Skip to main content

नक्षत्र माहिती

*🔎पुरवणी माहिती*

👉 *नक्षत्रे समजुन घ्यायायला हा सर्व मजकूर समजणे महत्त्वाचे आहे......*👍

*भारतीय कालगणनेसाठी एकज्योतिर्गणितामधे पृथ्वी हे स्थिर केन्द्रबिंदू मानून केलेलेे आहे. त्यामुळे सूर्य हा तारा असूनही त्याला ग्रहाचे स्थान देउन तो चल झालेला आहे.*

 *काळ म्हणजे काय? त्याचे सूक्ष्मतम आणि महत्तम रुप कसे आहे ?*

काळ हे एक अमूर्त तत्व आहे.
विषयांचे रुपंतर(बदलणे) हेच काळाचे स्वरुप आहे, त्याचे निमित्त होणारे कालतत्व स्वत:ला प्रकट करते.ते अव्यत्कातून प्रकट होते.

 *या काळाचा सूक्ष्मतम अंश परमाणू*

 त्यातील परीमाणे अशी आहेत..

👉 *२ परमाणु - १ अणु,*
 *३ अणु - १ त्रसरेणु,*
 *३ त्रसरेणु - १ त्रुटि,*
 *१०० त्रुटि - १ वेध,*
 *३ वेध - १ लव,*
 *३ लव - १ निमेष,*
 *३ निमेष - १ क्षण,*
 *५ क्षण - १ काष्टा* ,
 *१५ काष्टा - १ लघु,*
 *१५ लघु - १ नाडिका,*
 *२ नाडिका - १ मुहूर्त,*
 *३० मुहूर्त - १ दिवसरात्र(१५      मुहूर्त- दिवस/रात्र),*
 *७ दिवसरात्र - १ सप्ताह,*
 *२ सप्ताह - १ पक्ष,*
 *२ पक्ष - १ मास,*
*२ मास - १ ॠतु,*
*३ ॠतु - १ अयन,*
*२ अयन - १ वर्ष.*

 *एक दिवसरात्र = ३२८०५००००० परमाणु =८६४०० सेकंद.*

 *(महाभारताच्या मोक्ष पर्वात अध्याय २३१ कालगणना आहे.)*

👉 *१५ निमेष--१ काष्टा,*
*३० काष्टा--१ कला,*
*३० कला-- १ मुहूर्त,*
*३० मुहूर्त-- १ दिवसरात्र*


 *उत्तरायण आणि दक्षिणायन:*

पृथ्वी आपल्या कक्षेत २३ १/२ अंश( उत्तर पश्चिम) वायव्य दिशेला कलली आहे, म्हणून भूमध्यरेषे पासून २३ १/२ अंश उत्तर भागात आणि २३ १/२ दक्षिण भागात किरणे लम्ब रेषेत पडतात.सूर्याची किरणे लंबवत पडणे याला *संक्रांती* असे म्हणतात.

या मध्ये उत्तरे कडील रेखांशाला कर्करेशा व दक्षिण कडील रेखांशाला *मकररेखा* म्हणतात.

 *भूमध्य रेषेला शुन्य अंश किंवा विषुववृत्तरेखा म्हणतात.त्या मध्ये कर्क संक्रांतीला उत्तरायण आणि मकर संक्रातीला दक्षिणायन म्हणतात.*

 *वर्षमान:*

पृथ्वीदर तासाला जवळपास एक लक्ष कि.मी.या वेगाने(अंदाजे ९६६०००००० कि.मी.लांबीचा)सूर्याभोवतालीचा प्रवास ३६५ १/२ दिवसामध्ये पूर्ण करते या कालावधीला एक वर्ष म्हणतात.

