*संपुर्ण लेख वाचा, आणि आहे असा शेअर कराल तरच त्यातील अर्थ, संदेश आणि उद्दिष्ट समजेल.*
*संवादातून कल्पना सादर करत आहे, तरी कोणाविषयी जाणून बुजून राग नसून फक्त प्रबोधन पर संवादसाहित्य लेखन केलेले आहे कोणाचा गैरसमज करून घेऊ.*
*भक्त आणि विठ्ठलामधील संवाद*
📞 📞📞📞📞 ...............
*विठ्ठल:-* जय हरी,
कोण बोलतंय, मला आज वेळ नाही, कारण आज माझे सगळे भक्त माझ्या भेटायला आलेत, मी त्यांना भेटतोय, मनातलं ऐकतोय त्यांच्याशी बोलतोय, आपण नंतर बोलूया का?
*भक्त:-* जय हरी विठुराया. आपण आज खूप व्यस्त आहात, नक्कीच. हे मी पण पाहिलं. मला पण जाणवतेय की आज तुम्हाला 10 लाख पेक्षा जास्त लोक भेटायला आलेत, पण मी तरी काय करू रे विठ्ठला मी पण आज ठरवलंच की आज बोलायचं म्हणजे बोलायचं. मनातलं सगळं सांगायचं.मी आलेलो आठवतंय का विठ्ठला?
*विठ्ठल:-* मला माहितीय तू माझ्या भेटीला आलेला, पण मी तुला बोलावणं नव्हतं पाठवलं किंवा संदेश फोन किंवा मॅसेज नव्हता केला की मला भेटायला ये म्हणून, आणि महत्वाचं मी कधीच कोणालाही बोलवत नाही त्यांनाच वाटत की आपण जाऊन विठ्ठलाची भेट घ्यावी. समजलं का? आणि काय बोलायचं ते आपण उद्या सविस्तरपणे बोलू भक्ता, "ज्यांना बोलवलं जात ते आले की नाही हे आपण आवर्जून शोधतो पण ज्यांना बोलवलं जात नसत पण ते येतात त्यांची आठवणी किंवा स्मरणात ठेवायची गरज नसते ते मुळातच मनात अंतःकरणात जाऊन बसतात. तसा तू देखील माझ्या अंतःकरणात आहेस.मला हे देखील माहीत आहे की तू खरच मला भेटायला आलेला होता, माझी भेट घेण्याचा बहाणा करत काही जण येतात पण ते इथपर्यंत येतात मग त्यांची भावना, विचार, कल्पना उद्देश हे सगळं वेगळं असत पण येतात हेच मला महत्वाचं आहे, कारण आज नाही तर उद्या तरी नक्की त्यांच्या मनातील खरा उद्देश ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करतील हे देखील तितकंच महत्वाचे आहे. असो मी कोणालाही कधीच वाईट सांगत नाही की वाईट शिकवत नाही.
*भक्त:-* होय मला देखील माहीत आहे आणि हे मला सांगून काय उपयोग आहे? हेच तर मला तुझ्यासोबत बोलायचं. ते विठ्ठला तुला माहीत नाही की ही जनमाणसात तुझी ख्याती खूप मोठी आहे रे. पण त्या ख्यातीचे उपयोग करत लोक तुझी भक्तिमय जीवन चोरून आपला स्वार्थ साधतात रे, तेच मी सांगतो सगळं लक्ष देऊन ऐक.
