🌈 *स्पर्धेच्या युगात* 🌈
दि 26 जून, 2019 बुधवार
📚 *विषय भाषा (मराठी):- भाग 3* 📚
_संकलन व मांडणी_
*★ लक्ष्मण काटेकर, सोलापूर*
📞 *7588020886*
_______________________________
*★ विषय भाषा मराठी ★*
_*घटक :- 1 ला:- उतारा व उताऱ्यावरील प्रश्नसाठी काही नमुनेदाखल उतारे देत आहोत त्याचे वाचन करावे व काही प्रश्न आपण विचारावेत आपणास शनिवारी होणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त पडतील*_
*★ उतारा क्रमांक 1*
सर्व दृष्टीने प्रसन्न असणारा चैत्र महिना जेव्हा येतो तेका सीमातेगा लाडका गसतानी ल ! चाललेली असते . वृक्षांना नवी पाने फुटू लागतात . कोवळ्या पानांनी बहरलेली झाडे लहान मुलासारखी गुटगुटीत दिसू लागतात , निसर्गराजी खुशीत शीळ घालत असतो . कोकिळ कुहू कुहू गात असतो . उत्सत खेळ करमणूक थोथा त्रिवेणी संगम याच महिन्यात पाहावयास मिळतो . या महिन्यात हिंदू धर्मियाच्या नववर्षाला प्रारंभ होतो आनदाप्रित्यर्थ गुढी उभारून साजरा केला जाणारा हा सण म्हणजे ' गढीपाडवा ' या दिवशी विरामी ज्ञानार्जनाचा संकल्प करून भरपूर अभ्यास करण्याचे स्वत : लाच वचन दिले पाहिजे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*★ उतारा क्रमांक 2*
जालना जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या कामाला जुपलेल्या इंदूला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती . आज इथे शाळा तर उद्या तिथे . तिने चंग बांधला . काही झाले तरी मुलांना शिकवायच . तिने तडक शहर गाठलं . शहरात झोपडीवजा घर बांधले . तिथल्याच नामांकित शाळेत मुलांना घालण्याचा ध्यास घेतला . धुण्या - भांड्यांची कामे मिळवली . थोडी स्थिरावल्यावर तिने त्याच शाळेत मुलांना प्रवेश घेतला . इंदूने हलाखोच्या परिस्थितीत घरकामांबरोबर कधी कधी , केळी विकून मुलांच्या फी चा प्रश्न सोडवला . पण कधी कुणापुढे हात पसरला नाही . मुलांनाही आईची धडपड दिसत होती . त्यांनीही मन लावून अभ्यास केला . आज इंदूची दोन मुले उच्चशिक्षण घेत आहेत तर छोटा शालेय शिक्षणाबरोबर कराटे या खेळ प्रकारामध्ये प्रावीण्य मिळवत आहे . त्यांच्यासाठी पावशेर दूध मिळावं म्हणून अशा धडपडणाच्या आईचे मुलांच्या प्रगतीत मोठे योगदान आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*★ उतारा 3 रा :-*
तामिळनाडूच्या पश्चिमेस समुद्रकिनारी रामेश्वरम् नावाचे छोटे गाव तेथील शिवमंदिरामुळे प्रसिद्ध होते . प्रभू श्रीरामचंद्रांनी या भूमीत पाय ठेवले , अशी इथल्या लोकांची धारणा होती. येथेच १५ ऑक्टोबर १९३१ रोजी अब्दुलचा जन्म झाला . अब्दुलच्या वडिलांचे उत्पन्नाचे मुख्य साधन रामेश्वरम् ते धनुष्कोडीपर्यंत यात्रेकरूना ने - आण करणे हे होते . संपूर्ण कुटुंबाचा चरितार्थ त्यावर अवलंबून होता ; परंतु एका मोठ्या वादळामुळे रामेश्वरमुच्या किना - याला जबरदस्त तडाखा बसला . त्यात होडीचे पण नुकसान झाले , अशा बिकट प्रसंगी अब्दुलने चिंचोक्याच्या बिया दुकानदाराला विकून , तसेच चुलतभावाला वर्तमानपत्र विकण्यास मदत करून पहिली कमाई केली . यातून कुटुंबाचा भार उचलण्यास समर्थ असल्याचा आनंद मिळवला .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*★ उतारा 4 :-*