 *युगमान:*

 *४३२००० वर्षाच्या कालावधीत सातही ग्रह आपली स्थाने सोडून एका जागी येतात या युतीच्या काळाला कलियुग असे म्हटले आहे.(सूर्य चंद्र बुध शुक्र मंगळ गुरु शनी या सात ग्रहांचा अश्विन नक्षत्रात येण्याचा काळ).कली-युगाची सुरवात अर्जुनाचा नातु(पौत्र) राजा परीक्षिता पासुन मानली जाते.आपल्या कडील बहुतेक सर्व पंचागाची गणना/मांडणी याच काला पासुनची आहे.*

अश्या प्रकारे
 *दोनदा युती होण्याचा काळ द्वापारयुग,*
*तीन वेळा त्रेतायुग,चारदा सत्ययुग.*
*१ कलीयुग --४३२००० वर्ष*
*२ कलीयुग-द्वापारयुग-८६४००० वर्ष*
*३ कलीयुग-त्रेतायुग-१२९६००० वर्ष*
*४ कलीयुग-सत्ययुग-१७२८००० वर्ष*

 *चार युगांचे एक चतुर्युग(महायुग)-४३२०००० वर्ष*




 👉 *तिथी/दिवस/वार*

दिवसाचे *होरे(घंटे) २४* असतात. पृथ्वीचा जो भाग *१२ होरा  सूर्यासमोर* असतो तो *अह/दिवसवेळ* आणि *पाठी मागे* ज्या १२ होरा असतात ती *अहो/रात्र*

आता आपणाला माहीत आहे पॄथ्वी आपल्या *आसा भोवती दर तासाला १६०० की.मी. या गतीने* फ़िरते त्यासाठी तीला २४ तास लागतात.

*पृथ्वी दर तासाला १ लक्ष कि.मी.वेगाने सूर्याभोवती फ़ेरी पुर्ण करते.*

*पृथ्वीचे १ अंश भ्रमण म्हणजे सौर दिन.*

पृथ्वीपासुन शनि,गुरु,मंगळ,सुर्य,शुक्र,बुध,चंद्र हे ग्रह ठराविक अंतरानुसार असुन यात *चंद्र सर्वात जवळ* तर *शनि सर्वात दूर* आहे.

 *वैदिक परंपरेतुन ब्रम्हगुप्ताने सृष्टीची सुर्या बद्दलची महत्त्ता लक्षात घेउन सूर्यवार/रविवार पहीला दिवस मानला .*

 *चांद्र दिवसाला तिथी म्हणतात. जसे प्रथमा,द्वितीया...एकादशी...पोर्णिमा...अमावस्या इ.*

 *पृथ्वी भोवती चंद्राचे १२ अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात*


 👉 *पक्ष:-*

आजच्या परीभाषेत चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो तेव्हा *अमवस्या* असते. या स्थितीला शून्य अंश मानून येथुन *१२ अंशाच्या गतीने प्रवास करत जेव्हा चंद्र हा १८०* अंश प्रवास करतो तेव्हा *पौर्णिमा* येते.

 *अश्या प्रकारे प्रतिपदे पासुन पौर्णिमे पर्यंत शुक्ल पक्ष व प्रतिपदे पासुन अमवस्येपर्यंत कृष्णपक्ष येतात.*

 👉 *नक्षत्र*

 म्हणजे अवकाशातील *विशिष्ट पटटयातील ठळक तारका समूह. अवकाशगोलात ३६० अंशाचे बारा भाग पाडून जशा राशी झाल्या तसे २७ भाग पाडले तर २७ नक्षत्र होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा(१३.२० अंश) झाला.*

 *मास:-*

 *२७ नक्षत्रांचे बनते*

*१. अश्विनी*,
*२. भरणी*
*३. कॄतिका,*
*४. रोहीणी,*
*५. मृग,*
*६. आर्द्रा,*
*७. पुनर्वसू,*
*८. पुष्य,*
*९. आष्लेशा,*
*१०. मघा,*
*११. पुर्वाफ़ाल्गुनी,*
*१२. उत्तराफ़ाल्गुनी,*
*१३. हस्त,*
*१४. चित्रा,*
*१५. स्वाती,*
*१६. विशाखा,*
*१७.अनुराधा,*
*१८. ज्येष्टा*
*१९. पूर्वाषाढा,*
*२०. उत्तराषाढा,*
*२१. श्रवण,*
*२२. धनिष्टा,*
*२३. शततारका,*
*२४. पुर्वाभाद्रपदा*
*२६. उत्तराभाद्रपदा,*
*२७. रेवती.*

