उन्हाची चाहूल लागत सणाचा काळ आला होता, सगळीकडे सण यात्रा यांची चाहुल लागली, तसतशी शेतातील कामं वाढली होती. कामाच्या व्यापाने सर्वजण लवकर घराबाहेर पडत होती. प्रत्येकाला वर्षभरातील कष्टाचे फळ जास्तीत जास्त मिळवण्यासाठी शेतात काबाडकष्ट करत होते. तसे मला कसलीही कल्पना नसलेली माझी आई देखील सदूण्णासोबत काम करत होती. सोबतच घरासमोर आ वासून असलेली शेळी गाय वासरे ह्यांना काहीतरी खायला देणं गरजेचं होतंच. अशा वेळी कमी कष्टाने काहीच मिळत नसत हे समजून थंडी संपल्याचे जाणवत होते.
अशातच एक त्या आईला जाणीव झाली की एक नवीन जीव तयार होत आहे, ही गोष्ट लवकरच ह्या कानाची बघता बघता गावभर पसरू लागली. तसे आईची मागणी, लाड वाढू लागले. हळूच आई पोटावरुन हात फिरवत गर्भात मला विचारी "बाळाला काय हवंय ?" खरं तर हवं असायचं तिलाच, पण माझ्या न जन्मलेल्या नसलेल्या नावाखाली. जिलेबी, चिवडा, पेढा, बोरं, चिंच ह्यांनी जणू संक्रात संपल्याने नवनवीन फळ बाजारातून मिळत होती. गर्भातच मला तिच्या रक्तातून हवं ते सगळं मिळत होते. याची मला थोडीदेखील कल्पना नव्हती. अशातच नऊ महिने भरपूर चांगलं चुंगल खात आईचे लाड सदूने पुरवत खूप छान दिवस चालले होते. थंडी संपली आणि मार्गशीर्ष संपल्याची जाणीव मला देखील गर्भात होत होती. मधल्या प्रत्येक हालचालींची जाणीव बहुतेक बाहेरून होत असावी. ह्या अशा माझ्या तीन साडेतीन पाउंड वजनाचा बोजा पोटात घेऊन आपली दैनंदिन कामे करत ती जगत होती. ह्यावेळी काय वेदना असतील ह्या फक्त तिलाच माहीत आणि तीच तिनेच त्या सहन करू जाणे.
संक्राती नंतर दोन तीन दिवसांनी सकाळी लवकरच सदूण्णानी गाई शेळ्या चरण्यासाठी शेतात घेऊ गेले. घरातील झाडून घरकाम उरकून आई देखील शेतात निघाली. तसे तिच्या सोबत वासरू आणि कोकरू होतेच त्यांना कडब्याची पेंडी कापून टाकून माझे ओझे वागवत शेतात जाऊन काम करू लागली. तसतसे तिला काहीतरी जाणवत होतं. त्रास होत होता पण बोलणार कोणाला ? ह्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने संध्याकाळी आहे अशा वेदनेसह घराकडे परतली. वाटेत तिला भेटणाऱ्या महिला विचारत 'काय ग काय होतंय?' तिचे उत्तर ठरलेले, 'काही नाही, भाजी खुरपायला गेले होते.'
अशा दुखण्यात तिने घरी येऊन घरातील सर्वांसाठी स्वयंपाक बनवला. सर्वजण जेवू लागले, पण तिला अन्न खाऊ वाटत नव्हते, पित्त देखील नव्हते झाले. परंतु नेमकं काय दुखत हेच कळत नव्हतं. असच सगळं आवरत भांडी घासून ठेवली आणि अंथरूनावर अंग टाकत घरातून दिसणाऱ्या चांदण्या नेहाळत तिने चांदण्या मोजण्याचा प्रयत्न करीत होती.