साताऱ्यापासून जवळ असलेल्या ' माहुली ' गावच्या प्रभुण्यांच्या गरीब कुटुंबातील राम हा मुलगा खूप अभ्यास करून धर्मशास्त्रात प्रवीण झाला . लोक त्यांचा सन्मान करू लागले . आता ‘ रामशास्त्री ' या नावाने ते । ओळखले जाऊ लागले . रामशास्त्री पुढे पुण्यात राहण्यास आले . त्यांची हुशारी पाहून पेशव्यांनी त्यांना न्याय खात्यामध्ये नोकरी दिली . शास्त्राचे उत्तम ज्ञान , न भिता योग्य न्याय देण्याचे धाडस आणि स्पष्टवक्तेपणा , खरे बोलण्याची तयारी , यामुळे रामशास्त्री सर्वांचे आवडते झाले . अंगच्या हुशारीने पुढे ते मराठी राज्याचे मुख्य न्यायाधीश बनले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*★ उतारा - 5 वा :-*
निसर्ग अभ्यासाची पहिली पायरी म्हणजे पक्षीनिरीक्षण , अगदी पक्षांसारखे आकाशात उडण्याचे स्वप्न पाहणा - या माणसाने पक्ष्यांना समोर ठेवूनच विमानाचा शोध लावला होता . राइट बंधूनी विमान बनवण्या आधी अनेक देशांमध्ये अनेक संशोधक आकाशात उडण्याचे वेगवेगळे प्रयोग करत होते . अगदी पक्षांची पिसे वापरून त्याचे मोठे पंख तयार करूनही उडण्याचे प्रयत्न झाले आहेत ! खरंच पक्षीविश्व इतके अद्भुत आणि रम्य आहे , की लेखक , कवी , गीतकार , संगीतकार , चित्रकार , शिल्पकार अशा अनेकांना अजरामर रचना करण्यास पौराणिक काळापासून प्रेरणा देत आले आहे . या पृथ्वीवर अशी एक इंच जागा नाही , जिथे पक्ष्यांची सावली पडली नसेल , पक्षीनिरीक्षण हा ' शून्य ' पैसे खर्च येणारा जगातला लोकप्रिय छंद आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*★ उतारा - 6 वा:-*
आर्यभट यांचा जन्म कसमपूर ( पाटणा ) मध्ये इ . स . ४७६ मध्ये झाला . इ . स . ४९९ मध्ये जेव्हा ते केवळ २३ वर्षांचे होते , तेव्हा त्यांनी ' आर्यभट ' या ग्रंथाची रचना केली . त्यामध्ये गणित आणि ज्योतिषाचे कित्येक सिद्धांत दिले आहेत . सुरुवातीस या पुस्तकाबद्दल कोणालाही माहिती नव्हती ; पण जेव्हा भारत व आशियाच्या अनेक विद्वानांनी आपल्या ग्रंथात आर्यभटाच्या सिद्धांताचा उल्लेख केला , तेव्हा युरोपीयन लोकांना माहीत झाले की , आर्यभट हे त्यावेळचे गणित विक्ष्येतील महान पंडीत , ज्योतिष शास्त्राचे संशोधक होते . विद्वानांच्या उल्लेखाच्या आधारावर त्या ग्रंथाचा शोध सुरू झाला आणि अखेर इ . स . १८६४ मध्ये त्याचा शोध लागला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*★ उतारा - 5 वा :-*
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रियांका सुट्टीनिमित्त आई व अमित सोबत मामाच्या गावी गेली . एके दिवशी ती कपडे धुण्यासाठी आई व अमित सोबत नदीवर गेली असताना काठावर खेळणारा अमित पाय घसरून । नदीच्या पाण्यात पडला व बुडू लागला . आई घाबरून गेली . प्रियांकाने प्रसंगावधान राखून , धुण्यातील एक साडी घेतली . साडीचे एक टोक तिने अमितकडे फेकले . अमितने ते टोक पकडले . प्रियांकाने साडी हळूहळू ओढून अमितचे प्राण वाचवले . प्रियांकाच्या धाडसाची दखल घेऊन तिला ‘ बालशौर्य पुरस्कार ' देऊन गौरविण्यात आले .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*वरील उताऱ्याविषयी हे जाणून घ्या*
★उतारा लक्षपूर्वक वाचा. ★उताऱ्यातील आशय समजून घ्या
★उताऱ्यातील शब्दांचे अर्थ नीट नीट समजून घेऊन वाक्य पुन्हा पुन्हा वाचा.
★उताऱ्यातील प्रसंग वर्णन संवाद घटना इत्यादी मागील कार्यकारण भाव समजून घ्या.
★उताऱ्यातील माहितीच्या क्रमाने प्रश्नांचे क्रम असतीलच असे नाही.
★उतारा वाचून उत्तरे नोंदविताना चारही पर्याय लक्षपूर्वक वाचावं योग्य पर्याय निवडा.
★उत्तराचा पर्याय क्रमांक निवडताना उताऱ्यातील तेवढा भाग पुन्हा वाचून अचूक पर्यायाची खात्री करून घ्या.
