🌈 *स्पर्धेच्या युगात* 🌈
📚 *विषय भाषा :- भाग 2* 📚
_संकलन व मांडणी_
*★ लक्ष्मण काटेकर, सोलापूर*
📞 *7588020886*
_______________________________
*★ विषय भाषा ★*
_*घटक :- 1 ला:- उतारा व उताऱ्यावरील प्रश्न*_
उतारा व त्यावरील आधारित प्रश्न
*हे जाणून घ्या*
★उतारा लक्षपूर्वक वाचा. ★उताऱ्यातील आशय समजून घ्या
★उताऱ्यातील शब्दांचे अर्थ नीट नीट समजून घेऊन वाक्य पुन्हा पुन्हा वाचा.
★उताऱ्यातील प्रसंग वर्णन संवाद घटना इत्यादी मागील कार्यकारण भाव समजून घ्या.
★उताऱ्यातील माहितीच्या क्रमाने प्रश्नांचे क्रम असतीलच असे नाही.
★उतारा वाचून उत्तरे नोंदविताना चारही पर्याय लक्षपूर्वक वाचावं योग्य पर्याय निवडा.
★उत्तराचा पर्याय क्रमांक निवडताना उताऱ्यातील तेवढा भाग पुन्हा वाचून अचूक पर्यायाची खात्री करून घ्या.
_*वरील प्रमाणे माहिती लक्षात ठेवून आपल्या पाठ्यपुस्तकातील उतारा वाचा वरील मुद्दे लक्षात ठेवून शिक्षक प्रश्न बनवून देतील अथवा आपण स्वतः 10 प्रश्न बनवा, आणि त्याचे उत्तरे सोडवा.*_
_______________________________
*उपघटक :- 2 :- वृत्तपत्रातील जाहिरात व बातम्यांवर आधारित प्रश्न*
_हे जाणून घ्या_
दैनंदिन व्यवहारात वर्तमानपत्र या माध्यमातून आपण विविध प्रकारच्या बातम्या तसेच जाहिराती वाचत असतो त्यातून व्यक्त होणारा आशय संदर्भ संदेश समजून घेणे महत्त्वाचे असते.
_*हे जाणून घ्या*_
★प्रथम जाहिरात बातमी लक्षपूर्वक वाचा.
★जाहिरात बातमी चा विषय समजून घ्या.
★स्थळ, काळ इत्यादी बाबी जाणीवपूर्वक समजून घ्या. ★जाहिरात बातमी यातून व्यक्त होणारा संदेश समजून घ्या.
★तर्काने अंदाजाने योग्य अर्थ लावण्याचा प्रयत्न करा.
_*वरील प्रमाणे माहिती लक्षात ठेवून आपल्या वर्तमानपत्रातील जाहिरात वाचा वरील मुद्दे लक्षात ठेवून शिक्षक प्रश्न बनवून देतील अथवा आपण स्वतः 10 प्रश्न बनवा, आणि त्याचे उत्तरे सोडवा.*_
_______________________________
*उपघटक :- 2 :- कविता व कवितेवर आधारित प्रश्न*
★कविता लक्षपूर्वक वाचा. ★कवितेचा आशय समजून अर्थ जाणून घ्या.
★कवितेवर आधारित प्रश्न नीट वाचा.
★सर्व पर्याय तपासून पहा.
★योग्य उत्तराचा पर्याय शोधताना चारही पर्याय बारकाईने वाचा. ★पहिला पर्याय वाचून घाईने उत्तर नोंदवू नका.
_*वरील प्रमाणे माहिती लक्षात ठेवून आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता वाचा वरील मुद्दे लक्षात ठेवून शिक्षक प्रश्न बनवून देतील अथवा आपण स्वतः 10 प्रश्न बनवा, आणि त्याचे उत्तरे सोडवा.*_
_______________________________
*विषय भाषा:-*
*भाग 2 :-कार्यात्मक व्याकरण*
*उपघटक :-शब्दांच्या जाती*
नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद.
*1)नाम:-*
_प्रत्यक्ष अथवा काल्पनिक वस्तूच्या नावास किंवा गुणधर्म दर्शविणाऱ्या शब्दाला "नाम" असे म्हणतात._
उदा.:- उदा. गोविंद, घोडा, आंबा, गंगा, पुस्तक, दूध, भारत, गहू, प्रामाणिकपणा, अप्सरा.
*2) सर्वनाम :-*
_एकाच नामाचा उच्चार वारंवार होऊ नये म्हणून नामाबद्दल जो शब्द वापरतात त्याला "सर्वनाम" असे म्हणतात._
उदा. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, त्या, जो, जी, ज्या, हा, ही, ह्या, हे, ज्याने, त्याने, आपण, आम्हास, आम्हाला, तुम्हांला.
*3) विशेषण :-*
_नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला "विशेषण" असे म्हणतात._
उदा.:- बलाढ्य, आळशी, हिरवी, उंच, धारदार, कडू, सुगंधी, इमानी, कर्कश, टपोरे, पाच, दुप्पट.
*4) क्रियापद :-*
_वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला "क्रियापद" असे म्हणतात._
उदा. आहे, नाही, सांगितले, म्हणतात, बोलतो, खेळतात, नांगरतो, खातो, तोडतो, लिहितो.
*वरील सर्व उपघटकावर आधारित किमान 10 प्रश्नांची निर्मिती करावी व उत्तरे सराव करावा, आपणास येत्या शनिवारी या घटकावर आधारित प्रश्न विचारले जातील, त्यासाठी एक लिंक दिली जाईल, त्या लिंकवर पेपर मिळेल, तो सोडवावा.*
________________________________
*आपण "स्पर्धेच्या युगात" समूहात सामील नसाल तर कृपया खालील लिंक वर माहिती भरून जॉईन व्हावे, जेणे करून आपणास आमच्या सरवात्मक माहिती व पेपर तात्काळ मिळतील.*
🌎 *लिंक* 🌎
https://bit.ly/2xdxnqk
✒ *संकल्पना* ✒
*श्री लक्ष्मण काटेकर, सोलापूर.*
📞 *7588020886*
⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
*स्पर्धेच्या युगात*
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
Comments
Post a Comment