Skip to main content

पुरातन नाणी नावे

शिवकाळाआधी, शिवकाळी आणि शिवकालोत्तर व्यवहारात असलेल्या चलनाचा शब्दकोष -
* अटका,अडका- सुपारी
* अधेला- अर्धा पैसा
* अधेली- अर्धा रुपया
* अर्दी- एक पै
* आगुदान- देवगिरिच्या यादवांचे सुवर्णाचे नाणे
* आसु- देवगिरीच्या यादवांचे एक चांदीचे नाणे
* उदानका- पैसा
* कपर्दक,कपर्दिका-कवडि
* कलदार- इंग्रजी शिक्क्याचा सूरत येथील रुपया
* कार्षापण- जुन्या काळातिल नाणे
* गबर- एक सोन्याचे नाणे
* गिनी- इंग्लंडमधील एक सोन्याचे नाणे
* गिन्नी- हिन्दूस्थानातील एक आणा किमतीचे नाणे
* घुला- पिवळसर रंगाची मोठी कवडि
* चकार, चकारा, चकारी- चवला, दोन आण्याचे नाणे
* चक्रम- दक्षिणेतिल एक सुवर्ण नाणे
* चवल,चवली- दोन आण्याचे नाणे
* चाम- सुवर्ण नाणे
* चाल- एक नाणे
* चौली-चवली
* दुणेली- एक आणे किमतीचे नाणे
* छदाम- पैश्याचा एक चारुर्थांश, दोन दमड्या,सहा दाम
* टाक- चांदीचा रुपया
* टाली- आठ आणे,अधेली
* टोली- पैश्याचा आठवा हिस्सा
* तांग- सोळा पयांचे एक चलन, आणेली
* ताट- पुतळी, अजमासे पांच रूपये किमतीचे सुवर्ण नाणे
* तांबली-तांब्याचे एक शुद्र नाणे
* तिवल- दीड आणा
* दुवल- एक आणा
* दुवली- आणेली
* तिरकी- एक पै, रुका
* तुरु- एक प्रकारचे नाणे
* दमडी- पैश्याच्या चौथ्या हिस्याचे किंवा दहा बारा कवड्यांच्या किमतीचे नाणे
* दाभोळीलारी- दाभोळ बंदर टांकसाळीत पडलेले आदिलशाही चांदीचे नाणे. याचा आकार स्त्रियांच्या हेअर पिनसारखा होता
* दाम- तांब्याचे नाणे
* दिडकी- एक पैसा, दीड दुगाणी नाणे
* दिरम, दिरिम- दोन आणे किमतीचे चांदीचे नाणे
* दुकंडा- दोन कवड्यांचे चलन
* दुगनी- तांब्याचे जुने नाणे
* दुगाणी- अर्धा पैसा
* दुदांडी- दोन समांतर रेषा असलेली पेशवाहि शिवराई
* दुकार- एक आणा
* दुडु- पैशाच्या एक चतुर्थांश किमतीचे नाणे
* दुवल- रुपयाचा सोळावा भाग
* दुवली- आणेली
* दोकडा- गुजराथमधील नाणे परिमाण
* धरण- सम्मुचयाने नऊ आणे, पाव होन
* नासरी- अर्धी दमडी
* निमति- अधेली, आठ आणे
* निष्क- एक सोन्याचे नाणे, चार रूपये कीमतीचे एक परिमाण
* पचकी- दमडीच्या किमतीचे एक तांब्याचे नाणे
* पताक- एक रुप्याचे नाणे
* पाई- पै
* पागोडा- मद्रासमधील सोन्याचे नाणे
* पाची- पांच रूपये किमतीचे सोन्याचे नाणे
* पार्दाव- पोर्तुगीज नाणे
* पावणा- पाव आणा
* पावला, पावली- रुपयाचा एक चतुर्थांश, चार आणे कीमतीचे नाणे
* पै- आण्याचा बारावा भाग
* पैसा- आण्याचा चौथा भाग, तांब्याचे एक नाणे
* पोवन- सावरिन नावाचे सोन्याचे नाणे