रात्रीचे 11 वाजले असतील तिला बाळंतिनीच्या कल्पना जाणवू लागली. तिला खूप त्रास होऊ लागला. तशी तिने भरत्या रात्रीला जोरात किंकाळी मारली. "आई ग ~~~~~~~", पण त्या आवाजाने सर्वजण जागे झाले, आणि पळतच घरात शिरू लागले परंतु त्या मध्ये काही दाई होत्या. त्यांनी आजपर्यंत साधारण 40 ते 50 प्रसूती केल्या होत्या असं आता मला समजते. त्या आईजवळ येत आणि कळाची कल्पना समजून सांगत देऊ लागल्या परंतु प्रसूतीच्या कळा ह्या आईला येत होत्या सांगणाराला काय माहीत कळा? आई जोरात किंचाळत होती, वाचवा वाचवा म्हणत होती परंतु हिकडे जीवापाड प्रेम करणारे सदुभाऊ देवळात जाऊन नवस बोलत होते, "माझ्या बायकोला सुखरूप ठेव." आणि हिकडं तर आई वेदनेने बेफाम त्रासात क्षण क्षण ढकलण्याचा प्रयत्न होत होता'
आणि रात्रीचे 2 वाजले असतील. सर्वजण छपराखाली बसून होतेच, काहीजण म्हणत होते 'दवाखान्यात घ्या,' पण काहीजण म्हणत होते 'थोडावेळ वाट बघू .' आणि काही क्षणात आई बाळंतीण झाली आणि लहान माझा जीव बाहेर पडताच, चिरकण्याचा आवाज बाहेर पडला, आणि मग आई बाबाचा जीव भांड्यात पडला. तसे मला कापडाने पुसून घेत लपेटून घेवू लागले, आणि मुलगा की मुलगी असे प्रश्न विचारला ?
तसे घरातून उत्तर आले *मुलगी.* आणि खूप छान वातावरणात अचानक आग लागावी तसे निर्माण झाले. सदुभाऊंचा चेहरा तर विचारूच नका, पण स्वतःला सावरत सदुभाऊ घरात जायला निघाले, पण त्यांना कोणीही जाऊ दिल नाही. आणि काही क्षणातच आईच्या रूमचे दार लावून घेत कारण स्पष्टपणे मांडली जाऊ लागली. मला अंघोळ घालत एक गरम कपड्यात लपेटून घेतलं आणि आईच्या कुशीत पहिला क्षण अनुभवायला मिळाला, तो आज देखील जसाच्या तसा संपुर्ण आठवतो. कारण तो क्षण ती ममता ही माझ्यासारख्या सामन्याला जेवढी झाली तेवढ्याच प्रमाणात आज देखील जवळ घेऊन बोलण्यात आणि शाब्दिक आधार देण्याचे काम आई करते.
आता माझा लाड वाढत चालला होता, मला जपलं जात होतं आपलं मानलं जातं होते. बोटाला धरून जेवण चारणे, चिऊचा घास माऊचा घास करून जास्त खाऊ घातलं जात होतं, आणि मला सशक्त बनवण्याची केविलवणी धडपड मला समजत नसलं तरी आठवत नसले तरी न समजून दिसत मात्र नक्की होत.
असाच काही दिवस जाताच मला अचानक ताप आल्याचे आई सांगते. आणि पदर ओला करून माझ्या सर्वांगाला आई पुसू लागली, पण माझा ज्वर वाढत होता न जाणे काय होणार ह्या भीतीने आईने मला शेजारच्या काकूंकडे घेऊन गेली. तिने देव्हाऱ्यावरची माळ काढली, सुपात थोडे ज्वारीचे दाणे घेत सुकून बघू लागली. अगोदर भुताकेतांची नावे घेत, बाहेरवसा म्हणत, माळ हलवून बघू लागली. पण माळ हालेना असे समजून पुन्हा ज्वारीचे दाणे घेत पुन्हा देवांची नावे घेई माळ हालवून बघू लागली. माळ हालत नव्हती, तसतसे आईची जीव खालीवर होत होता, काळजी वाढत होती, नंतर काकूने घराजवळ राहणारी पण मयत झालेल्या लोकांची नावे घेऊन माळ हालवून बघायला सुरुवात केली, आणि माळ हालवल्यामुळे हालत असावी की कशामुळे समजलं नाही पण माझ्या तापाचे कारण म्हणून 'मला एक बाळंतिनीची बाधा झाल्याचा तर्क काकूंच्या सांगण्यात आल्याचे समजले. पुढे आईने आपला सगळं काही खर्च करण्याची तयारी दाखवत ही बाधा काढण्याची विनंती करता काकूने मला झेपत नसून त्यासाठी दुसऱ्या गावच्या मांत्रिकाला आमंत्रित केले आणि दुपारी 11 ची वेळ, ज्वर वाढत होता. तसे घरातील सगळे काळजीत दिसत