🌎 *स्पर्धेच्या युगात!!!....22* 🌎
दि.26 जुलै, 2019
_______________________
*एक दिवसीय मोफत शिष्यवृत्ती इ.5 वी व इ.8 वी साठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळा उत्कृष्ट प्रतिसादासह संपन्न झाले★*
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
सोलापूर शहरसह दक्षिण, उत्तर आणि मोहोळ तालुक्यातील इ.5 वी व इ.8 वी वर्गातील मुलांना, पालकांना आणि शिक्षकांना शिष्यवृत्ती परिक्षेबाबत मार्गदर्शन साठी सोलापूर येथील शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सभागृहात Mission 2020 शिष्यवृत्ती कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यशाळेस ग्रामीण भागातील मुलेमुली तसेच मोहोळ तालुक्यातून शिक्षण प्रेमी पालकांसोबत, शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. शनिवार असताना देखील, दुपार सुट्टी असताना श्री लक्ष्मण काटेकर (7588020886) यांनी शिष्यवृत्ती साठी कार्यशाळेचे आयोजन करत सर्वाना मोफत मार्गदर्शन बाबत स्पर्धेच्या युगात व्हाट्सअप्प समूहावरून वरून पोस्ट दिली, आणि केवळ पोस्ट च्या आधारे सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थी देखील वेळेत उपस्थित झाले.
अगदी किती वाजता कोणता घटक होणार, नेमकं काय केलं पाहिजे, सुरुवात कशी तयारी करावी ह्या पासून ते अभ्यासक्रम नियोजन, अभ्यासाचे नियोजन, भाषेतील बारकावे, आपण काय करावे व काय नको, तसेच गणित व बुद्धिमता विषयातील लहान टिपण्यासह बारकावे, क्लृप्त्या सह अनेक उदाहरणे देत अनेक घटक समजावून दिले.
सायंकाळी 5 वाजले तरी मुलांना नवीन नवीन संकल्पना मिळाल्या, समजलं, हीच अपेक्षा मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
सोबतच फक्त शाळावर पालकांनी अवलंबून न राहता, पालकांची भूमिका कोणती असावी, हे देखील समजावून दिले. ते पालकांना देखील समजले आणि आपल्या पाल्यासाठी पालकांनी वेळ काढत संधी द्यायलाच पाहिजे, हे लक्षात समजले.
असाच प्रतिसाद वाढत आहे, आणि अशाच शिष्यवृत्ती बाबत आणखी मार्गदर्शन आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील, तेंव्हा पालकांनी व शिक्षकांनी मुलांना उपलब्ध करून दिलेल्या संधीचा फायदा घ्यावा असे, श्री लक्ष्मण काटेकर यांनी आवर्जून सांगितले.
तसेच पुढील काळात शिष्यवृत्ती बाबत माहिती व मार्गदर्शन साठी खालील लिंक वर जॉईन व्हावे.
https://bit.ly/2xdxnqk
*स्पर्धेच्या युगात !!!....*
*श्री. लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
📞 *7588020886.*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ══❖▩ஜ ۩ 🚺 ۩ ஜ▩❖══
Comments
Post a Comment