Skip to main content

Hot potato भाग 3 ते 5

अनिल सोनूने सर म्हणजे आज पर्यंत ची अपेक्षा पूर्ण करत आहेत
Hot Potatos
ची मालिका

नमस्कार मित्रांनो
आज आपण HOtPotatos मधीन पुढील ॲक्टीव्हीटीज पाहणार आहोत.
आपण हॉट पोटॅटोज डाऊनलोड केले असेल तर आपल्या लक्षात आले असेल की या सर्व ॲकटीव्हीटीज मध्ये मेन्य हे सारखे आहेत म्हणूत जे मेन्यू आपण मागील भागात बघितले ते आता परत घेत नाही
आजची ॲक्टव्हिीटी आहे JMatch
आपण प्रश्न स्वरुपात जोडया लावा हा प्रश्न प्रकार घेत असतो. याच प्रकारचे प्रश्न आपल्याला या जे मॅच या भागात तयार करता येतात.
चित्रात दाखविल्याप्रमाणे आपल्याला या विंडो मध्ये दोन भाग दिसतात
पहिल्या भागात आपल्याला प्रश्न शब्द टाकायचे आहेत, लहान इयत्तांसाठी आपल्याला येथे शब्दांच्या ऐवजी चित्र ही टाकता येतील. त्यासाठी आपल्याला इन्सर्ट मेन्यू मधून जाऊन्‍ चित्र इन्सर्ट करता येतील
आता पुढील भागात त्या शब्दाचा जो बरोबर जोडी असलेला श्ब्द किंवा चित्र आहे ते टाकावे.
जे मॅच हे पर्याय आपोआप शफल करुन दाखवितो त्यामुळे प्रत्येक वेळी वेगळे कॉम्बीनेशन आपल्याला मिळते.
आता आपल्याला ही ॲक्टीव्हीटी सेव्ह करण्यासाठी 3 ऑप्शन्य मिळतात फाईल - क्रिएट पेज  मध्ये गेल्यावर
1.स्टँडर्ड फॉर्मेट - यात आपल्याला प्रश्न शब्दापुढे लिस्ट च्या रुपात ड्राप डाऊन मेन्यू मध्ये उत्तराचे शब्द दिसतील. बरोबर उत्तरे सिलेक्ट करून शेवटी Check Answer हे बटण दाबावे
2. Drag and Drop - या प्रकारात आपल्याला उजवीकडे शब्दपटटया दिसतील त्या माऊर ने ड्रॅग करुन डावीकडील प्रश्न शब्दांच्या बाजूला लावायच्या आहेत.सगळया जोडया लावल्यानंतर आपल्याला Chsck Answer  बटण दाबावे लागेल
3.  Flashcard Format - या प्रकारात आपल्याला अगोदर प्रश्न शब्द दिसेल त्याचे उत्तर काय आहे ते विद्यार्थ्यांने तोंडी सांगायचे आहे. उत्तर बरोबर आहे की नाही ते बघण्यासाठी नेक्स्ट बटण दाबावे

अशा प्रकारे आपण जे मॅच मध्ये जोडया लावा हा प्रश्नप्रकार तयार करु शकतो.
यात आणखी कल्पकता वापरून आवाज, व्हीडीओ, चित्र असे सर्व माध्यम वापरुन रंजक प्रकारे जोडया तयार करता येतील.
hAppy LearNIng !
Anil Sonune
MIEE 2016