 *या २७ नक्षत्रांचे प्रत्येकी ४ चरण असतात. (२७×४=१०८)*

 *ह्या १०८ भागात ९ भागांची एक या प्रमाणात १२ आकॄतीत (म्हणजे राशीत) रुपांतर केलेली दिसतात.*
 मेष,वृषभ,मिथुन,कर्क,सिंह,कन्या,तुळ,वृश्र्चिक,धनु,मकर,कुंभ,मिन.
या राशींच्या रेखा निश्र्चित केल्या आहेत,त्यांना *क्रांती* म्हणतात.

 *या क्रांतीरेखा विषववृत्ताच्या उत्तरेस २४ आणि दक्षिणेस २४ असे मानले गेले.या प्रकारे सूर्य ज्या राशीचक्रात येतो त्या क्रांतीचे नांव सौर मासाला दिले जाते.तसेच जे नक्षत्र संपूर्ण महीनाभर सायंकाळापासून प्रात:काळा पर्यंत दिसते तसेच चंद्रमा ज्यांची पुर्णता प्राप्त करतो, त्या नक्षत्राच्या नावाने चांद्रमास ओळखला जातो.*

ते असे
 *चित्रा-चैत्र,*
*विशाखा-वैशाख,*
*ज्येष्टा-ज्येष्ट,*
*आषाढा-आषाढ,*
*श्रवण-श्रावण,*
*भाद्रपद-भाद्रपद,*
*अश्विनी-अश्विन,*
*कृतीका-कार्तिक,*
*मृग-मार्गशीर्ष,*
*पुष-पौष,*
*मघा-माघ,*
*फ़ाल्गुनी-फ़ाल्गुन.*

 *जन्मनक्षत्र म्हणजे काय ? आणि*
*जन्मरास म्हणजे काय ?*

पृथ्वी सूर्याभोवती ज्या वर्तुळात फिरते ते वर्तुळ जर कल्पनेने मोठे-मोठे करीत नेले व तारांगणाच्या घुमटाला भिडवले तर तेथे जे काल्पनिक महा-वर्तुळ तयार होईल त्याला *अयनवृत्त किंवा क्रांतीवृत्त* म्हणतात.

या महा-वर्तुळावर एक आरंभ-बिंदू ठरवायचा आणि तिथून सुरुवात करून महा-वर्तुळाचे १२ समान भाग मानायचे.

 *प्रत्येक भाग ३० अंशाचा होतो. त्यालाच रास म्हणतात.* मेष ते मीन अशा बारा राशी आहेत.

तुमच्या जन्माचे वेळी चंद्र ज्या राशीत असेल ती तुमची *जन्मरास मानली* जाते.

आता याच महा-वर्तुळाचे २७ समान भाग केले तर एकेक भाग १३ अंश व २० कलांचा(१३.२०°) होईल.तो एक भाग म्हणजे एक *नक्षत्र* .

तुमच्या जन्माचे वेळी जर चंद्र मृग नक्षत्रात असेल तुमचे जन्मनक्षत्र मृग असे म्हणायचे.

ही सत्तावीस नक्षत्रे बारा राशींमध्ये वाटलेली आहेत म्हणून *एकेका राशीत सव्वादोन नक्षत्रे* बसतात.

 *त्यासोबतच प्रत्येक दिवशी चंद्र प्रत्येक दिवशी ह्या २७ नक्षत्रांमधुन प्रवेश करतो जिकी आपण दिनदर्शिकेमधे दर दिवशी बघु शकतो.*

 प्रत्येक नक्षत्राचे चार भाग करतात त्या प्रत्येक भागाला *चरण* असे म्हणतात.

