि दुर्गाच्या रायरी शब्दास सार्थक करून आपण विजय संपादन केला. 'रायरी' किल्ल्यावर राजधानी स्थापन करून "किल्ले रायगड" नामकरण करत रयतेचे सार्वभौम स्वराज्य स्थापन स्वतः "श्री छत्रपती" झाले.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    _दररोजच्या काव्य वाचण्यासाठी लेख मिळण्यासाठी खालील लिंकवर जॉईन व्हा._

https://bit.ly/38oqS4g

_वरील साहित्य मूळ लेखनासह इतरांना शेअर करावे, त्यात कोणत्याही स्वरूपात बदल करण्यात येऊ नये, समाजात आपणच आपल्या राजाची महती जाणून घेत वाचन व्हावे हीच आई तुळजाभवानी, श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे यांच्या चरणी प्रार्थना करत आहोत._

संदर्भ :- जिजाई प्रकाशन

     🖋  *संकलन*
     श्री लक्ष्मण काटेकर,
             सोलापूर.
📞  *7588020886*

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.