_*वरील प्रमाणे माहिती लक्षात ठेवून आपल्या पाठ्यपुस्तकातील उतारा वाचा वरील मुद्दे लक्षात ठेवून शिक्षक प्रश्न बनवून देतील अथवा आपण स्वतः 10 प्रश्न बनवा, आणि त्याचे उत्तरे सोडवा.*_
_______________________________
*★ उपघटक :- 2 :-*
*कविता आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या*
खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित उत्तरांचा योग्य पर्याय निवडा :-
*★ कविता क्रमांक 1*
निळ्या खाडीच्या काठाला
माझा हिरवाच गाव ,
जगात मी मिरवतो
त्याचे लावृनिया नाव ।
पूल ओलांडिता पुढे
रस्ता येईल ताबड़ा ,
घरी आणील सरळ
जरी दिसला वाकडा,
थोड्या पायवाटा हिडा
लांब , ताबड्या , वाकड्या ,
होड्या उपड्या झालेल्या
तशा पहाल टेकड्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*★ कविता क्रमांक 2 :-*
घरा घरात दिनदर्शिका असते
एवढी ती उपयुक्त असते ,
दिनदर्शिका एकूण १२ महिन्यांची असते ,
३६५ दिवसांचे त्यात नियोजन असते ,
सकाळी आजी दिनदर्शिका बघते ,
तारीख , वार बघून कार्यक्रम ठरवते .
आठवड्याचे सात वार असतात ,
चक्रासारखे ते फिरत असतात .
सोमवार ते शनिवार शाळा असते ,
रविवार आमचा सुट्टीचा असतो .
बाबा दिनदर्शिका हातात घेतात ,
कधी कुठे जायचे ठरवत असतात .
आई दिनदर्शिकेत सण बघते ,
संकष्टी , एकादशी पाहून उपवास करते .
अमावस्येनंतर पौर्णिमा १५ दिवसांनी येते ,
चंद्राच्या वाढणा - या कलांनी समजत असते ,
दिनदर्शिकेमुळे अचूक सारे जमते ,
एवढी ती उपयुक्त असते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*★ कविता क्रमांक 3 :-*
झुळूझुळू वाहे नदीचे पाणी ।
आलंय कुठून ? सांगेल का कुणी ?
डोगरदऱ्यात झालाय उगम ।
खळाळत वाहते प्रदेश असता दुर्गम ।
वाटेत भेटती गावे शेजारी ।
गरज भागवी त्यांची सारी ।
रानावनात झाडे अन् वेली ।
तृषार्ताना तीच असे वाली ।
का होते तिची दुर्दशा पुढे ।
गृहीत धरती बिचारीला सगळे ।
केरकचरा आणि सांडपाणी ।
जलप्रदूषण हे केले तुम्ही - आम्ही ।
जीवनदायिनी ही आपली ।
अवकळा सारी तिला आणली ।
वेळीच मानवा हो जागा ।
ठेव शुद्ध रे तू सरिता ।
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*★ कविता क्रमांक 4 :-*
साजउन्हाच्या चार पाकळ्या
उतरून दारी आल्या ,
लखलखणारे क्षितिजच अवघे
मला देऊनी गेल्या ।
निळा जांभळा इवला तुकडा
उतरून ये मजसाठी ,
आभाळच तो पदरी झेलून
बांधियले मी गाठी । ।
सर हलकीशी येऊन जाता
मेघ मिळाला मजला ,
एकरूप मी होता त्याशी
वणवा आतील विझला ।।
सारे सामावते मजमध्ये
सा - यांतून मी शिरते
असेच काही काही वेचत
झोळी माझी भरते ।
*वरील कविता व कवितेवर आधारित प्रश्नसाठी काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा*
★कविता लक्षपूर्वक वाचा. ★कवितेचा आशय समजून अर्थ जाणून घ्या.
★कवितेवर आधारित प्रश्न नीट वाचा.
★सर्व पर्याय तपासून पहा.
★योग्य उत्तराचा पर्याय शोधताना चारही पर्याय बारकाईने वाचा. ★पहिला पर्याय वाचून घाईने उत्तर नोंदवू नका.
_*वरील प्रमाणे माहिती लक्षात ठेवून आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता वाचा वरील मुद्दे लक्षात ठेवून शिक्षक प्रश्न बनवून देतील अथवा आपण स्वतः 10 प्रश्न बनवा, आणि त्याचे उत्तरे सोडवा.*_
______________________________
*वरील सर्व उपघटकावर आधारित किमान 10 प्रश्नांची निर्मिती करावी व उत्तरे सराव करावा, आपणास येत्या शनिवारी या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातील, त्यासाठी एक लिंक दिली जाईल, त्या लिंकवर पेपर मिळेल, तो सोडवावा.*
________________________________
*आपण "स्पर्धेच्या युगात" समूहात सामील नसाल तर कृपया खालील लिंक वर माहिती भरून जॉईन व्हावे, जेणे करून आपणास आमच्या सरवात्मक माहिती व पेपर तात्काळ मिळतील.*
🌎 *लिंक* 🌎
https://bit.ly/2xdxnqk
✒ *संकल्पना* ✒
*श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
📞 *7588020886*
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
*स्पर्धेच्या युगात*
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
Comments
Post a Comment