होते. मांत्रिक लागलीच सायकलवरून आमच्या घरी हजर झाला. त्याने येतानाच काही वस्तू आणल्या होत्या आणि इतर उर्वरित वस्तूची यादी आईकडे काकूंच्या माध्यमातून दिली गेली. वस्तू खरेदी करून आणत आई देवाला नवस म्हणत होती, आई घरी येताच मंत्रिकाचे मंत्र पुराण सुरू झाले. त्याने सगळं काही सांगत नारळ पुरा, अमुक वस्तू टाका, समजून सांगितले आणि तो निघून गेला. पण माझा ज्वर कमी न होता वाढत होता. संध्याकाळ झाली तरी फरक पडेना अशी काळजीत आईने दिवाबत्ती केली आणि रडत बसली, त्याच वेळी सदूभाऊ ला रेडिओ ऐकायचा नाद असल्याने रेडिओवर संध्याकाळी 7 च्या बातम्या मोठ्या आवाजात लावल्या होत्या. सगळे बाहेर बाज टाकून बसले होते, बाज म्हणजे लाकडी चार पाय व त्याला दोरीने गुपलेला झोपण्यासाठी केलेली खेड्यातील सुविधा. बातम्या ऐकत असताना अचानक मध्येच सांगण्यात आले की "आपल्या बाळाला ताप आल्यास देवधर्म करू नका तर डॉक्टर कडे घेऊन जा " हे ऐकून होताच, आईच्या विचाराची ट्यूब पेटली आणि मला तिने डॉक्टरांच्या कडे घेऊन जाण्याचा विचार मांडला. तसा त्याला काही शेजाऱ्यांनी विरोध केला, पण कोणाचेही न ऐकता आई आणि वडील (सदू) रात्री 9 वाजता मला घेऊन डॉक्टर कडे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी वाहतूक सुविधा नव्हत्या. बैलगाड्या हेच साधन असे पण आमच्याकडे गाडी होती पण बैल नव्हते. अशात सायकल सोबत खांद्यावर मला टाकून दोघे निघाले, मनात म्हणू लागले "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या काकूंकडे गेलावं, आणि लेकरांच्या जीवावर खेळ मांडत बसलो."
रात्री 1.30 वाजता शहरातील डॉ गायकवाड यांच्याकडे आमची यात्रा पोहोचली. त्या डॉक्टरच्या दवाखान्याची कडी वाजवली. डॉक्टर यांचा ऐन झोपेची वेळ असल्याने बराच वेळ कडी वाजवल्यावर डॉक्टर उठले आणि मला तपासू लागले, तो पर्यंत मी बेशुद्ध पडलो होतो. डॉक्टरांनी आई वडिलांना खूप झापल्याचे मला नंतर समजले. तो पर्यंत अंगातून तापाचा परिणाम वाढत अर्धांग वायूकडे जात वाढत चालला होता. डॉक्टरांनी लगेच उपचाराला सुरुवात केली. काही औषध स्वतःच्या जवळची वापरून काही मेडिकल मधील आणायला पाठवले. आता वेळ रात्रीची कोणतं मेडिकल उघडे असणार आहे????. अशात डॉक्टरांनी टेबलावर असलेला काळा टेलिफोन वर गोल रिंग फिरवत एक कॉल केला आणि परिस्थिती सांगितली आणि मेडिकल देण्याचे सांगितले. तसे ते दुकान लांबच होते पण वेळ महत्वाची असल्याने, वडील सायकलवरून गेले आणि औषध घेऊन आले. माझ्यावर औषधावर औषध शरीरात सोडली जाऊ लागली, पण शरीर साथ देईना, हालचाल बंद झाली होती. डॉक्टर देखील काळजीत पडले होते पण प्रयत्न करू अशी आशा दाखवत उपचार सुरू होते. सकाळ झाली पण काही फरक नाही हे बघून रात्रभर डोळा न झाकलेली आईवडील यांना डोळ्याच्या आतून आपोआप हुंदके येऊ लागले, मला मांडीवर घेऊन बसून रडू लागले आणि त्याचे काही थेंब माझ्या शरीरावर पडत मला मातृत्वाची जाणीव करून देऊ लागले. आश्चर्य म्हणजे त्या अश्रूंच्या थेंबाचा स्पर्शाने माझा ज्वर उतरू लागल्याचे जाणवू लागले, माझे डोळे रात्री झाकलेले थोडे थोडे उघडू लागले. ही परिस्थिती लगेच डॉक्टरांना कळवली तो पर्यंत सकाळचे 8 वाजले असतील. डॉक्टर आले, त्यांनी तपासून आईला सांगू लागले,'तुम्ही हाताने जीव मारला असता, काळजी करू नका अजून खूप वेळ लागेल पूर्ववत व्हायला.'
