संख्यावरील क्रिया करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या महत्त्वपूर्ण बाबी.
(इयत्ता ३ री ते ५ वी)
(०१) दशक व शतक मोकळा करण्यासाठीचे वजाबाकीचे उदाहरणे तयार करा. (०२) आधी शतक नंतर दशक मोकळा करण्यासाठीचे वजाबाकीचे उदाहरणे तयार करा. (०३) शतक मोकळा करण्यासाठीचे वजाबाकीचे उदाहरणे तयार करा. (०४) दशक मोकळा करून सोडविण्यासाठीचे वजाबाकीचे उदाहरण तयार करा. (०५) शतक मोकळा करून दशक व एकक मिळविण्यासाठीचे वजाबाकीचे उदाहरणे तयार करा. (०६) पूर्ण शतक येणारी वजाबाकीचे उदाहरणे तयार करा. (०७) तीन अंकी कोणत्याही दोन संख्यांची बेरीज केली असता बेरीज पूर्ण शतक येईल असे बेरजेची उदाहरणे तयार करा. (०८) तीन अंकी दोन संख्येतील बेरजेच्या एकक व दशक स्थानी ०(शून्य) येईल अशी बेरजेची उदाहरणे तयार करा. (०९) तीन अंकी दोन संख्येतील दशक स्थानी (०)शून्य येईल अशी बेरजेची उदाहरणे तयार करा. (१०) तीन अंकी दोन संख्येतील प्रत्येक स्थानाची बेरीज समान येईल अशी बेरजेची उदाहरणे तयार करा. (११) तीन अंकी दोन संख्येतील शतक व दशक स्थानी हातचा येणारी बेरजेची उदाहरणे तयार करा. (१२) बिनहातचा उत्तर तीन अंकी येणारे गुणाकाराची उदाहरणे तयार करा. (१३) हातचा, उत्तर दोन अंकी येणारे गुणाकाराची उदाहरणे तयार करा. (१४) हातचा, उत्तर तीन अंकी येणारे गुणाकाराची उदाहरणे तयार करा. (१५) एका पेक्षा मोठा हातचा तीन अंकी गुणाकार येणारे गुणाकाराचे उदाहरण तयार करा.
प्रश्न निर्मिती~ संतोष मनवर
जि प प्रा शाळा पंचाळा.
Comments
Post a Comment