======================

मित्रांनो शब्दकोडे सोडवायला आपल्याला सर्वानाच आवडतात. असेच शब्दकोडे आपल्याला सोप्या रिताने तयार करता आले तर किती छान ना ?
आज आपण JCross बददल माहिती घेवूयात. जे क्रॉस मध्ये आपल्याला इंग्रजी शब्दांचे शब्दकोडे तयार करता येतील .
या भागात /उपक्रमात आपल्याला फक्त इंग्रजी विषयासाठीच शब्दकोडे तयार करता येतातृ. कारण मराठी मधील जोडशब्द टाकला तर त्या शब्दातील फक्त पहिले अक्षर हा प्रोग्राम घेतो त्यामुळे मराठी शब्द कोडे तयार करताना फक्त मुळाक्षरांचे व विना काना मात्रा असलेले शब्द वापरावे लागतील त्यामुळे सध्या तरी हा प्रोग्राम इंग्रजी साठी शब्दांची बाग म्हणून जो उपक्रम आहे त्याच्या सरावासाठी आपल्याला घेता येईनल असे वाटते.
चित्रात दाखविल्यप्रमाणे आपल्याला डाव्या बाजूला ॲड क्लू व उजव्या बाजूला एक ग्रिड दिसते. बाय डीफॉल्ट ही ग्रिड 20 बाय 20 चौकटींची आहे. याला आपण Manage Grid या मेन्यू मधून कमी जास्त आपल्या आवश्यकते नुसार करु शकतो.
शब्दकोडे तयार करण्यासाठी आपल्याला ग्रिड मधील चौकोन सिलेक्ट करायचा आहे व आपला शब्द टाईप करत जायचा आहे. नंतर आडव्या व उभे असे शब्द तयार झाले की त्या शब्दाच्या सुरुवातीचे अक्षर सिलेक्ट करुन ॲड क्ल्यू वर क्लिक करा. आता त्या शब्दासाठी क्लू काय असेल तो लिहा. असे प्रत्येक आडव्या व उभ्या शब्दासाठी झाले की  फाईल - क्रिएट वेब पेज- स्टँडर्ड फॉर्मॅट असे सेव्ह करा.
आपले तयार झालेले शब्दकोडे आपल्याला वेब ब्राऊझर मध्ये दिसेल. सुरुवातीच्या बॉक्स मध्ये क्लिक केले की त्याची हिंट आपल्याला दिसेल. त्यानुसार शब्द टाईप करुन एंटर बटन क्लिक करा. आपला शब्द शब्दकोडयात भरला जाईल. अशा प्रकारे आपल्याला हे शब्दकोडे भरता येईल
आता दुसऱ्या एका सोप्या पध्दतीने आपण कोडे कसे तयार करता येईल ते पाहूयात.
मॅनेज ग्रिड मध्ये जा ,
ॲटोमॅटीक ग्रिड मेकर वर क्लिक करा
आपल्या पुढे नवीन विंडो ओपन होईल.
त्यात डाव्या बाजुला दिसण्याऱ्या बॉक्स मध्ये आपले शब्द एका खाली एक असे टाईप करा.
शब्द टाईप झाल्यावर Make the grid बटन क्लिक करा.
आपले शब्दकोडे तयार झालेले दिसेल .
प्रोग्राम आपोआप आपण दिलेल्या शब्दांनुयार शब्दकोडे तयार करतो.
आता आपल्याला प्रत्येक शब्दासाठी फक्त क्लू टाईप करावा लागेल त्यासाठी Add Clues हे बटन दाबा. आता आपल्यापुढे नवीन विंडो ओपन होईन. त्यात वर आडवे शब्द व खाली उभे शब्द आपल्याला दिसतील.
प्रत्येक शब्द सिलेक्ट करुन त्याखालील  बॉक्स मध्ये त्याचा क्लू टाईप करुन ओके हे बटन दाबा.
असे प्रत्येक शब्दासाठी करुन झाल्यावर आपल्याला ही फाईल स्टँडर्ड वेब पेज फॉर्मेट मध्ये ब्राऊझर मध्ये दिसेल.
पुढच्या भागात आपण जे पोटॅटोज मधील शेवटची कृती बघणार आहोत.
====================
JMix
त्यानंतर ची JPotstos मधील ॲक्टीव्हीटी म्हणजे जे मिक्स.
यात आपल्याला डाव्या बाजूला चित्रात दाखविल्याप्रमाणे Main Sentence ही विंडो दिसते. तर उजव्या बाजूला अल्टरनेट सेंटेंसेस मध्ये 3 बॉक्स दिसतात.
या उपक्रमात आपल्याला वाक्याचे क्रमवार वाचन करण्यासाठी Main Sentence या भागात वाक्य टाईप करायचे आहे.
वाक्य टाईप करताना आपल्याला वाक्याचे जेवढे भाग पाडायचे आहेत तेवढे भाग एका खाली एक अशा प्रकारे टाईप करावे.
उदा.
I am reading a book. हे वाक्य टाईप करताना
I am
Reading
a book.
असे टाईप केल्यास त्या वाक्याचे चार भाग पडतील. प्रश्न जेव्हा दिसेल तेव्हा क्रमाने विद्यार्थ्यांनी प्रथम I am वर क्लिक करायचे व क्रमाने वाक्याच्या भागावर क्लिक करत गेल्यार वरील ओळीत वाक्य तयार होत जाईल.
या उपक्रमात आपल्याला क्रमवार वाचनासाठी जसे संख्या वाचन
दिलेल्या संख्यामध्ये चढत्या क्रमाने संख्या लावा, उतरत्या क्रमाने संख्या लावा,  घटनाक्रम क्रमाने सांगा असे प्रश्न तयार करता येतील.
 जे मिक्स या प्रकारात ही आपल्याला व्हीडीओ, ऑडीओ , घटनांची चित्रे अशी क्रमाने लावण्यासाठी मल्टीमेडीया प्रश्न तयार करता येतील.
पुढच्या भागात आपण जे पोटॅटोज मधील पुढील ॲक्टीव्हीटी पाहुयात.
तोपर्यंत
hAppy LeArnINg !
Anil Sonune
MIEE 2016

Copy -paste

Comments

Popular posts from this blog

CTET Feb 2026 Final Ans Key

 CTET Feb 2026 Final Ans Key  CTET 7 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 1 - Ans key -       Click here CTET 7 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here CTET 8 Feb 2026 - Paper 2 - Ans key -       Click here ज्यांना फायनल उत्तर सूची नुसार कोणत्याही पेपर मध्ये 81 किंवा 89 मार्क आहेत, त्यांनी 7588020886 ह्या नंबर वर खालील प्रमाणे माहितीसह संपर्क करावा. 1) आपले नाव - 2) Roll नंबर - 3) मोबाईल नंबर - 4) पत्ता - 5) CTET पेपर नंबर - १ / २ 6) CTET पेपर कोड - 7) CTET पेपर मार्क - 8) CTET पेपर दिनांक - 7 Feb. 2026 / 8 Feb. 2026 ह्यासाठी आपणास योग्य आणि अचूक मार्गदर्शन करण्यात येईल.    More information please Call / Whatsapp - 7588020886 Crescita Academy 

CTET result पुन्हा तपासण्यासाठी दुसरी संधी

CTET Feb. 2026 च्या निकाल बाबत काही आपल्या मनात शंका असल्यास आता एकदा पुन्हा संधी मिळतेय नक्की फायदा करून घ्या. ज्यांना 81 किंवा 89 असे काठावर मार्क आहेत त्यांनी ह्या संधीचा नक्की फायदा करून घ्या.