तस तसा आई बापाचा जीव भांड्यात पडू लागला. पण माझ्या डोळे सोडता कोणताच अवयव हालचाल करत नव्हता, असेच दोनचार दिवस गेले तरी प्रगती नाही म्हटल्यावर गावातली परिचित लोक मला येऊन भेटत असत. आईला बोलत असत, नवीन नवीन उपचार सांगत असत, पण आईने ठरवले होते की काही लोक श्रद्धे पेक्षा अंधश्रद्धा सांगतात त्यामुळे माझं लेकरू जास्त आजारी पडल्यामुळे आता डॉक्टर सोडून कोणताही उपचार करण्याचा विषय सुद्धा घ्यायचा नाही, आणि मांत्रिक तांत्रिक याना तर बोलायचं पण नाही. जवळपास काही महिने आमचा रहिवास दवाखान्यात झाला पण प्रगती हवी तशी साथ न मिळण्याने आम्ही घराकडे परतलो. माझी आई डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर उपचार करत होती, ह्यासाठी जवळपास 18 वर्ष गेली. मी जमिनीला खिळून असल्याने सकाळी उठल्यापासून सु शी, दात स्वच्छ करणे, अंघोळ, वेणी फणी, कपडे घालणे, आणि खाऊ घालणे आणि इतर सर्व क्रिया आई रात्रंदिवस करत होती. तिला अशा होती मी एक दिवस नक्की बरी होणार आणि तो एक दिवस उजडला. मला सकाळी जग येताच हात पाय जाणवले, शरीर जाणवले, मी आईला हाक देखील मारली, आई धावतच जवळ आली कारण ती हीच हाक ऐकण्यासाठी जणू माझी सर्व सेवा करत होती. मी माझ्या हाताचा आधार घेत उठून बसत, हाताने आईला जोरात मिठी मारत, जवळ घेतले, त्या वेळी आईने मला गच्च असे जवळ घेत पाठीवरून हात कुरवाळत आनंदाश्रू माझ्या डोक्यावरून ओघळून तळपायाला स्पर्शू लागले. मी पूर्वीप्रमाणे ठीक झाल्याने माझ्या पेक्षा माझ्या आईला सर्वात जास्त आनंद झाला होता.
आईने मला शाळा घातले वय जास्त असल्याने मला मुलं मुली चिडवत पण आई सांगत, "चांगलं काम करणारावर नेहमी आरोप होतात, आपण आपलं कार्य करत राहायचं, मग हेच अपमान करणारे जग आपले कौतुक करायला सगळ्यात अगोदर येतात, हा ही एक इतिहास लक्षात ठेवत जा."
असे अनेक सुविचार मी रोज शिकत शिकत आज मी एक आई होणार आहे, ह्या सगळ्या इतिहासाची कल्पना घेऊन मी तर कधीच अंधश्रद्धा कडे जात नाही, पण आपण देखील कोणी अंधश्रद्धावर विश्वास न ठेवता वैद्यकीय सल्ला घेत आपल्या आजारावर उपचार घेत चला.
कारण वेळ महत्वाची असते, त्या वेळी आपल्यापेक्षा आपल्या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी जीवाचं रान करणारी फक्त आईच असू शकते. अशी सर्वांचीच आई असते फरक फक्त काही घटनांचा आहे. आता आई, मी आणि माझे कुटुंब खूप समाधानाने जीवन जगत आहोत.
त्यासाठी आजच्या मातृदिन निमित्ताने आईपासून आई होण्यापर्यंतची काल्पनिक गोष्ट आपल्यासमोर मांडली आहे. काही साम्य वाढल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
लक्ष्मण काटेकर, सोलापूर.
Comments
Post a Comment