शिवकाऴातील ऐतिहासिक कागदाचे व कापडाचे प्रकार-
* अलतस- साटिन, रेशमी कापड
* अवरंगजेबी- कापडाचा एक प्रकार
* अस्तने- कबरिवर घालावयाचे वस्त्र
* आडकनीदार- पातळाचा प्रकार
* आबष्मानि- कागदाचा प्रकार आकाशी रंगाचा
* आस्वली- पागोटे/लुगड्याचा/पातळाच्या पदराचा प्रकार
* इलाखा- कापडाचा एक प्रकार
* कद- कापडाचा एक प्रकार
* कळसपाकी- कापडाचा एक प्रकार. कळसपाक या गावी तयार होणारे कापड
* कोशरा- एक तऱ्हेचे भरड रेशमी कापड
* खसखसी- कापडाचा एक प्रकार
* खाणपोस/खाणेपोस- तबकावर/ताटावर घालावयाचे अच्छादनाचे वस्त्र
* गुलबदन- एक प्रकारचे रेशमी कापड
* चांदला- कापडाचा एक प्रकार
* चिकंदोजी- कापडाचा एक प्रकार. फुले किंवा वेलबुट्टी काढलेली शाल
* चौशाला- शेल्यासारखे एक वस्त्र
* छडीदार- छडीसारखे उभे पट्टे असलेले कापड
* जडगिरि- कागदाचा एक प्रकार
* जमखाना- मोठी सतरंजी
* जर्बाब- भरजरी वस्त्र
* जामदानी- कापडाचा एक प्रकार
* जिन्पोष- गाशा, जिनावर घालावयाचे वस्त्र
* जोट- शेला सूती, पासोडि, जाडेभरडे सूती कापड
* झोरा- सतरंजि
* झोळणा- चार कोपरे एकत्र केलेले वस्त्र
* टिकलीदार कागद- कागदाचा एक प्रकार
* डिगले- डगले(जाड कापडाचा अंगरखा)
* तरदाम- कापडाचा प्रकार
* ताप्ता- चमकणारे रेशमी वस्त्र
* ताषाचा पोशाख- भरजरी वस्त्र
* तोहबंद- नेसण्याचे धोतर, आतला कापड
* थिरमा- पहाड़ी मेंढ्यांच्या लोकरिपासून बनविलेले वस्त्र
* दमास- कापडाचा एक प्रकार
* दुतु- एक प्रकारचा अंगरखा
* दुरोखी पातळ- पातळाचा एक प्रकार
* दोले- एक तऱ्हेचे कापड
* पटापटी- ज्यावर पट्टे काढलेले आहेत तसे कापड
* पटु- भरड लोकरि कापड, ब्लैंकेट
* परबशाही- कागदाचा एक प्रकार
* परोचा- पारचा, वस्त्र
* पशमी- कापडाचा एक प्रकार
* पश्मीना- लोकरि वस्त्र
* पाचे- कापडाचा प्रकार
* पासोडी लिंगे- कापडाचा एक प्रकार
* पुस्तबादली- पोषाखाचा एक प्रकार
* पैमा- कापडाचा एक प्रकार
* फर्गोल- रुदार अंगरखा, पायघोळ, दुलई,रजई
* बझर्गा- जिनावर घालावयाचे वस्त्र आणि गाशा
* बहादुरखानी- दौलताबाद येथे पूर्वी तयार होणाऱ्या विविध कागदपत्रांपैकी सर्वात उत्तम जातीचा कागद
* बाफ्त/बाफ्ता- विनलेले एक जाळिदार सूती कापडाचा एक प्रकार
* बाळापूरी- कागदाचा एक प्रकार
* बुरखी/भुरकी- घोड्याच्या अंगावर व डोक्यावर घालावयाचे झुलिसारखे आच्छादन
* भुजपत्र- पातळ झिरझिरित कागद
* मख्मल- एका बाजूस अगदी नरम अशि दाट लव आहे असे उंची वस्त्र
* मदगडी/मधगडी- दौलताबाद येथे बनविला जाणाऱ्या कागदाचि दुय्यम जात
* मसरु- रेशमी
* माल्क- कापडाचा एक प्रकार
* मिटु- मिठु, कापडाचा प्रकार
* मीठा- कापडाचा एक प्रकार
* मुशजर- वेलबुट्टीचे काम केलेले रेशमी कापड
* मोमजमा/मोमजामा- मेणकापड
* मोहरेदार- घोटिव गुळगुळीत व चकाकित कागद
* मोहाली- हत्तीचे डोळे तेवढे उघडे ठेऊन कपाळ झाकनारे वस्त्र याला घाटा शिवलेले असतात
* रुजामा- रुदार कापड, पातळ गादी
* रूद्रगांठ- मागावर विणताना वस्त्रात जी एक विशिष्ट नक्षि काढतात ती, अशि नक्षि काढलेले कापड त्याला रूद्रगाठी म्हणत
* रेजा- कापडाचा तुकडा
* लॉन- बारीक कापड
* लोट/लोढ- (स्त्री) वस्त्राला घातलेला गोट, मुरुड/दावण
* वर्ख- कागद
* वसला- वस्त्राचा तुकडा
* शबनम्- एक तऱ्हेचे कापड
* शालथिरमा- कश्मीरी शाल
* शाल थिरमा नुमा- नकली कश्मीरी शाल
