🌈 *स्पर्धेच्या युगात....... भाग 5* 🌈
दि 28 जून, 2019 शुक्रवार
_______________________________
*पेपर 1 ला*
विषय :- मराठी,
*उपघटक : 2 . 3 - वचन*
★ वचन - वस्तू एक आहे की अनेक हे ज्यावरुन कळते त्याला नामाचे वचन असे म्हणतात वचनाचे दोन प्रकार आहेत .
( १ ) एकवचन ( २ ) अनेकवचन
★ एकवचन - नामावरुन एका वस्तूचा बोध झाला तर ते एकवचन समजावे .
उदा . झाड , पान ,
★अनेकवचन - नामावरुन अनेक वस्तूंचा बोध झाला तर ते अनेकवचन समजावे उदा . झाडे , पाने ,
★काही नामाचे अनेकवचन करताना त्यांच्यामध्ये बदल होत नाही , अशा नामांना उभयवचनी नाम असे म्हणतात .
उदा . शाळा , पेर नमुना
_______________________________
प्रश्न 1 व 2 साठी दिलेल्या नामाचे अचूक अनेकवचन ओळखा . . 1 . घर 1 ) घरी 2 ) घरात 3 ) घरे 4 ) घरुन
*स्पष्टीकरण : घर या नामाचे ' घरे ' हे अनेकवचन आहे.*
उत्तर : पर्याय क्र . ३
प्र . 2 . तलवार
1 ) तलवारा 2 ) तलवारी 3 ) तलवारे 4 ) तालावारी
*स्पष्टीकरण : तलवार या नामाचे ' तलवारी ' हे अनेकवचन आहे.*
*उत्तर पर्याय क्र 2*
प्रश्न 3 व 4 साठी दिलेल्या नामाचे योग्य एकवचनी रुप ओळखा . .
3 :- वारुळे
1 ) वारुळा 2 ) वारुळे 3 ) वारुळी 4 ) वारुळ
*स्पष्टीकरण : वारुळे ह्या अनेकवचनाचे ' वारुळ ' एकवचन आहे.*
उत्तर : पर्याय क्र 4
प्र . 4 . दगड
1 ) दगड़े 2 ) दगड 3 ) दगडी 4) दगडा
*स्पष्टीकरण : ' दगड ' या शब्दाचे एकवचनी व अनेकवचनी रुप हे ' दगड ' असेच राहते जसे एक दगड , अनेक - दगड*
उत्तर : पर्याय क्र . 2
________________________________
*आपण "स्पर्धेच्या युगात" समूहात सामील नसाल तर कृपया खालील लिंक वर माहिती भरून जॉईन व्हावे, जेणे करून आपणास आमच्या सरवात्मक माहिती व पेपर तात्काळ मिळतील.*
🌎 *लिंक* 🌎
https://bit.ly/2xdxnqk
✒ *संकल्पना* ✒
*श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
📞 *7588020886*
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
*स्पर्धेच्या युगात..........*
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
Comments
Post a Comment