Skip to main content

गझल मोबाईल

तुला पाहिल्यावर मी, मनाला समाधान मानतो,
तुला बोलल्यावर मी, मला मोठा समजीतो,

तुला हातात घेऊन मी, माझा मलाच बोलतो,
तुला मनात भरून मी, माझाच मलाच हासतो,
तुझ्या डोळ्यात बघून मी, नाही तेच बघतो,
तरीही तू मला दिसणे, नाही बंद करत
      असं तुला पाहिल्यावर....

तुझ्यात मला बघून, तुझाच होतो मी,
तुझ्यातल्या गोष्टी वाचून, माझं विश्व सोडतो मी,
नको त्या गोष्टी पाहून, खऱ्याला सोडून जातो मी,
माझी माणसं मला, सांगतात तरीही मी, तुलाच जवळ घेतो
      कारण तुला पाहिल्यावर.....

तूला वाचल्यावर मी, मलाही लिहावं वाटत,
तू बंद असताना, उघडून बघावं वाटत,
तू संपल्यावर देखील, मला बेचैन खूप होतं,
तू मला एकदा निवांत राहू दे
      कारण तुला पाहिल्यावर.....

तू नव्हता तरी, खूप सुखी होतो आम्ही,
पण तू आल्यापासून, पुरे वेडे झालो आम्ही,
तू सजीव नाहीतरी, तुझ्यात गुंतलो आम्ही,
तू नसताना ही, तुझे झालो आम्ही,
     असं तुला पाहिल्यावर.....

तुला विकत घेतल्यावर, तुला आपला जीव समजतो,
तुला रोज जगवत मी, जवळचे दूर मी सोडतो,
पण हा विचार तुला, कसा कधी न जाणवतो,
कारण तुला ही माणसं, नको असतील जगावर
     तरी तुला पाहिल्यावर.....

तुझा जीव संपल्यावर, तुला मी चार्जिंग करतो,
तू संपल्यावर देखील, तुला मी दुरुस्त करतो,
तुला हवं नको ते मी, माझ्यापेक्षा जास्त मी देतो,
तरीही तू मला फक्त थोडीच का देतो
      असं तुला पाहिल्यावर.......

तू कसाही असला तरी, मी तुला माझा करतो,
तुला गरज नसली तरी, माझा म्हणून जपतो,
पण मला आता कळले, तू तर मला संपवतो,
जो भेटेल त्याची तू, आर्थिक बँक लुटतो
असा तुला घेऊन मी,माझा मलाच संपवतो,
     तरी तुला पाहिल्यावर

आता एक सांगतो, मला सोड तू जरा,
मला जगू दे माझं, खरं जीवन जरा
तू नव्हता ते जीवन, मला जगू दे जरा,
मी होतो, तसाच बरा होतो, हे मला समजले आता
      कारण तुला पाहिल्यावर.....

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.