* पुतळी- हिन्दुस्ताणात चलनात असलेले प्राचीन ग्रीक रोमन नाणे
* फनम- दक्षिणेतिल चांदी किंवा सोने याचे एक लहान नाणे
* फसकी- फांसा असलेलि पुतळी
* फाटा, फांटा- रुपयाचा सोळावा भाग, आणा
* बेल- अर्धा आणा
* बोडी- वीस कवड्यांचे एक नाणे
* ब्याळ- अर्धा आणा
* मुयेद- अट्ठावीस रूपये किमतीचे एक नाणे
* मोहर- सोन्याचे एक तोळा वजनाचे नाणे
* म्वार- मोहर
* रयाल- एक चांदीचे नाणे
* रुका, रुक्का- आण्याचा बारावा भाग
* रुपया- सोळा आणे किमतिचे चांदीचे नाणे
* रुब- चार पै,
* रूबल- रूस देशातील दीड रुपया किमतिचे एक नाणे
* रेवती- अधेली, अर्धा रुपया
* रेस- आण्याच्या 25 वा व रुपयाचा 400 वा भाग, एक पोर्तुगीज नाणे
* लहारि, लारी, लाहरि, लाहारि- तिन आणे किमतिचे एक आदिलशाही चांदीचे स्त्रियांच्या हेयर अहमदी पीन सदृश्य नाणे
* लोही- मोहर, सोन्याचे नाणे
* शाईपैसा- शाही पैसा
* शिवराई- शिवरायांनी पाडलेली सोन्याची व तांब्याची नाणी
* शिवाई- शिवरायी होन
* शेटवाई, मोहर- सावकाराने पाडलेली मोहर
* शेणी- दूंडा, धबू पैसा
* सणी- सजगनी, ढबू पैसा, दोन पैसे
* सन्या- अर्धा आणा
* सप्तगनि, सप्तगाणी- दुंडा पैसा
* सकरीन- आठ आणे किमतिचे आणे
* ससगणी, ससगाणी- सजगनी
* सापिका- दीड रुका किमतिचे तांब्याचे नाणे
* होन- सोन्याचे साधारण 3 1/2 किमतीचे नाणे
* अलिबागी- आंग्रे यांचा रुपया
* अश्रफी- एक सोन्याचे नाणे, मोहर, झेराफिन या पोर्तुगीज शब्दाचा अपभ्रंश
* अहमदी- टीपुचा सोन्याचा होन
* इभ्रामी- इब्राहीम आदिलशहाचा होन
* एकेरी- दक्षिणेकडील होन
* कची ठेली- तडे गेलेला, तुटका , पुसट रुपया
* कंठीरुपया- नीळकंठी रुपया
* कलेकरी- कलदार रुपया
* कामील- एक होन प्रकार
* कावेरीपाक- एक होन प्रकार
* खुर्दा- मोड
* खुळा पैसा- दक्षिनेतील तांब्याचे नाणे, 700=1 रुपया
* गंजीकोट- गंजीकोट येथील चलन
* गंभार, गंभर- एक सोन्याचे नाणे
* चतरसिंगी रुपया- पुणे येथील चतुश्रुंगी रुपया
* अटीचा रुपया- आटविन्यास योग्य खराब झालेला रुपया
* अदवानी- होन प्रकार
* इटावप्रत- इटावा येथील रुपया
* जडमोल- होन प्रकार
* जमसिरि, जमसेरी, जमखंडि- होन प्रकार
* जहाजानी पंचमेळ रूपये- रूपयाचा प्रकार
* जुनथर- जुने चलनातील नाणे
* जुल्फकारी, झुल्पकारी- हैद्राबादचा रुपया. यावर तरवार चिन्ह असते
* जैफ- पुसट, गुळगुळीत झालेली किंवा कातरलेली नाणी. ही पोत्यास किंवा सरकारी तिजोरित भरण्यास अयोग्य
संकलन- आप्पा परब
संदर्भ- हुजूरबाजार

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.