Skip to main content

नक्की वाचावे असे

*आपली राष्ट्रीय दांभिकता*

*देशाच्या प्रगतीचे मापन करायचे असेल तर नागरिक काय लायकीचे होते आणि आता काय लायकीचे झाले, या निकषावर करायला हवे.*
सातत्याने ढासळत जाणारा नागरिकांचा दर्जा हा राष्ट्रीय काळजीचा विषय असायला हवा.

*बोगीतील संडासातल्या टमरेलला साखळी बांधण्याची आयडिया ज्या कुठल्या कल्पक अधिकाऱ्याला सुचली असेल, त्याला शोधून काढून रेल्वे बोर्डाचे चेअरमन करायला हवे. भारतीय नागरिकांचे त्याचे आकलन हे श्रेष्ठ दर्जाचे आहे.*

*‘तेजस’ या आधुनिक, वेगवान रेल्वेत सुंदर बाकडी, एलईडी, छान वातानुकूलित व्यवस्था आणि असे बरेच काही असावे, ही कल्पना ज्याने मांडली त्याचे भारतीय नागरिकांचे आकलन कमी आहे, या कारणावरून निलंबनच करायला हवे.*

*हातगाडीवर बसवून न्यायच्या लायकीच्या लोकांना त्याने पालखीत बसवून रुबाबात न्यायचे स्वप्न पाहण्याचा प्रमाद केला आहे.*

*बाळासाहेब ठाकरे एक किस्सा त्यांच्या शैलीत नेहमी सांगायचे.. ‘लोक इथल्या हॉटेलमधले चमचे चोरून नेतात. अगदी रोज नेतात. अरे, चोरी करायची ठरवलेच आहेस तर निदान मोठा दरोडा तरी टाक. चमचे काय चोरतोस?’*

एका श्रेष्ठ भारतीय नागरिकाने ,एका प्राणीसंग्रहालयात,पिंजर्यातील माकड जाळीजवळ आल्यावर त्याच्या अंगाला खाजखुजली लावली होती आणि माकड खाजवून खाजवून वेडेपिसे झाल्याचा व्हिडीओ फेसबुकवर टाकला होता.
रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे, गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे,
*ऐतिहासिक इमारतींवर स्वतचे आणि स्वतच्या टिनपाट मत्रिणीचे नाव कोरणारे,*
कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करून पाणी न टाकता निघून जाणारे,
शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे,
सार्वजनिक ऊत्सवात ,लोकांकडून जमविलेल्या  वर्गणीतून  अवास्तव खर्चाच्या नावाखाली कमिशन म्हणून आपली तुंबडी भरणारे,
सार्वजनिक गणेशोत्सव  बाप्पाच्या पुढ्यातील  फुले प्नसाद आपल्या बापाचा समजून घरातील फ्रिजची कपाटं भरणारे बाप्पाचे ऊत्साही कार्यकर्ते, नेतेपणाची हौस भागवणारे बिनबुडाचे  महाभाग,

रस्त्यावरची बाकडी- रोड डिव्हायडर- फरशा चोरून नेऊन विकणारे, एसटी किंवा रेल्वेचे सीट कव्हर सहज विरंगुळा म्हणून फाडणारे.. हीच आपली ओळख आहे.

या ओळखीबद्दल काय बोलणार?
*वर्तमान लाजीरवाणा आणि भिकारडा असला की गतकाळातल्या फुशारक्या मारण्याशिवाय आपल्या हातात दुसरे काय उरते?*

*सरकार बदलून खूप प्रयोग करून झाले. त्याने काही फरक पडत नाही. आता जनताच बदलायला पाहिजे.*
*या देशात जर सुधारणा घडवून आणायच्या असतील, तर आपले नागरिक देशातून हाकलवून देऊन बाहेरच्या देशांतले चकचकीत लोक आयात करणे अतिशय आवश्यक आहे.*

*आणि तसे जर करायचे नसेल, आणि आपल्याच नागरिकांना जाब विचारायचा असेल तर मग मागच्या ६३ वर्षांत तुम्ही अजूनही टुकार नागरिकच का आहात, असा प्रश्न विचारायला हवा!*

*सरकार काय, मतदानाने कधीही बदलता येईल. जे कधीच बदलत नाहीत आणि दिवसेंदिवस अधिकच  भिकार दर्जाचे बनत चाललेत, त्या नागरिकांचे काय करायचे?*

( लोकसत्ता _लोकरंग मधून संकलित)
copy &paste

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.