* शास्ताखानी- कागदाचा एक प्रकार
* शिरपाव/शिरोपाव- पायघोळ अंगरखा, बहुमाणाचा पोशाख
* शेलारी- स्त्रियांच्या लुगड्याचा प्रकार
* सकलात/सकलाद- एक प्रकारचे शेँदरी अथवा निळे कापड
* संजपी- कापडाचा एक प्रकार
*साजू- विशिष्ट वेळी/विशिष्ट पेशा स्वीकारताना धारण करावयाचा ऊंची/शोभिवंत पोशाख त्यालाच गोपाळवस्त्रे म्हणतात
* सावले- स्त्रियांचा लुगड्याचा एक प्रकार
* सिरी- शिरी, हट्टीच्या डोक्यावर घालावयाचे आवरण
* सुताडा- स्त्रियांचा लुगड्याचा एक प्रकार
* सुतळी- स्त्रियांचा लुगड्याचा प्रकार
* सुशी- स्त्रियांचा लुगड्याचा प्रकार
* सोनरीनिलख- भर्जरी कपडा
* सोरिवली- कापडाचा एक प्रकार
* हंडा- स्त्रियांच्या लुगड्याचा प्रकार
* हबसाणी- लिहिन्याचा कागदाचा एक प्रकार
* हलगत- स्त्रियांच्या लुगड्याचा एक प्रकार
* हशा- वस्त्रांची/पोषाखाची किनार किंवा काठ
* क्षीरोदक- स्त्रियांच्या लुगड्याचा एक प्रकार
* अनारदाणी- डाळिंबाचे दाणे चितारलेले वस्त्र
* अलखालक- कपड्याचा एक प्रकार
* आंगाबानी- नक्षि/फुले काढलेले वस्त्र
* आठाण/आठाणी- वस्त्राचा एक प्रकार
* उत्तरी- अंगवस्त्र
* एरंडे- रेशमी कापडाचा प्रकार
* करळा- छिटाचे लुगडे
* कळकी कागद- कागदाचा एक प्रकार
* काच्या- तालीम करताना कमरेस बांधावयाचे कापड
* कांचोळी- हिरव्या ताप्तयाची/हिरव्या रंगाची रेशमी चोळी
* किंतान- कापडाचा एक प्रकार
* किनखाप- रेशमाच्या कापडावर सोन्याच्या धाग्यानि विनलेले नाक्षीदार वेलबुट्टीचे कापड
* कीर्दी- कागदाचा प्रकार
* कुतनी/खुत्नी- गर्भसूती कापड
* कुसूंबा- अफुच्या बोंडातील एक अर्क, त्या अर्काने रंगविलेले कुसंबी रंगाचे कापड
* खसखरी- खरबरी असा कागद
* गाभा- डोक्यात घालावयाचे वस्त्र
* घनवेल- कापडाचा एक प्रकार
* चकला- कापडाचा एक प्रकार
* चवटे- एक प्रकारचे कापड
* जडगिरि- कगदाचा एक प्रकार
* तपशीला- स्त्रियांच्या कपड्याचा एक प्रकार
* तसर- रेशमी कापडाचा प्रकार
* तसराव- रेशमी कापडाचा प्रकार
* तस्लीम आदाब- सत्काराचा पोशाख
* ताफता- रेशमी कापडाचा प्रकार
* दंडिया- स्त्रियांचा लुगड्याचा प्रकार
* दीपमाळ- अलंकारिकरीत्या उंच व सडपातळ असलेल्या स्त्रिस दीपमाळ म्हणतात
* दुमेटी- एक प्रकारचे कापड
* दोलास/दौलास- जाड कापडाचा प्रकार
* धोबला(पु)- जाडे भरडे वस्त्र
* धोसा/धुसा(पु)- फ्लेनेलसारखे एक कापड
* पाटाऊ/पाटव- स्त्रियांच्या लुगड्याचा प्रकार
* पागडे- स्त्रियांच्या लुगड्याचा एक प्रकार
* पैजार पाठाडी- पागोटयाचा एक प्रकार
* पोस्त- कलमदानात दौतीबरोबर ठेवण्यात येणारा कापडाचा तुकडा
* फांजीव- दोऱ्याने काढलेल्या /विणलेल्या निरनिराळ्या आकृति
* फुस्तीन- सूती कापडाचा एक प्रकार
* बळगी- स्त्रियांच्या लुगड्याचा एक प्रकार
* मशस- रेशमी कापडाचा प्रकार
* साधक- पुराव्याचा कागद
*पाखरा- जरीचे वस्त्र
-पोस्ट साभार : मनोज कांबळे.
CTET Feb 2026 Final Ans Key CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key - Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key - Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key - Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key - Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल. More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy
Comments
Post a Comment