*विठ्ठला तू खूप कानडा आहेस रे* कारण तू खर आणि खोटं कधीच बघत नाहीस रे, तुझ्या समोर येणारा तुझा खरा भक्त समजून बोलतोस, पण विठ्ठला आता तस नाही रे राहील, कारण आता आम्ही खूप वेगळ्या विचाराची माणसं आहोत, तू सगळ्या समाजाचे अनेक धर्माचे जातीचे कर्माची लोक एकत्र करत त्यांना त्यांच्या आवडीची सेवा करत आपला स्वार्थ साधत होतास, पण आता तस नाही राहील विठ्ठला, आता आम्हीच आमचे देव आणि हुतात्म्यांना जाती जातीत धर्मा धर्मात विकत घेतलाय. ज्याला माणुसकी हा एकच धर्म होता पण आम्ही आमच्यात शेकडो धर्म निर्माण करत त्यात आम्हीच आमचे देव दैवतांची वाटणी केली आहे रे. ज्यात आम्हाला की काय मिळणार तर नाहीच फक्त जयंती पुण्यतिथीला आम्हाला आठवण येते व त्या एकाच दिवशी आमच्या ते देव दैवत नेते हुतात्म्यांना आठवून आम्ही त्यांच्या सारख वागायची शपथ घेतो. आणाभाका मारतो. लोकांना बळजबरीने वर्गणी मागत साजरा करतो त्यांची जयंती नाहीतर पुण्यतिथी पण त्याच दिवशी रात्री आम्ही सगळं विसरून जातो आणि मग आम्हीं दिवसभर केलेलं कार्य आणि रात्री सगळे जण बसतात एकत्र आणि घेतात वाटून होतात दंग ज्यात सर्व भूमिका विसरून आमचे कार्यकर्ते जातात नविनच युगात अजून आपण कलियुगात आहोत हे देखील ते विसरतात. पण हे देव दैवत पूर्वज किंवा हुतात्म्यांना वाटून घेण्यासाठी तुला कधी कोणी विचारलं होत का रे विठ्ठला?
हॅलो विठ्ठला ऐकतोय ना? हॅलो.......
हॅलो
*विठ्ठल:-* ऐकतोय रे बोल, मला नेटवर्क ची गरज नाही पण मी सर्वांचे मन ओळखतो तिथं त्यांचं बोलणं कस ऐकू शकणार नाही, मला सगळं कळतंय, समजतंय, मी देखील त्यांना वेगवेगळी रूपे घेऊन समजून सांगायला जातो पण ते लोक माझं पण ऐकत नाहीत रे. ह्यांच्या साथ काय करावं हे मी पण शोधतोय?
*भक्त:-* शोधत किती दिवस बसणार आहेस विठ्ठला? मी माझ्या जन्मापासून हे बघतोय पण प्रथा वाढतेय रे, जेवढा सुशिक्षित होतोय तेवढा माणूस बिघडतोय रे, आणि शिकलेला म्हणून कोण समजवायला पण नाही रे जाऊ शकत. तो लगेच बाटलीचे पॅक भरत, ओठाला काळ करणारा धूर सोडत मजा चाखण्यासाठी तयार असतो. ह्यात त्यांचा शेवट आहे हे माहीत असून अस का करतो. त्यात प्रत्येकाला वाटत की माझी जात माझा धर्म मोठा आहे पण विठ्ठला तुझ्यासमोर तुझ्या पेक्षा कोणीच मोठं नाही रे. ज्ञानीयांचा राजा माउली, सोपान, मुक्ताबाई एकनाथ, नामदेव, तुकडोजी, असतील किंवा इतर देव दैवत किंवा पूर्वजन कधीच काही बोलले नव्हते रे पण आज ते सगळं विसरून आता खूप वेगळं जीवन जगताना वाईट वाटतय रे.
*विठ्ठल:-* अरे आपण उद्या बोलूया का? मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन आज खूप जण अजून रांगेत आहेत त्यांना भेटतो मग आपण नक्की सविस्तरपणे बोलू.
*भक्त:-* थोडं ऐक रे विठ्ठला, कैवल्याचा देव गरिबांचा कैवारी ऐक रे मायबाप ,
विठ्ठलाच्या मनात आज आपलं एवढंच ऐकायच अस ठरवलं वाटत, असुदेत बरं उद्या मी नक्की सगळं बोलणार आहे.

*उर्वरित संवाद उद्याच्या भागात.*