 *अंतरिक्षाच्या कल्पनातीत अफाट पार्श्वभूमीवर दिसणारे हे राशी-नक्षत्रांचे चित्र आपल्या तोकड्या कल्पनाशक्तीच्या आवाक्यात येईल अशा रितीने मांडता येईल का? येईल. अशी कल्पना करायची की, सूर्यापासून प्लूटोपर्यंत पसरलेली आपली संपूर्ण सूर्यमाला एका रुपयाएवढ्या लहानशा वर्तुळात मावेल एवढी लहान केली आहे. ही रुपयाच्या आकाराची सूर्यमाला एका विस्तीर्ण मैदानात मध्यभागी ठेवली आहे. आता या प्रमाणावर, म्हणजे स्केलवर, राशी-नक्षत्रांच्या ताऱ्यांची मांडणी मैदानात करायची आहे. त्यासाठी त्या रुपयाच्या भोवती ३०० फूट त्रिज्येचे एक वर्तुळ काढायचे. या वर्तुळाच्या आत एकही तारा नाही. त्याच्या बाहेर पसरलेल्या विस्तीर्ण मैदानात मैलभर अंतरापर्यंत डोळ्यांना दिसू शकणारे राशी-नक्षत्रांचे तारे विखुरलेले आहेत. मृग नक्षत्रातला व्याधाचा तारा ५५० फूट अंतरावर आहे. काही नक्षत्रांचे तारे दीड-दोन हजार फूट अंतरावर आहेत. आता जरा आपल्या रुपयाकडे पहा. त्यावर कुठेतरी आपली पृथ्वी व चंद्र एका तिळाएवढ्या लहानशा जागेत आहेत असे समजायचे. पृथ्वीवर उभे राहून चंद्राकडे पहाणारा म्हणत असतो की मला चंद्र आत्ता मृग नक्षत्रात दिसतो आहे, वास्तविक तो बापडा चंद्र कुठे असतो आणि ते मृग नक्षत्र कुठे असते! तरी पण फलज्योतिषात असे म्हणायचे असते की माझ्या जन्मवेळी चंद्र मृग नक्षत्रात दिसत होता म्हणून माझे जन्मनक्षत्र मृग. या नक्षत्राचा मालक कोण तर मंगळ, म्हणून मला जन्मत: मंगळाची महादशा चालू झाली.*

 *पावसाळयाची जी नक्षत्रे सांगितली आहेत त्याच्या गुणधर्माप्रमाणे पाउस पडतो असा अनुभव येतो. मग नक्षत्रे आणि मौसमी पाउस यांचा काही संबंध आहे का?*

खरं तर हा भाग पूर्णपणे भूगोलाचा आहे. पृथ्वीचा आस हा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेशी पूर्णपणे काटकोनात नाही. तो *२३.५ अंश कलता आहे.*तो तसा नसता तर विषुववृत्तावर बारमाही उन्हाळाच राहिला असता.* उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळी दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. त्यामुळे ऋतू हा काळ व स्थळ या दोन्हीशी निगडित आहे. मृगनक्षत्र हे पावसाचे पहिले नक्षत्र म्हटले जाते. ७ जूनला मृगनक्षत्र हे पावसाचे पहिले नक्षत्र लागते याचा अर्थ असा कि सूर्य आकाशात असताना आकाशातील तारे दिसतील अशी कल्पना केली तर सूर्य हा त्या वेळी आकाशातल्या मृग नक्षत्राजवळ दिसेल. म्हणजे या ठिकाणी नक्षत्रांचा उल्लेख हा कालनिर्देशक आहे. *७ जूनला मृग नक्षत्रात प्रवेश सर्व पृथ्वीच्या संदर्भाने आहे. पण पावसाळा जून महिन्यात फक्त आपल्याकडे चालू होतो. सर्व जगभरात नाही.* मे महिन्यात उन्हाळा असणे हा काही मे महिन्याचा गुणधर्म नव्हे. *तसे मृगनक्षत्रात पाऊस पडणे हा काही मृगनक्षत्राचा गुणधर्म नव्हे. २१ मार्च, २२जून, २३ सप्टेंबर व २२ डिसेबर या पृथ्वीची स्थिती दर्शवणाऱ्या भूगोलातील आकृत्या पाहिल्या तर आपल्या ऋतूमान व कालनिर्देशन यांचा परस्पर संबंध लक्षात येईल. पूर्वीच्या काळी कालनिर्देशनासाठी पंचांगच वापरले जात.* कुठल्या नक्षत्रावर काय धर्मकृत्ये करावीत या गोष्टी *ज्योतिषाच्या संहिता या स्कंधाशी संबंधीत आहे. ही धर्मकृत्ये वा शेतीसंबंधीत कामे ही ऋतूमानाशी निगडित आहेत. ती पंचांगाचे आधारे सांगितली जात असत आणि पंचांग हे फलज्योतिषाशी संबंधीत असल्याने पावसाचा नक्षत्राशी संबंध ही बाब ज्योतिषाशी जोडली गेली.*


