🌀मनोरंजक खेळ🌀
🌺 वासावरून वस्तू ओळखणे –
🌻बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे.
———————————————
🌺 2) फुगे फोडणे –
🌻लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा.
——————————————————————
🌺 03.) बॉल फेकून मारणे –
🌻या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत. सर्व मुले संपल्यावर गट बदलावा.
————————————————————————
🌺 4.) नेमबाजी –
🌻ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा.
———————————————————————————————————
🌺 5.) विद्यार्थी ओळखणे –
🌻एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे. अश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा.
——————————————————————
🌺 6) बादलीत चेंडू टाकणे –
🌻एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे. प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांक ठरवावा.
=====================
Comments
Post a Comment