🌈 *स्पर्धेच्या युगात....... भाग 4* 🌈
दि 27 जून, 2019 गुरुवार
_______________________________
*पेपर 1 ला*
विषय :- मराठी,
*उपघटक : 2 . 2 - लिंग*
मराठी भाषेत तीन प्रकारची लिंग आहेत ,
( 1 ) पुल्लिंग
( 2 ) स्त्रीलिंग
( 3 ) नपुंसकलिंग
1) पुल्लिंग -
एखाद्या नामावरुन पुरुषजातीचा बोध झाला तर ते नाम पुल्लिंग आहे असे समजते.
2) स्त्रीलिंग -
एखाद्या नामावरुन स्त्रीजातीचा बोध झालातर ते नाम स्त्रीलिंगो आहे असे समजावे.
3) नपुंसकलिंगी -
एखाद्या नामावरुन पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही तेव्हा ते नाम नपुंसकलिंग असे समजावे.
★ पुल्लिंगी नामाचा उल्लेख ' तो ' या शब्दाने केला जातो .
उदा . तो - सुहास
★ स्त्रिलिंगी नामाचा उल्लेख 'ती ' या शब्दाने केला जातो .
उदा . ती - राधिका
★ नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख ' ते ' या शब्दाने केला जातो.
उदा . ते - पुस्तक
_______________________________
*प्रश्न 1 ते 4 साठी - लिंग विचारानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा.*
प्र . 1 . 1 ) लांडगा 2 ) लांडोर 3 ) कोल्हा 4) सिंह
_स्पष्टीकरण : लांडगा , कोल्हा , सिह ही नामे पुल्लिगी आहेत._
*ती - लांडोर , लांडोर हे नाम स्त्रिलिंगी आहे.*
*उत्तर : पर्याय क्र . 2*
प्र . 2 . 1 ) गाय 2 ) माता 3 ) पुजारी 4) झोपडी
_स्पष्टीकरण : गाय , माता , झोपडी ही स्त्रिलिंगी नामे आहेत._
*तो - पुजारी हे नाम पुल्लिंगी आहे.*
*उत्तर : पर्याय क्र . 3*
प्र . 3 . 1 ) गाव 2 ) खुर्ची 3 ) घर 4) झाड
*स्पष्टीकरण : गाव , घर , झाड हे नपुंसकलिंगी नामे आहेत . ती - खुर्ची हे नाम स्त्रिलिंगी आहे .*
*उत्तर : पर्याय क्र . 2*
प्र . 4 . 1 ) पंखा 2 ) हवा 3 ) शैला 4) यात्रा
*स्पष्टीकरण : हवा , शैला , यात्रा ही स्त्रिलिंगी नामे आहेत.*
_तो पंखा हे नाम पुलिंगी आहे._
उत्तर :- पर्याय क्रमांक 1
________________________________
*आपण "स्पर्धेच्या युगात" समूहात सामील नसाल तर कृपया खालील लिंक वर माहिती भरून जॉईन व्हावे, जेणे करून आपणास आमच्या सरवात्मक माहिती व पेपर तात्काळ मिळतील.*
🌎 *लिंक* 🌎
https://bit.ly/2xdxnqk
✒ *संकल्पना* ✒
*श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
📞 *7588020886*
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
*स्पर्धेच्या युगात..........*
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
Comments
Post a Comment