*पंचांग म्हणजे काय? त्याचा उपयोग काय?*

कालगणनेची *५ अंगे* आहेत. ती म्हणजे *तिथी, वार, नक्षत्र, योग व करण.*

 या पाच अंगांची माहिती ज्यात असते ते *पंचांग* .

आपण ३ अंगांची अगोदर माहिती बघितली... तिथी, वार आणि नक्षत्रे

 *योग व करण*

 हे व्यवहारोपयोगी नसल्याने आता व्यवहारात योग व करण ही अंगे प्रचारात नाहीत. पंचांगात मात्र ती दिलेली असतात.


👉 *फलज्योतिष म्हणजे काय?*

 *जन्मवेळची ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष.*


 *फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता. ज्योतिष किंवा ज्योति:शास्त्र हा शब्द प्रचारात होता, ज्योति म्हणजे आकाशातील दीप्तीमान गोल. ज्योतिष हा शब्द मुख्यत: खगोलशास्त्र या अर्थाने वापरीत असत. त्याचा उपयोग यज्ञयागादि धर्म-कृत्ये करण्यासाठी चा काल गणना ठरवण्यासाठी केला जात असे. त्यात अर्थातच शुभाशुभत्वाचा भाग असे.*

 *कालांतराने ज्योति:शास्त्राचे तीन स्कंध होउन त्याना सिद्धांत-स्कंध, संहिता-स्कंध आणि होरा-स्कंध अशी नावे मिळाली. पहिला सिद्धांत-स्कंध पूर्णपणे खगोलगणिताशी संबंधित होता. दुसरा संहिता-स्कंध हा ऋतूमानानुसार नागरी जीवनातील कृत्ये व कर्तव्ये केव्हा म्हणजे कुठल्या नक्षत्रावर व मुहूर्तावर करावीत हे सांगणारा होता. तिसरा होरा-स्कंध हा व्यक्तीच्या आयुष्यातील घटना वर्तवणारा होता, तो म्हणजेच आजचे फलज्योतिष .*

*यूरोपमध्ये वेधशाळांच्या मदतीने ज्योतिषी लोक ग्रहगतीचा अभ्यास करीत असत व ग्रहणादिकांविषयी भाकिते वर्तवीत असत. वेधशाळांना राजाश्रय असायचा. जोहानीज केपलर (इ.स. १५७१ -१६३०) या खगोलशास्त्रज्ञाला तत्कालीन परिस्थितीत फलज्योतिषावर उदर निर्वाह चालवावा लागत असे. त्याला त्या परिस्थितीचा कमालीचा उबग आला होता. तो एके ठिकाणी म्हणतो, ''फलज्योतिष ही ज्योति:शास्त्राची ( म्हणजे खगोलशास्त्राची ) बदलौकिक कार्टी आहे, पण तिच्याविना तिची बिचारी आई (म्हणजे खगोलशास्त्र ) एका वेळच्या अन्नाला देखील महाग होते ! पुढे काही कालानंतर ज्योति:शास्त्राला खगोलशास्त्र असे नाव पडले आणि ज्योतिष हा शब्द फक्त फलज्योतिष या अर्थाने वापरला जाऊ लागला.*

 *...............आशा करतो आपणास याद्वारे आपल्या भारतीय खगोलीय ज्ञानाचा चांगल्या रितीने लाभ झाला असेल*

संकलन
साभार
विज्ञान ग्रुप वरून

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.